लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा
मुंबई, (लोकमराठी) : कोंकण विभागात मंजूर १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. २२ हजार ७५४ थाळ्यातून लोकांना लाभ दिला जातो अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. १०५ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यात एका वेळेस २२ हजार ७५४ थाळ्यांची विक्री केली जाते.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपायोजना केल्या आहेत. राज्यातील कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रासह सामुहीक भोजन व्यवस्था निर्माण केली आहे. कोंकण विभागात जिल्हा निहाय शिवभोजन केंद्रांची माहिती अशी आहे. ठाणे २ केंद्र ४०० थाळया, पालघर १२ केंद्र २ हजार १०० थाळ्या, रायगड २४ केंद्र २ हजार थाळ्या, रत्नागिरी १४ केंद्र १ हजार ३५० थाळ्या, सिंधुदूर्ग ११ केंद्र ७५० थाळ्या अशी कोंकण विभागात एकूण ६३ शिवभोजन केंद्र व ६ हजार ६०० थाळ्यांना मंजूरी मिळाली असून एमटीआरए (मुंबई-ठाणे रेशनिंग एरिया...