Tag: Marathi News

जॅकवेल ठेकेदार नागपुरात अपात्र, पिंपरीत पात्र
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

जॅकवेल ठेकेदार नागपुरात अपात्र, पिंपरीत पात्र

आता फौजदारी कारवाईची राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची मागणी बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. ५ : भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेल निविदा प्रकरणातील ठेकेदार कंपनी गोंडवाना इंजि. ही ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे नागपूर स्मार्ट सिटीच्या कामात अपात्र ठरलेली असातना ती पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र पात्र ठरली आहे. खोटी माहिती देऊन महापालिकेची फसवणूक केल्या प्रकऱणी या ठेकेदार कंपनीवर फौजदारी कारवाई कऱण्याची मागणी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करण्याची विनंती गव्हाणे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकऱणात महापालिकेचे अधिकारी, सल्लागार आणि काही राजकारणी यांचे संगमनत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पाठिंब्याने महापालिकेत भामा आसखेड जॅकवेलच्या कामात होत असलेल्या...
सरकारने तृतीयपंथीयांवर अन्याय केल्यास, सरकार विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत न्याय मागणार
पिंपरी चिंचवड

सरकारने तृतीयपंथीयांवर अन्याय केल्यास, सरकार विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत न्याय मागणार

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. ४ डिसेंबर २०२२ : राज्यभरात अनेक तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामील व्हायचे आहे, पण राज्य सरकारने पोलिस भरतीत आवश्यक कोणतेही बदल न केल्याने त्याना अर्ज दाखल करता आलेला नाही. तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसकडून तृतीयपंथीयांचा स्वतंत्र सेल स्थापन करत संघटन केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅग्रेसने क्रांतीकारक पाऊल उचल तृतीयपंथी समाजातील घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामावून घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून न घेतल्यास राष्ट्रवादी काॅग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल. समाजाच्या मुख्य प्रवाहात...
दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झालाय. अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. इंजिनीअर पदावर कार्यरत असणाऱ्...
…अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू
पिंपरी चिंचवड, मनोरंजन

…अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू

हर हर महादेव चित्रपट दाखविण्यावरून संभाजी ब्रिगेडचा इशारा लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०२२) : झी टॉकिजवर हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्‍त केली आहे. तरीही झी टॉकिज या चॅनेलने हा चित्रपट दाखविल्यास त्यांच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन छेडू. तरीही न ऐकल्यास कार्यालय फोडू, असा तीव्र इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला आहे. सतिश काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हर हर महादेव चित्रपटामध्ये अनेक चुकीचे व वादग्रस्त संदर्भ दाखवित आले आहेत. यावर...
डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू
पिंपरी चिंचवड, आरोग्य

डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू

उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते झाले उद्घाटन काळेवाडी : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. तारिक शेख (Dr Tariq Shaikh) व डॉ. आस्मा शेख (Dr Asma Shaikh) यांचा काळेवाडी येथील तापकीर चौकात 'राहत क्लिनिक' या नावाने दवाखाना सुरू झाला आहे. या क्लिनिकचे उद्घाटन उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, दंत चिकित्सक डॉ. राजू कुंभार, ओझनटेक सोलूशनचे संचालक प्रसाद गुप्ते, मोहम्मद सलीम बेलीफ, प्रशांत भोसले, संतोष जाधव, डॉ. तारिक शेख, डॉ. आस्मा तारिक शेख, पत्रकार रविंद्र जगधने, कालीदास जगधने, अजय वायदंडे आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील खेडोपाड्यात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन डॉ. शेख यांनी सेवा दिली आहे. रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले कर्तव्य बजावणारे डॉ. तारि...
मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या 
सिटिझन जर्नालिस्ट

मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या

ज्योत्स्ना राणे काय होता तीचा गुन्हा म्हणुन दिलीस का रे, तीला सजा. हेच ना तुझावर प्रेम केले? श्रद्धा वालकर, आफताबची प्रेम कहाणी ऐकुन रुह कापुन येते. श्रद्धाने प्रेम केल्यास तिचे ३५ तुकडे करण्यात आले. आई वडीलांनी हिंदु आणि मुस्लिम धर्माला विरोध केल्याने श्रद्धा आफताब सोबत घराबाहेर पडली. त्यांच्यात भांडण झाली म्हणुन आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे करुन फिजमध्ये ठेवले आणि थोडे करुन जंगलमध्ये फेकले. हे हत्याकांड एकच मुला-मुलींना एकच शिकायला देते, हिंदु असो किंवा मुस्लिम, आई वडीलांच्या विरोधात जाऊ नका. मुलींनो तुम्ही ६ महिन्याच्या प्रेमासाठी आई वडीलांनी जे तुमच्यावर २०, २५ वर्ष प्रेम केले. ते का विरुन जातात आणि आफताब सारख्या हैवानाचे शिकार होतात. आई वडीलांनी खुप स्वप्न बघीतलेली असतात. तुमच्या लग्नाची आणि तुम्ही ज्या मुल आणि त्याचा परिवाराची काही माहीती नसते. अशा मुलांचा हात धरुन पळुन जा...
‘मी युथ आयकॉन : माझी उत्कृष्ट कामगिरी’ या स्पर्धेमध्ये श्रुती अक्कलकोटेला उत्तेजनार्थ पारितोषिक
पुणे, शैक्षणिक

‘मी युथ आयकॉन : माझी उत्कृष्ट कामगिरी’ या स्पर्धेमध्ये श्रुती अक्कलकोटेला उत्तेजनार्थ पारितोषिक

हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फले पुणे विद्यापीठ, पुणे आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट बारामती शारदाबाई पवार महिला महाविद्यालय यांच्या वतीने दि. 16 ते 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपन्न झालेल्या स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये महाराष्ट्रातील विविध 93 महाविद्यालयातून 1,875 विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. या निवासी शिबिरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील दहा विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये मी युथ आयकॉन: माझी उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील कु. श्रुती बसवराव अक्कलकोटे ह्या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पारितोषिक आणि ट्रॉफी मिळाली. या स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, उपप्राचा...
मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या
पिंपरी चिंचवड

मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या

मनपाच्या क्रीडा धोरणात ऑलिम्पिक विचारांचा दृष्टिकोन ठेवा पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवडच्या वतीने आज आयुक्त शेखर सिंह यांना व्यापक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या बद्दल आम आदमी पार्टीच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकारच्या २००१ च्या क्रीडा धोरणातील विविध शिफारशीचा अवलंब मनपा प्रशासनाने केलेला नाही.पायाभूत सुविधासह भारतीय मैदानी व ऑलिम्पिक दर्जाच्या खेळासाठी शहरातील खाजगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देणारे मनपाचे क्रीडा धोरण असले पाहिजे,त्यासाठी आम्ही खालील मागण्या आयुक्त साहेबांना केलेल्या आहेत असे आप क्रिडा आघाडी अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले. 'आप'च्या व्हिजन डाक्युमेंट मध्ये आमचे क्रीडा धोरण स्पष्ट करत आहोत असे शहर कार्यकारी...
राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश
विशेष लेख

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना 'जोडे मारो' (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्रीआंदोलनकर्ते मागवले होते की काय? दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धतीने गे...
श्री गजानन बाल संस्कार केंद्राची घोरदेश्वर येथील सहल उत्साहात 
पिंपरी चिंचवड

श्री गजानन बाल संस्कार केंद्राची घोरदेश्वर येथील सहल उत्साहात

पिंपरी : लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.. या म्हणीप्रमाणे नेवाळे वस्ती चिखली (Chikhali) येथे श्री गजानन बाल संस्कार केंद्र प्रत्येक रविवारला घेण्यात येते. केंद्राच्या वतीने घोरदेश्वर येथे बालचमूंसची सहल काढण्यात आली होती. सकाळी साडेसहाला नेवाळे वस्ती येथून घोरदेश्वरला निघाले व सात वाजता डोंगर चढण्यास सुरुवात झाली. सहली मध्ये ४ वर्षाच्या बालपासून ते १२ वर्षाचे बालक सहभागी झाले होते. सर्वजण प्रथमच डोंगर चढत होते. त्यामुळे डोंगर चढतांना सर्वांना खूपच मजा आली, वरती पोहचल्या नंतर सर्वांनी व्यायाम केला तसेच खेळ सुद्धा झाले नंतर पद्य म्हटले नंतर सर्वांनी घरून आणलेला नाश्ता केला. या साहिलीमुळे मुलामध्ये गड किल्ले बघण्याची ओढ निर्माण झाली. बालवयात अशा प्रकारचे छंद निर्माण होणे, खूप महत्वाचे. या सहलीचे आयोजन मंगेश पाटील यांनी केले होते. या सहलीमध्ये त्यांना श्रीकृष्ण काशीद, चिरतन कुलकर्...