लोकोपयोगी उपक्रमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागरिकांशी जोडणार नाळ
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा निर्धारयुवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या पुढाकाराने 46 प्रभागात कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागात विविध लोकोपयोगी उपक्रमातून नागरिकांशी नाळ जोडण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा निर्धार करण्यात आला आहे. शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची आखणी केली आहे.
शहरातील शेवटच्या नागरिकांना वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदैव तत्पर आहे. लोकांची कामे करणे, अजित दादा पवार यांच्या विचारधारेवर आणि विकासाच्या पावलावर पाऊल ठेवून युवक आघाडी वाटचाल करणार आहे. त्यासाठी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे अयोजन केले...