Tag: Kalewadi

शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप
सिटिझन जर्नालिस्ट

शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप

काळेवाडी, दि. 22 ऑक्टोंबर 2022 : अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने नागरिकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जीवन सुखमय व्हावे. या हेतूने शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन काळे या दांपत्याने सुमारे 6,000 कुटूंबांना दिवाळीनिमित्त पणत्या वाटप करत दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. मागील तीन वर्षापासून काळे हा उपक्रम राबवत आहेत. सचिन काळे व कोमल काळे यांचे सामाजिक कार्य सर्वश्रृत आहे. ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवून आपणही समाज्याचे देणे लागतो, याची नेहमीच जाणीव करून देत असतात. कोणताही सण किंवा उत्सवात नागरिकांच्या आनंदातच आपला आनंद शोधणारे काळे दांपत्य आता नागरिकांच्या हक्काचे नेतृत्य म्हणून...
संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी 
पिंपरी चिंचवड, सामाजिक

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी

पिंपरी : विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समस्त बहुजन समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. काळेवाडीतील युवानेते बाबासाहेब जगताप यांच्या सहकार्याने संत शिरोमणी श्री सावता महाराज प्रतिष्ठान यांना बांधकामसाठी लागणारे मटेरियल आणि रोख रक्कम सहीत रु ५१००० हजार रूपयांची देणगी समस्त बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आली. ही देणगी समाजप्रबोधनकार शारदा मुंढे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी प्रहार पक्षाचे नेते संजय गायके, सामाजिक नेत्या रेखा काटे, रहाटणी गावचे सामाजिक नेते तात्या शिंगारे, दिलीप पवार, मनोज जाधव, विलास पवार, सिताराम जगताप, पंकज पवार, अरुण मैराळे, अनिल मखरे, निलेश भोसले, रंगनाथ भुजबळ, कोंडीबा कुटे, बापु काटे, सचिन पार्टे आदी उपस्थित होते. बाबासाहेब जगताप...
KALEWADI : रवि नांगरे यांच्या कार्यालयात रक्षाबंदन उत्साहात
पिंपरी चिंचवड

KALEWADI : रवि नांगरे यांच्या कार्यालयात रक्षाबंदन उत्साहात

नांगरे यांना काळेवाडीतील अनेक बहिणींनी बांधल्या राख्या काळेवाडी, ता. १३ : रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रवि रमेश नांगरे यांच्या कार्यालयात रक्षाबंदन उत्साहात साजरे करण्यात आले. लहान मुलीपासून वयोवृद्ध बहुसंख्य महिलांनी रवि नांगरे यांना राख्या बांधून बहिण भावाच्या पवित्र नात्याची प्रचिती करून दिली. यावेळी नांगरे यांनी आपल्या बहिणींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे त्यांना आरोग्य, शिक्षण व सामाजिक सुरक्षितता पुरविण्याचे वचन दिले. त्याप्रसंगी रॉयल फाउंडेशनचे उपाध्यक्ष आनंद काटे, सचिव प्रकाश नांगरे, कार्याध्यक्ष अजय काटे, खजिनदार गणेश नांगरे, सदस्य विकी साळवे, प्रथम नांगरे, सल्लागार महेंद्र सोनवले, पंकज पाटोळे, अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या राधा काटे, आशा नांगरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या...
ख्रिसमसनिमित्त रवि नांगरे यांच्यातर्फे चिमुकल्यांना खाऊ व भेट वस्तू वाटप
पिंपरी चिंचवड

ख्रिसमसनिमित्त रवि नांगरे यांच्यातर्फे चिमुकल्यांना खाऊ व भेट वस्तू वाटप

काळेवाडी : ख्रिसमस व आगामी नववर्षाच्या निमित्ताने काँग्रेसचे युवा कार्यकर्ते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रवि नांगरे यांच्यावतीने चिमुकल्यांना खाऊ व भेट वस्तू वाटप करण्यात आल्या. काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली भारत माता चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य पालकांनी आपल्या बालचमुंसह हजेरी लावली. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याप्रसंगी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, विजय ओव्हाळ, माउली मलशेट्टी,आबा खराडे, विश्वास गजरमल, स्वप्निल बनसोडे, किरण नढे, प्रकाश नांगरे, अजय काटे, आ...
आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे – डॉ. अक्षय माने
पिंपरी चिंचवड

आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे – डॉ. अक्षय माने

काळेवाडीत आरोग्य तपासणी शिबिराचा २३०० नागरिकांनी घेतला लाभ काळेवाडी : आजच्या धकाधकीच्या काळात शरीरासह मानवी मनावर देखील मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यामुळे निरोगी शरीरासाठी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे बनले आहे. असे मत डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. काळेवाडीतील विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय माने यांच्या सहकार्यातून प्रभागातील नागरिकांसाठी नुकतेच भव्य आरोग्य व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे २३०० नागरिकांनी सहभाग घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तर सुमारे ७० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. प्रभागातील नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अल्पदरात चष्मे वाटप, वजन कमी करण्याचे उपाय, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी यांचा लाभ घेतला. या का...
काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन
पिंपरी चिंचवड, नोकरीविषयक

काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन

काळेवाडी : वाढती बेरोजगारी व कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या अनुषंगाने युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्या वतीने काळेवाडीत भव्य नोकरी महोत्सवाचे गुरूवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रभागातील सुमारे १८०० जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये १०१ जणांना थेट नोकरी मिळाली आहे. डॉ. माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची जनसेवा सुरू आहे. अनेक जण सुशिक्षित असूनही नोकरी लागत नाहीत. ते सतत नोकरीच्या शोधात असतात. नोकरी नसल्यामुळे कुटुंब चिंतेत असते. ही बाब लक्षात घेत तसेच ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. अक्षय माने यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर हा नोकरी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात उत्पादन, वाणिज्य व वित्तीय संस्था, बीपीओ, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा प्रशिक्षण, वाहननिर्मित...
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार

पिंपरी : काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा २४ वा वर्धापन दिनानिमित्त 'एक दिवस ज्येष्ठांच्या सन्मानाचा' हा आनंद सोहळा ज्योतीबा मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गायिका रोहिणी घोडेकर प्रस्तुत स्वररंग मराठी, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथम गणेश पुजन करून महापौर उषा माई ढोरे, उपमहापौर हिराबाई हुले, कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत कुमार गुजर, संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष अरूण बागडे, कार्याध्यक्ष वृषाली मरळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, सुरेश नढे पाटील, नगरसेविका निता पाडळे, उषा काळे, सविता खुळे, सुनीता तापकीर व अश्विनी तापकीर, ज्योती भारती हरेश नखाते, सजी वर्की, बाबा जगताप, काळुराम नढे, बाळासाहेब नढे, सोमनाथ तापकीर, किरण नढे, मच्छिंद्र ता...
काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : काळेवाडीतील एमएम महाविद्यालयालगतच्या छत्रपती चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशाने आपल्या हृदयात अनेक वीर पुत्राची यशोगाथा कित्येक शतकापासून जतन केलेली आहे. हे वीर पुत्र आपल्या पावन भूमीत जन्माला आले, हे आपले केवढे सौभाग्यच. या महान विभुतींच्या वीरगाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात, आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो. तर त्यांचे कर्तृत्व डोळ्यांनी पाहता आले असते. असे विचार मनाला स्पर्शून जातात. आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होवून गेला. अखंड भारतवर्षांत आपल्या कर्तृ...
युवा नेते किरण नढे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार
पिंपरी चिंचवड, सामाजिक

युवा नेते किरण नढे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार

काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश काळेवाडी : काँग्रेसचे युवा नेते किरण बाबाजी नढे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माजी सैनिक, निवृत्त पोलीस, निवृत्त शिक्षक, डॉक्टर, जेष्ठ नागरिक, समाजसेवक, वारकरी संप्रदाय, पत्रकार यांना विशेष सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शहराध्यक्ष कैलास कदम आणि किरण नढे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नढे यांच्या नेतृत्वाखाली आयुब खान, प्रतीक चिंचवडे, यश पाटील, शाहरुख शेख, रोहित यादव, विशाल निटूने यांच्यासह काळेवाडीतील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच उपस्थित मान्यवर व नागरिकांनी किरण नढे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी व यशदायी आयुष्याच्या शुभेच्छा द...
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे
पिंपरी चिंचवड

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे

काळेवाडी : केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलच्या किमतीसह गॅस सिलेंडर व अन्नधान्यांचे भावही गगनाला भिडवले आहेत. तर शिक्षण गरीबांच्या आवाक्याबाहेर गेले असून महागाईने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते तथा रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि नांगरे यांनी येथे केले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या विरोधात “हाहा:कार” जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त पेट्रोल-डिझेल, सिलेंडर तसेच अन्नधान्यांचे भाव कमी व्हावे. यासाठी काळेवाडी परिसरात पदयात्रा घेऊन जनजागृती करण्यात आली. त्यावेळी रवि नांगरे यांनी आपल्या प्रखर भाषणात सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडली. त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व कामगार नेते डॉ. कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे माजी प्रदे...