Tag: Pune

लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न
पुणे

लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न

लोणावळा, दि.१९ (लोकमराठी) - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या तसेच, तळेगाव दाभाडे येथील कार्यकर्त्यांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोहगडावरील महादेव मंदिरात जि. प.सदस्या अलका धानिवले व गणेश धानिवले यांचे वतीने अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते. शिवघोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी रायगड मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, प्रकाशराव मिठभाकरे,पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ...
महाशिवरात्री निमित्ताने वडगाव मावळात भाऊ बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न
पुणे

महाशिवरात्री निमित्ताने वडगाव मावळात भाऊ बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न

वडगांव मावळ, दि.१८ (लोकमराठी) - मावळ महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने पहाटे पाच वाजता विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त तुकाराम ढोरे अरुण चव्हाण, किरण भिलारे,चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला व नंतर सकाळी आठ वाजता रूढी -परंमपरेने चालत आलेला श्री पोटोबा महाराज व सांगवी येथील जाखमाता देवी या ठिकाणी पालखी सोहळा नेऊन भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले,नंतर तेथील पुजारी भक्त,कैलास खांदवे, शंकर पवार व देवस्थान चे विश्वस्त यांचे हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी स्नान करण्यात आले,नंतर देवस्थान चे वतीने जाखमाता देवीला साडी,ओटी,खन,नारळ यांचा मान देण्यात आला.सांगवी मधील भजनी मंडळ व काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व नंतर उपस्थित भाविकांला उपवासाच्या निमित्...
रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत बेल्हेकर यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड

रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत बेल्हेकर यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड (लोकमराठी) - रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली. असे नियुक्ती पत्र बेल्हेकर यांना रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी दिले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवने पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना उभारली पाहिजे. वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तत्परता दाखवून सक्रीय रहावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे....
युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
पिंपरी चिंचवड

युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

पिंपरी, दि. १७ : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त चिंचवड-बिजलीनगर येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये वृद्धांना आवश्यक गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र दर्शन सिंग, राष्ट्रीय सचिव प्रदीप सिंधव, प्रदेश महासचिव अनिकेत नवले, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, जिफिन जॉन्सन, मयुर रोकडे, मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुहास गोडसे व कार्यकर्ते उपस्थित होते. मातृसेवा सेनाभावी संस्था निराधार, वृद्ध महिलांचा स...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली 
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

पिंपरी, दि. १४ फेब्रुवारी २०२३ : जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याला आज ४ वर्षे झाली आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, विनिता तिवारी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, जिफिन जॉन्सन व कार्यकर्ते उपस्थित होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यामध्ये ४० जवान शहीद झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या हल्ल्याला आता ४ वर्ष झाले आहेत. मा...
राहुरी महाविद्यालयाच्या गौरी सत्यजीत कराळे – तनपुरेंना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक
पुणे

राहुरी महाविद्यालयाच्या गौरी सत्यजीत कराळे – तनपुरेंना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक

राहुरी, दि.१३ (लोकमराठी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एम.ए पदव्युत्तर कला शाखेच्या परीक्षेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील गौरी सत्यजीत कराळे-तनपुरे हिस "श्रीमती नलिनी ठक्कर सुवर्णपदक"प्राप्त झाले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारेयांनी दिली. प्राचार्य डॉ. संभाजी पठारे म्हणाले,आपल्या महाविद्यालयातील गौरी हिचे यश हे सर्वांना दिशादर्शक असून यातून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व आपल्या महाविद्यालयाची यशाची परंपरा अशीच सुरु राहिल. हे मिळालेले सुवर्णपदक महाविद्यालय व संस्थेच्यादृष्टीने अत्यंत गौरवास्पद म्हणावे लागेल. महाविद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेत आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले. सुवर्णपदकांची मालिका खंडित...
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा

पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. शिवरायांच्या संदर्भात असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे. दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधी मध्ये ही प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न होणार आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिवप्रेमींना ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे आपले जीवनमान उंचावले आहे. त्यातील एक भाग म्हणजे सोशल मिडीयाचा समाजावर निर्माण झालेला प्रभाव, याचा प्रकर्षाने विचार करावा लागेल. तरूणाई सोशल मिडीयाच्या आभासी जगात भरकटून जाताना दिसत आहे. या तरू...
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द
पुणे, मोठी बातमी

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

पुणे, दि. ८ फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेचे शिक्षक नेते संभाजीराव शिरसाट व इतर सहकार-यांवरील शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सध्यास्थितित महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे येथे कार्यरत असलेल्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक पुणे येथे शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना २०१७ साली हा गुन्हा दाखल केला होता. या संपुर्ण प्रकरणाची माहिती अशी की, २०१७ मध्ये शिवसेनेचे शिक्षक नेते संभाजीराव शिरसाट व इतर सहकारी शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. पुणे या कार्यालयात गेले होते. कार्यालयामध्ये गेल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली. त्यानंतर सर्व शिक्षक पदाधिकारी त्या कार्यालयातून निघून गेले. मात्र, त्यावेळेस नंतर संभाजीराव शिरसाट व इतर सहकारी यांच्यावर शैलजा...
प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट 
शैक्षणिक, पुणे

प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविदयालयातील मानसशास्त्र विभागाचे विद्यार्थी व शिक्षकांनी प्रादेशिक मानसिक रुग्णालय येरवडा येथे भेट दिली. सदर भेटीमध्ये सर्व विदयार्थ्यांना रुग्णालयाची परिपूर्ण माहिती रुग्णालयाचे सामाजिक अधिकारी मोहन बनसोडे यांनी दिली. रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया, नवीन कायद्या संदर्भातील माहिती, तसेच रुग्णांची दैनंदिन दिनचर्या याविषयी प्रात्यक्षिक दाखविले. रुग्णांसाठी उपचार पध्दती कोणत्या स्वरूपात दिल्या जातात उदा: डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, स्पंज थेरपी याची माहीती दिली. तसेच त्या रुग्णांना उपचार पद्धती कशा प्रकारे उपयोगी पडते यांची माहीती दिली. रुग्णालयामध्ये असलेल्या महिला रुग्ण व पुरुष रुग्ण यांचे विकृती संदर्भात : वर्तन कसे होते. यांची माहिती दिली. त्यांना दिला जाणारा आहार आणि त्यांचे वेळापत्रक यांची माहिती दिली. ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री. अंकुश कारकर यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे पाटील यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे यांनी दोन्ही सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या. भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री.अंकुश कारकर यांनी नोकरीला नोकरी न समजता रयत शिक्षण संस्थेत सेवा म्हणून काम केले. हे रयतेचे दोन्ही गुणी सेवक असल्याचे गौरवउद्गार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी काढले. याप्रसंगी अनंतराव पवार कॉलेज पिरंगुट येथील प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या विद...