चिंचवडमधील सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करा
पिंपरी चिंचवड मातंग समाजाच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेत तीव्र मागणी
पिंपरी : चिंचवड येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार व अत्याचार झालेल्या घटनेचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मातंग समाज बांधवानी एकत्रित येऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच उर्वरित दोन आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पिडीत मुलीला व तिच्या परिवारास योग्य तो न्याय मिळवून देत त्या परिवारास पोलिस संरक्षण द्यावे यासाठी आज सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने पीडित कुंटुबाला पोलिस संरक्षण देणे, उर्वरित दोन आरोपीना तात्काळ अटक करून त्यावर कठोर कारवाई करणे तसेच अशा घडणाऱ्या घटनांना पायबंद घालणे, पीडित मुलीला न्...










