जॅकवेल ठेकेदार नागपुरात अपात्र, पिंपरीत पात्र
आता फौजदारी कारवाईची राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची मागणी
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, दि. ५ : भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेल निविदा प्रकरणातील ठेकेदार कंपनी गोंडवाना इंजि. ही ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे नागपूर स्मार्ट सिटीच्या कामात अपात्र ठरलेली असातना ती पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र पात्र ठरली आहे. खोटी माहिती देऊन महापालिकेची फसवणूक केल्या प्रकऱणी या ठेकेदार कंपनीवर फौजदारी कारवाई कऱण्याची मागणी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करण्याची विनंती गव्हाणे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकऱणात महापालिकेचे अधिकारी, सल्लागार आणि काही राजकारणी यांचे संगमनत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या पाठिंब्याने महापालिकेत भामा आसखेड जॅकवेलच्या कामात होत असलेल्या...










