थेरगाव दफनभूमीसाठी सर्वपक्षीय आमदार सकारत्मक; खासदारही लक्ष घालणार
कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने श्रीरंग बारणे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे यांना निवेदन
पिंपरी : थेरगाव, काळेवाडी परिसरामध्ये मुस्लिम कुटुंबात एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास दफनविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने प्रशासनाकडून समाजावर अन्याय होत आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत मागील महिनाभरापासून कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने परिसरात अनेक बैठका घेण्यात आल्या. लोकांमध्ये जनजागृती करून मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला.
या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पत्र पाठवण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील तसेच उपसंचालक नगररचना प्रभाकर नाळे यांची भेट घेऊन दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
दरम्या...










