Tag: Pune

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध – वेदांग महाजन
राजकारण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध – वेदांग महाजन

पुणे (लोकमराठी न्यूज) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर बेताल वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंग आहे. अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. असे प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी यापुढे अशी बेताल वक्तव्य केल्यास मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हालगी आंदोलन कलाकारांना सोबत घेऊन केले जाईल. असा इशारा इशाराही वेदांग महाजन यांनी दिला‌ आहे. ...
कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे 
पुणे

कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे

पुणे (लोकमराठी न्यूज) : कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे या संस्थेची महाराष्ट्र नवनिर्वाचित कार्यकारणी २०२३-२०२४ नुकतीच जाहीर करण्यात आली. रुपेश मोरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्ती कार्यकारिणीचा सत्कार पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मेत्रे वस्ती (चिखली) येथे करण्यात आला. उपाध्यक्षपदी संदीप जाधव व मंगेश घाग, सचिवपदी प्रा. संदीप सकपाळ, सहसचिवपदी समीर चव्हाण, कार्याध्यक्षपदी संतोष कदम व राहुल ढेबे, खजिनदारपदी नंदकुमार महाडिक व महेश गोरे तसेच उत्सव कमिटी अध्यक्षपदी कैलास मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी अठरा गाव मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम कॅप्टन श्रीपत कदम, गजानन मोरे, दत्तात्रय सकपाळ, पांडुरंग कदम व युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते. युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी युवाशक्तीची पुढील वाटचाल...
भोसरीतील गवंड्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; झोपडीत राहणार्‍या नीलेश बचुटेची यशाला गवसणी
यशोगाथा

भोसरीतील गवंड्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; झोपडीत राहणार्‍या नीलेश बचुटेची यशाला गवसणी

पोलीस उपनिरीक्षक बनून नीलेश बचुटेने फेडले कष्टकरी मायबापाचे ऋण पिंपरी : पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठरा विश्वं दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, वडिल गवंडी, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण; मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिलांनी गवंडी काम करत चार पैसेगाठीला बांधून नीलेशला चांगलं शिक्षण दिले आणि त्याचे चीज करीत अखेर नीलेशनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या 4 जुलैच्या निकालात उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि गवंड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सर्व नातेवाईक गहिवरून गेले. काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही, हे नीलेशने सिध्द करून दाखविले आहे. क...
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात २५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे व संस्थापक संजय भिसे, विठाई वाचनालयाचे सभासद विलास जोशी, देवराव वैद्य, श्रीकृष्ण नीलेगवकर, रमेश वाणी, सुभाषचंद्र पवार, दिलीप चौघुले आदी उपस्थित होते. याबाबत उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या की, " सजीवांचे रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांनाच पर्यावरणाचे संवर्धन व संतुलन राखणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वतःपासून थोडे तरी प्रयत्न करू शकतो. सध्या प्लास्टिक हा पर्यावरणास हाणी पोहोचवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. त्या अनुषंगाने उन्नती सोशल फाउंडेश...
‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी, शैक्षणिक

‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : गरीब कुटुंबातील मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण मिळावे या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) मूळ उद्देशाला धाब्यावर बसवण्याचा प्रकार चिंचवड येथील शाळेत घडला आहे. चिंचवड येथील एका नामांकित अशा इंटरनॅशनल स्कूल या शाळेत 'आरटीई' मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग करून त्यांना शाळेच्या मुख्य इमारातीपासून दूर वेगळ्या ठिकाणी त्यांना शिकवले जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नायकवडी यांच्याकडे ही तक्रार केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील या शाळेत उच्चभ्रू वर्गातील मुले शिकतात 'आरटीई' च्या नियमानुसार शाळेला 25% प्रवेश गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे, शाळेने ही प्रक्रिया पूर्ण केली; पण शाळा सुरू झाल्...
नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला 
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला

लोकमराठी न्यूज नेटवर्क | १ जुलै २०२३ बुलढाणा : येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, तिला का...
YCM : वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 
पिंपरी चिंचवड

YCM : वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

पिंपरी : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय (वायसीएम) प्रवेशद्वारावर अल्पसंख्यांक विकास महासंघ, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी व शहाजमात यांच्यातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते. याआंदोलनाची दखल गेत वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. संजय वाबळे यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी झालेल्या चर्चेत जनतेच्या तक्रारी बद्दल जास्त जोर देण्यात आला. त्यामध्ये बाहेरील औषध गोळ्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल चर्चा करण्यात आली. (YCM Hospital) वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वायसीएम प्रशासनाला देण्यात आला. https://youtu.be/z0H8SOM9IZk यावेळी अल्पसंख्यांक विकास महासंघचे संस्थापक अध्यक्ष रफिक भाई कुरेशी, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्याम कुमार कसबे, युवा अध्यक्ष साजिद शेख, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पि...
कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड
पुणे

कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड

पुणे : कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड पंचायत समिती सभापती अमर कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य कमल कड, माजी सरपंच व विद्यमान सदस्य शरद मुऱ्हे, माजी सरपंच देवराम सोनवणे, कविता गायकवाड, माजी उपसरपंच एम. के. सोनवणे, विजय कांबळे, अमोल सोनवणे, शोभा गायकवाड, नेहा बागडे, विशाल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिपक डोंगरे, गुलाब कांबळे, मनिषा मुऱ्हे, जैदाताई, माधुरी मालशिखर, तसेच माजी सदस्य स्वप्निल काबळे, जितेंद्र कांबळे (SRP खेड ता. अध्यक्ष) पो. पा...
संविधान लागू झाल्यापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच असताना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे – प्रा. बी. बी. शिंदे 
पिंपरी चिंचवड

संविधान लागू झाल्यापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच असताना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे – प्रा. बी. बी. शिंदे

चिंचवड, ता. २६ : आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असून, खरे बोलणे हा देशद्रोह ठरवला जात आहे. शिवाय हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. जेव्हापासून देशात संविधानाचा आमल सुरू झाला, तेव्हापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच तर आहेत. मग यांना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे. यांना हिंदुराष्ट्र या नावाने, ब्राह्मण राष्ट्र, मनुस्मृती, जातिभेदावर आधारित असणारे राष्ट्र निर्माण करून, भारतीय संविधान बाजूला करावयाचे आहे. हे बहुजनांनी पक्के लक्षात ठेवून, त्यांना खऱ्या अर्थाने सतेतून दूर करणे आवश्यक आहे. त्याकरिता या देशातील सर्व भारतीय नागरिकांनी सम विचारांनी आपले सर्व गट तट, विविध पक्ष, संघटना, विसर्जित करून, या देशातील बहुजन समाजाला न्याय मिळणे कामी, सर्वांनी या विषमतावादी शत्रूचा नायनाट करणेसाठी, सर्वांनी मिळून, एकत्रित लढा लढण्याची काळाची गरज आहे. हीच खरी या रयतेच्या राज...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाहू महाराजांना अभिवादन
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाहू महाराजांना अभिवादन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विश्वजीत काटे याने शाहू महाराज यांच्या जीवनावरती पोवाडा गायला, तसेच प्रियंका शहाबादे व प्रज्ञा शिरोडकर यांनी शाहू महाराजांविषयी माहिती सांगितली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण चाबुकस्वार म्हणाले; माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे शाहू महाराज हे मोठ्या मनाचे राजे होते, सर्वसामान्य माणसाला राज्यात मान व विद्वान तस...