पिंपळे सौदागरमध्ये स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप (MLA Laxman Jagtap) यांना पिंपळे सौदागर येथे दुख:मय वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात बुधवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा कुंदा भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, आनंद हास्य क्लब राजेंद्रनाथ जयस्वाल, अल्कोवे सोसायटीचे अध्यक्ष विजय भांगरे, शरद दाऊतखानी, कल्पना बागुल, तात्या शिनगारे, उत्तर महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे संपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर, श्रीकृष्ण निलेगावकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
त्याप्रसंगी लक्ष्मणभाऊ यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना अनेकांना भावना अनावर झाल्या.
लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली ...