‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे नवीन पुस्तक प्रकाशित
लोकमराठी न्यूज नेटवर्क : प्रा. डॉ. शरद गायकवाड लिखित नवा ग्रंथ 'प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा' नुकतंच छापून आलं आहे. या पुस्तकात इतिहासाच्या पानात दडलेल्या २२ महाण व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला गायकवाडांनी प्रकाशात आणले आहे.
सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ, फुले-आंबेडकरी चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, नामांतराची चळवळ, कला-सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे प्रतिभावंत नायक, अशा अनेकांचा परिचय या पुस्तकातून होतो आहे.
साहित्य आणि सामाजिक चळवळीत झोकून देऊन काम करणारे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचा हा ग्रंथ विकत घेवून त्यांच्या लेखनाला पाटिंबा देणे हे मातंग समाजातील शिक्षीत लोकांचे आद्य कर्तव्य आहे, आणि मातंग समाज हा ग्रंथ घेणार, हा मातंग साहित्य परिषदेचा विश्वास आहे. या नव्या पुस्तकाचे मातंग साहित्य परिषद स्वागत करीत आहे. अशी प्र...