काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : काळेवाडीतील एमएम महाविद्यालयालगतच्या छत्रपती चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशाने आपल्या हृदयात अनेक वीर पुत्राची यशोगाथा कित्येक शतकापासून जतन केलेली आहे. हे वीर पुत्र आपल्या पावन भूमीत जन्माला आले, हे आपले केवढे सौभाग्यच.
या महान विभुतींच्या वीरगाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात, आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो. तर त्यांचे कर्तृत्व डोळ्यांनी पाहता आले असते. असे विचार मनाला स्पर्शून जातात.
आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होवून गेला. अखंड भारतवर्षांत आपल्या कर्तृ...