Tag: Marathi News

VIDEO : चिखलीत आढळलेल्या १८ किलो व नऊ फुटी अजगराला मिळाले जिवनदान
पिंपरी चिंचवड

VIDEO : चिखलीत आढळलेल्या १८ किलो व नऊ फुटी अजगराला मिळाले जिवनदान

पिंपरी : चिखली येथील नेवाळे वस्ती परिसरात आढळलेल्या १८ किलो वजनाच्या व नऊ फुटी लांबीच्या अजगरास सर्पमित्रांमुळे जीवनदान मिळाले. ही घटना रविवारी (ता. ३ ऑक्टोबर) रात्री घडली. https://youtu.be/Dx5cyP5ffkw वर्ल्ड फॉर नेचरचे वन्यजीव संरक्षक वैभव करूंद यांना रात्री अडीचच्या सुमारास नेवाळे यांनी संपर्क साधून मोठा अजगर आढळल्याची माहीती दिली. माहीती मिळताच वैभव करूंद घटनास्थळी निघाले. त्यांगा वाटले त्या ठिकाणी घोणस जातीचा साप असेल, कारण बऱ्याचदा लोक घोणस दिसल्यानंतर अजगर आला आहे. अशी माहाती कळवतात परंतु, नेवाळे वस्तीमध्ये पोहोचल्यानंतर करूंद आश्चर्यचकीत झाले. कारण, अजगर हा शहरी भागात आढळत नाही. एवढ्या मोठ्या अजगरास पकडणे एकट्याला शक्य झाले नसल्याने करूंद यांनी विशाल पाचूडे यांची मदत घेऊन अजगरास पोत्यामध्ये टाकले. त्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी मुळशी तालुक्यातील उरवडे ...
मुलाची वडिलांना आगळ्या-वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड

मुलाची वडिलांना आगळ्या-वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड खान मालक संघटनेचे दिवंगत अध्यक्ष लक्ष्मण भिमराव भोसले उर्फ तात्या यांना त्यांचे चिरंजीव अमित भोसले यांची स्तुत्य उपक्रमातद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. माजी महापौर हनुमंतराव भोसले यांचे बंधू तसेच विद्यमान नगरसेवक राहुल भोसले यांचे चुलते व युवा नेते अमित भोसले यांचे वडील दिवंगत लक्ष्मण (तात्या) भीमराव भोसले अध्यक्ष मोशी खाणमालक संघटना यांचे ११ सप्टेंबर २०२१ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. तात्यांना गेल्या सहा वर्षापासून यकृताच्या विकाराने ग्रासले होते. त्यांना दिवसाआड डायलिसिसची गरज होती. त्यासाठी तात्यांचे चिरंजीव अमित भोसले यांनी डायलिसीस मशिन आरो प्लांट व आयसीयू बेडची घरीच व्यवस्था केली होती. तात्यांच्या निधनानंतर या सर्व वस्तू ज्यांची किंमत जवळपास बारा लाख रुपये आहे. या सर्व वस्तू अमित भोसले यांनी तात्यांच्या स्मरणार्थ श्री मार्तंड देवस्था...
शंभर वर्षे जुन्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे
पुणे

शंभर वर्षे जुन्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

https://youtu.be/vw2IXkyzxtU पुणे : शिवसेना खडकवासला व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील १०० वर्षांपेक्षा जुने असणाऱ्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यावेळी विभाग प्रमुख निलेश गिरमे, राम तोरकडी, विजय कणसे, निलेश पोळ, सुमीत चाकणकर, अतुल घुले, लोकेश राठोड व आदित्य वाघमारे उपस्थित होते....
एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सदभावना दिवस साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सदभावना दिवस साजरा

हडपसर, पुणे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दिवस साजरा करण्यात आला. भारतात विविधतेत एकतेची भावना दृढ व्हावी. राज्यातील विविध प्रदेशात अनेक धर्माच्या अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये ऐक्याची भावना वाढावी. यासाठी सदभावना शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय जगताप उपप्राचार्य, डॉ.संजय जडे, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ.अतुल चौरे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता....
आकुर्डीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

आकुर्डीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आकुर्डी : येथील आम आदमी पार्टीचे युवाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांच्या कार्यालयात विनायक सुबेदार चव्हाण व योगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरातील ई. १० वी , १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आप पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी अनुप शर्मा, स्मिता पवार, किशोर जगताप, वैजनाथ शिरसाठ, वहाब शेख, यशवंत कांबळे.आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाठक आणि सुभाष चौधरी यांनी केले....
दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण
पिंपरी चिंचवड

दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण

पिंपरी : पिंपरी चौकात गेल्या वर्षी मानवता हिताय व कामगार बांधकाम सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला 1 वर्ष पुर्ण झाले असून, बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ सर्व वृक्षे त्यांना समर्पित करण्यात आली. तसेच फलकाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी श्रीमती आशा जयंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्षा माधवी जयंत शिंदे, उपाध्यक्ष सतीश भांडेकर, कार्याध्यक्ष दिपक म्हेत्रे, मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल कोळी यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ऍड. सुशील मंचरकर, नेते व सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, नितुल पवार, गणेश आहेर, चंद्रकांत बोचकुरे, राहुल विटकर, अजय (बाबा) कांबळे, अजय धोत्रे, अतुल धोत्रे आदी उपस्थित होते. ...
विनोदाची इंटरनॅशनल कंपनी: जॉनी लिव्हर
मनोरंजन

विनोदाची इंटरनॅशनल कंपनी: जॉनी लिव्हर

दासूृ भगत आशिया खंडातील सर्वात मोठी झाेपडपट्टी धारावी ही काही अभिमानाने सांगायची मुळीच गोष्ट नाही पण धारावीचा उल्लेख असाच होतो. धारावी माटूंगा लेबर कॅम्प वस्तीत या पोराचा जन्म झाला. येथील मुलांना बालपण नावाची अवस्था असते का? तिन बहिणी आणि दोन भावाच्या कुटूंबात हा सर्वात मोठा. जॉन राव हे याचं नाव. खूप पूर्वीच आई वडील आंध्र प्रदेश सोडून मुंबईत आले होते. वडील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत मशीन ऑपरेटर होते. जॉन १० वर्षांचा असताना कुटूंब किंग्ज सर्कल परीसरातील झोपडपट्टीत स्थायिक झाले. निसर्ग पावसाळ्यात अशा वस्तीवर जरा अधिकच उदार होतो. झोपडीतून जेथून जमेल तेथून तो कुटूंबाना कडकडून भेटत राहतो. जॉन पण आपल्या भावा बहिणी सोबत खाटेवर किडूक मिडूक सांभाळत बसून राही. आई वडील घरात साचलेले गुडघाभर पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत. छपरातून पण गळती सुरू होई मग जॉन एखादे भांडे घेऊन त्यात ...
शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : "तळागाळातले लोक शिकून मोठे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्यांनी आता जातीपातीतच अडकून न पडता त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला पाहिजे", अशा आशयाचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी केले. ते काळेवाडी येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे होते. व्हिडिओ पहा https://fb.watch/7mihnlWzG-/ मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र ह्या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी ह्या दोहोंच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. ह्या प्रसंगी पिंपरी येथे संपन्न झालेल्या ८९ व...
दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन

पिंपरी चिंचवड : उद्योजक सुरेश सखाराम शिंदे (वय ६१, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे रविवारी (ता. ८) दुपारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यानं नातेवाईक व मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे. काळेवाडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. वडगाव गुप्ता (ता. व जि. अहमदनगर) या मुळगावी रविवारी रात्री त्यांच्यावर मोठ्या दुख:मय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले दोन, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे व इंजिनिअर सचिन शिंदे यांचे ते वडील होत. ते कायमच पुरोगामी व स्पष्टवक्तेपणा विचाराचे पुरस्कर्ते होते. भोसरी एमआयडीसीतील कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत १९९२ साली त्यांनी आर. एस. इंडस्ट्रीज या कंपनीची स्थाप...
चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन
महाराष्ट्र, मोठी बातमी

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन

मुंबई : हरियाणातील मुलगा व त्याची फेसबुकवरील राजस्थानातील मैत्रीण दोघेही जानेवारी महिन्यापासून गायब आहेत. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मुलीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याने ते दोघेही मुंबईत असल्याची शक्यता आहे. या दोघांना शोधण्यास मदत करण्याचे पालकांनी आवाहन केले आहे. राजेश चुघ (रा. घर नंबर 512/ 21, गल्ली नंबर 1, नरेंद्रनगर, सोनीपत हरियाणा) यांचा मुलगा सौरभ चुघ (वय 18, उंची 5 फूट 11 इंच) हा घरातून 29 जानेवारी 2021 पासून गायब आहे. याप्रकरणी सोनीपत सिव्हिल लाईन पोलिसमध्ये फिर्याद दिली आहे. तर या मुलाची फेसबुकवर नंदिनी या एका मुलीशी मैत्री झाली. ती राजस्थानची राहणारी असून तीही त्याच दिवसापासून तिच्या घरातून गायब झाली आहे. नंदिनीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याचे तिच्या मेल्सवरून निश्चित होते आहे. ही दोन्ही मुले मुंबईत आहे असे समजते. सौरभचा मोबाईल नंबर 82...