Tag: Pune

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव

पिंपळे सौदागर, ता. 30 : येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना रूग्ण संख्या विचारात घेता अपुरा पडत आहे. तोकड्या जागेमुळे कर्मचाऱ्यांसह रूग्णांचेही मोठे हाल होतात. त्यामुळे लवकरात लवकर या दवाखान्याचा विस्तार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे. याबाबत जाधव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ एक ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक उपचार घेण्यासाठी या दवाखान्यात येतात. दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडीची सेवा घेतात. संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच बालक लसीकरण मोहीमही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी, निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जातात. परिणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ...
“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे
पुणे, शैक्षणिक

“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे

हडपसर (प्रतिनिधी ) : भारत हा सर्वधर्म समभाव जोपासनारा देश आहे. प्रत्येक रयत सेवकाने व विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करण्याचा हा काळ आहे. रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस घडत आहे. हा माणूस जात-धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा असावा. सर्व धर्म समभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडायला पाहिजे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर व कर्मवीर यांनी दाखवलेली वाट हीच प्रकाशाची वाट आहे. महापुरुषांना जाती धर्मात न बांधता आपण सर्व माणूस होण्याचा प्रयत्न करूया. जातीचा अंत झाला, तरच भारत देश महान होईल. भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला थोर महापुरुषांचे विचार समजावून सांगितले तरच संस्कारित पिढी निर्माण होईल. ही पिढी भारत देशाला बलवान करेल. आपण सर्वजन कर्मवीरांचा समतेचा व मानवतेचा विचार समाजात रुजवूया. असे विचार प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखक संपादक मा. संजय आवटे यांनी एस. एम. जोशी कॉले...
ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन
पिंपरी चिंचवड

ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन

पिंपरी, ता. २७ सप्टेंबर २०२२ : ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांच्या श्रीमती मातोश्री इंदुबाई गणपत माने (वय ७२ वर्षे ) यांचे सोमवारी (ता. २६) रात्री निधन झाले. त्यांच्या मागे ॲड. सुनील माने आणि ॲड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती इंदुबाई माने यांच्या पार्थिवावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभुमी येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

हडपसर, ता. २६ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर व रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 वा जयंती सोहळा मंगळवार दि. 27 सप्टेंबर 2022 सकाळी 10:30 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक, दैनिक लोकमतचे संपादक मा. संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, उपविभागीय अधिकारी एस .टी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. अशी माहिती एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी दिली. ...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रथम महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करुन 'ईवेस्ट कचऱ्याची समस्या' या विषयावर अत्यंत प्रभावी पथनाट्य तयार केले. त्यानंतर हडपसर येथील साधना संकुलातील शाळा व माळवाडी गावात जावून पथनाट्य सादर केले. या पथनाट्यास विद्यार्थी व नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पथनाट्याचे संवाद व दिग्दर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विराज नवले याने केले. या पथनाट्यात १६ विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२० स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता केली. अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब या...
आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे
पिंपरी चिंचवड

आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे

पिंपरी : आकुर्डी प्राधिकरण येथील निवासी भागातील कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करावे. पिंपरी भाजी मंडई गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न, प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील नागरिकांच्या अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना आदी विषयांवर आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी केली. शुक्रवारी पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात आ. आण्णा बनसोडे यांनी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रसाद शेट्टी तसेच अनुप मोरे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश लांडगे, प्रतीक इंगळे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. आकुर्डी प्राधिकरणातील कचरा संकलन के...
क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर 
पिंपरी चिंचवड

क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू व वर्ग संख्या वाढविण्याची मागणी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत वाळुंजकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार स्मार्ट शहर ओळखले जाते. शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडवण्याच्या दृष्टिकोनातून व प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधनी विद्यालय स्थापन करण्यात आले. पण, मनपाच्या माध्यमातून असणारे क्रीडा प्रबोधिनी विद्यालयमध्ये मराठी मिडीयममध्ये शिकवले जात असून यामुळे शहरातील खेळाडू विद्यार्थी यांच्या पाल्यांचा इंग्लिश मीडियममध्ये शिकण्याचा कल जास्त प्रमाण असते. यामुळे अनेक खेळाडू विद्यार्थी यांची इच्छा असून देखील क्रीडा प्रबोधनी कडे येऊ शकत नाहीत. शहरातील खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने&...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : स्वतःची ब्युटी सलून, स्पा थेरपी अँड मॅनेजमेंट, ब्युटी कौन्सेलर, मेकअप आर्टिस्ट, मेकअप ट्रेनर, हेअर ड्रेसर, हेअर डिझायनर, न्यूट्रिशन डायजेशन कन्सल्टंट, फिटनेस ट्रेनर अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ब्युटी आणि वेलनेस पदवीस्तरीय कोर्स करणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम करून आपण स्वावलंबी जीवन जगले पाहिजे. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलांबरी थोरात यांनी बी.होक. विभाग आयोजित एक दिवसीय ब्युटी अँड वेलनेस च्या सेमिनारमध्ये व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, कौशल्यपूर्ण कोर्स करून जीवनात यशस्वी व्हा. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थ्यांना पदवीबरोबर कौशल्याचे धडे या कॉलेजमध्ये दिले जातात. आपल्या भावी जीवनासाठी कौशल्यपूर्ण...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग व आय.क्यू.ए.सी.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रल्हाद जाधव यांनी विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे महत्त्व सांगितले. तसेच तरुण पिढीला व्यवसाय करायचा असेल तर कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयाचे ज्ञान असल्यास विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजना जाधव यांनी तर आभार डॉ. एम. एन. रास्ते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल पवार यांनी केले. का...
सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?
सिटिझन जर्नालिस्ट

सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?

निगडी मधील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूब रित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतू अलीकडेच काही व्यावसायिकांनी सदर पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी 'खाऊ गल्ली' चालू केली आहे.तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार चालू केला आहे. जर का निगडी उड्डाणपुलाखाली ' खाऊ गल्लीच' उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे. दिपक खैरनार ...