Tag: covid-19

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील

पिंपरी (लोकमराठी) : कोरोना विषाणूने जगभरात थैमान धालते असून देश, राज्याबरोबर शहरातही कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी रविवारी (दि. 19 एप्रिल) मध्यरात्री बारापासून 27 एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरच सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहराच्या सर्व सीमा आणि प्रमुख रस्ते बंद करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यासाठी संपूर्ण शहर सील केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून ( दि. 20) नागरिकांना काही सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, त्या दिल्यास कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो. त्यात शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून पुणे शहरासह चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्र लागून आहे. त्यामुळे नोकरी आणि कामानिमित...
लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा
महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा

मुंबई, (लोकमराठी) : कोंकण विभागात मंजूर १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. २२ हजार ७५४ थाळ्यातून लोकांना लाभ दिला जातो अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. १०५ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यात एका वेळेस २२ हजार ७५४ थाळ्यांची विक्री केली जाते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपायोजना केल्या आहेत. राज्यातील कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रासह सामुहीक भोजन व्यवस्था निर्माण केली आहे. कोंकण विभागात जिल्हा निहाय शिवभोजन केंद्रांची माहिती अशी आहे. ठाणे २ केंद्र ४०० थाळया, पालघर १२ केंद्र २ हजार १०० थाळ्या, रायगड २४ केंद्र २ हजार थाळ्या, रत्नागिरी १४ केंद्र १ हजार ३५० थाळ्या, सिंधुदूर्ग ११ केंद्र ७५० थाळ्या अशी कोंकण विभागात एकूण ६३ शिवभोजन केंद्र व ६ हजार ६०० थाळ्यांना मंजूरी मिळाली असून एमटीआरए (मुंबई-ठाणे रेशनिंग एरिया...
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत
महाराष्ट्र, मोठी बातमी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मुंबई, ता. 16 (लोकमराठी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. https://youtu.be/OBATQJ5cZC0 याला सकारात्मक प्रतिसाद देऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखिल आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला....
मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोनासाठी भरभरून मदत, पण कॅन्सरचे रुग्ण मात्र मदतीविना मरणाच्या रांगेत !
विशेष लेख

मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोनासाठी भरभरून मदत, पण कॅन्सरचे रुग्ण मात्र मदतीविना मरणाच्या रांगेत !

महेंद्र अशोक पंडागळे मागच्या वेळी केरळमध्ये आलेल्या पुराला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने (देवेंद्र फडणवीस यांनी ) 200 कोटी रुपये दिले होते, असे म्हणतात माहीत नाही. पण तेंव्हापासूनच या निधी कक्षाला काय झालंय काही कळत नाहीये. गेली वर्षभरात कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगाचे रुग्ण ज्या स्पीडने वाढत आहेत, तरुण लहान मुले पटापट मृत्युमुखी पडत असताना राज्याच्या खात्यातून आणि इतर कोणत्याही ट्रस्टकडून हवी तशी काहीही मदत मिळताना दिसत नाहीये. इतकंच काय तर Tata Trust सारखी इतकी मोठी ट्रस्ट सुद्धा कमी पडायला लागली आहे, अशी भयानक परिस्थितीत आज महाराष्ट्र राज्य आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने 2014 ला सत्तेत आल्यापासून सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करणाऱ्या Ngo आणि Trust यांचा FCRA बंद करून बाहेरून येणारी हजारो कोटींची मदत रोखून धरली आणि त्यामुळेच राज्यात 12AA, 80G आणि FCRA असलेल्या हजारो सामाजिक...
Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा
पिंपरी चिंचवड

Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा

पिंपरी (लोकमराठी) : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक नागरिक आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. मात्र आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या काळात वैद्यकीय अथवा मृत्यू किंवा अन्य अत्यावश्यक आपत्कालीन कारणास्तव पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतू राज्यातील अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे ज्यांना खरच गरज आहे अशा व्यक्तींना आता इच्छित ठिकाणी जाता येणार आहे. मात्र, हा ई-पास केवळ अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहे असं नमूद करण्यात आलं आहे. https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन आवश्यक असलेली कागदपत्र आणि फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे शहरातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे...
Covid-19 : करोना बाधित अंडी विक्रेत्यामुळे १८० जणांचं विलगीकरण
पिंपरी चिंचवड

Covid-19 : करोना बाधित अंडी विक्रेत्यामुळे १८० जणांचं विलगीकरण

पिंपरी (लोकमराठी) : भोसरीत राहणाऱ्या व इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या परिसरातील १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. भोसरी येथील राहणारा हा विक्रेता महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. तो किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा करायचा. पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, भोसरी परिसरातील एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले असून तो इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करत होता. यामुळे वेगवेगळ्या भागातील ऐकून १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. कनकवले यांनी दिली आहे. यात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांचा समावेश आहे. परिसरातील नानेकरवाडी, खराबवाडी आणि मेंदनक...
Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्या नकाशावर बुधवारपर्यतची रूग्णांची आकडेवारी दिली आहे. ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये अ प्रभाग (रूग्ण संख्या - ०१) प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर). ब प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी). क प्रभाग (रूग्ण संख्या - ०८) प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा). ड प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभाग...
धक्कादायक : पुण्यात दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक
पुणे

धक्कादायक : पुण्यात दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक

पुणे (लोकमराठी) : लॉकडाऊनमुळे संयम सुटलेल्या तळीरामांनी दारुसाठी बीअर बारची दुकाने फोडून दारुच्या बाटल्या पळवल्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्यात चक्क दुधाच्या टेम्पोतून दारुची ने-आण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलिसाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून टेम्पोच्या चालकाला जेरबंद करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पोलिसांच्या गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत. पुण्यातील कात्रज घाटातही काल रात्रीपासून आज सकाळी ७ वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू होती. काल रात्री साडे अकरा वाजता 10MH12 JF6988 या क्रमांकाचा एक टेम्पो घाटातून जाताना पोलिसांना दिसला. त्यामुळे पोलिसांनी या टेम्पो चालकाला थांबायला सांगितले आणि त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी टेम्पोचालकाच्या बोलण्यावर पोलिसाला संशय आल्याने त्याला टेम्पो उघडून दाखविण्यास सा...
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या स्थितीत सर्व अत्यावश्यक सेवा कोरोनाविरोधात एखाद्या योद्याप्रमाणे लढत आहेत. इतर सर्वाना सुरक्षा कवच आहे. सरकार काळजी घेत आहे. मात्र, यातून लोकशाहीचा चौथा स्तंभ दुर्लक्षित राहिलाय. शासनाने कामगार हिसाठी अध्यादेश काढून निर्देश जारी केलेत. तरीही प्रसारमाध्यमकर्मी पुरेसे सुरक्षित नाहीत. काही पत्रकारांना या विषाणूची बाधा झाल्याच्या बातम्या पसरू लागताच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सक्रीय पत्रकारांची कोविड-१९ चाचणी करण्याची मागणी केली आहे. पण ही तपासणी पुरेशी नाही. यासोबत सर्व प्रसारमाध्यम व्यवस्थापन मालकांना खडबडून जागे करण्याची आणि जे मालक व व्यवस्थापन, वरिष्ठ माध्यम कर्मचारींच्या सुरक्षेत हयगय करत असतील आणि बातम्यांसाठी चुकीचा आग्रह धरत असतील अशांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रने केली आहे. याबाबत अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्य...
दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत
महाराष्ट्र, सामाजिक

दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत

एनयुजेएमचे सदस्य नगरचे पत्रकार जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सुदाम लगड यांचे अभिनंदनीय काम लोकमराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर शहर व परिसरात लॉकडाउनमुळे रोजीरोटी बंद झालेल्या शंभर कुटुंबीयांना दररोज अन्न-धान्य, किराणामाल व मोफत जेवण देण्याचे ध्येय मनाशी बाळगून दोन तरुणांनी पंधरा दिवसांपासून काही मित्रांच्या देणगीच्या सहकार्यातूंन ही मोहीम सुरु केली. आता दररोज किमान पन्नास कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. त्यांना मित्र परिवाराकडून शंभर रुपयांपासून ते थेट पाच हजारांपर्यंत मदत झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील पत्रकार नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे सदस्य जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सचिव सुदाम लगड या तरुणांकडून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे अन्न-धान्य आणि किराणा अशा गरजू लोकांना दिला जात आहे. त्यासाठी त्यांना काही सामाजिक संस्थांचीही मदत मिळत आहे. या युवकांच्या माध्यम...