Tag: Pune

निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
पिंपरी चिंचवड

निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी पिंपरी: निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंत असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण हे एका महिन्यापूर्वीच करण्यात आले होते.सदर डांबरीकरण केलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंतच्या रस्त्याचे एका महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. त्यातच या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.खडीवर पु...
बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग
राजकारण

बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग

भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्याचा केला निर्धार लोकमराठी न्यूज : बेंगलोर येथे भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ' बेहतर भारत कि बुनियाद ' या तीन दिवसीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनात भारतातल्या सुमारे ३००० युवकांनी भाग घेतला. भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात सामान्य माणसात जनजागृती करणे, बेरोजगार आणि महागाई विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणे आणि भाजपच्या खोट्या प्रचाराविरोधात लढा देणे या त्रिसूत्रीवर भर देण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. मणिपूर येथील झालेल्या घटनांचा अधिवेशनात तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला असून भारतीय युवक काँग्रेस शोषित, पीडित महिलांच्या मागे ठाम पाने उभे असल्याची ग्वाही या अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आली. भारत जोडो यात्रा हि आयडिया ऑफ इंडियाच्या रक्षणासाठी काढण्यात आलेली अ...
साहित्य सम्राटची श्रावण सहल काव्यसरींनी चिंब
साहित्य

साहित्य सम्राटची श्रावण सहल काव्यसरींनी चिंब

निगडी (लोकमराठी न्यूज) : साहित्य सम्राट पुणे संस्थेकडून माय मराठीच्या सेवेसाठी आणि संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. यावेळी संस्थेने सदाबहार सहपरिवार साहित्यिक श्रावण सहल या उपक्रमाचे आयोजन शहीद सुखदेव राजगुरू जन्मस्थान, शंभू महादेव डोंगर, चासकमान धरण आणि सॊमेश्वर मंदिर या ठिकाणी केले होते. दिवसभर साहित्यिकांनी निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेतला. सर्वांनी यावेळी महान देशभक्त शहिद चंद्रशेखर आझाद यांच्या ११७ व्या जयंती निमित्ताने साहित्य सम्राटचे १७१वे कविसंमेलन जेष्ठ कवयित्री ऍड.संध्याताई गोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मंचावर जेष्ठ गझलकार म. भा.चव्हाण. माजी जिल्हाधिकारी अशोक जाधव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सीताराम नरके, निवेदक जगदीप वनशिव आणि संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक बंद या चित्रपटातील सिताराम नरके लिखि...
सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी व पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःलाही गोळी झाडून संपवलं
ताज्या घडामोडी, क्राईम

सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी व पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःलाही गोळी झाडून संपवलं

पुणे (लोकमराठी न्यूज) : एका सहाय्यक पोलीस आयुक्तांने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वता:वर गोळी झाडून आपले जीवन संपवलं आहे. ही धक्कादायक घटना आज (ता. २४ जुलै २०२३) पहाटे घडली असून ही बातमी समजताच एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. भारत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर मोनी गायकवाड (वय ४४) असे पत्नीचे तर दीपक गायकवाड (वय ३५) असे पुतण्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे अमरावती पोलीस (Amaravati Police) दलात सहाय्यक आयुक्त पदी कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला आहे. सहाय्यक आयुक्त गायकवाड हे पुण्यात आपल्या कुटूंबाकडे आले होते. त्यांनी मध्यरात्री चारच्या सुमारास पत्नीचा व पुतळ्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भारत ...
किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता – सायली नढे 
पिंपरी चिंचवड, राजकारण

किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता – सायली नढे

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमय्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन पिंपरी (लोकमराठी न्यूज) : किरीट सोमय्या यांच्या जागी इतर पक्षाचा कोणता नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता. सोमय्या हे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही किरीट सोमय्या यांचा जोडे मारून निषेध करतो. असे म्हणत काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षा सायली किरण नढे यांनी भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा नेटा डिसूजा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने महिला अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये झालेल्या अमानवी महिला अत्याचाराच्या व किरीट सोमय्य...
वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे
पुणे

वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे

राहुरी, दि.२२ (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब गोपीनाथ गागरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सहसुल व पशुसंवर्धन मंत्री ना. श्री.राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी ही निवड केली. यावेळी समितीच्या इतर सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन समितीत नवनाथ साहेबराव म्हस्के, श्री.शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे, श्री. निजामभाई कासमभाई शेख, श्रीमती. राजश्री काळे, श्री. विजय वसंतराव गायकवाड, श्री. महादेव शशिकांत झेंडे यांचा समावेश करणयात आला आहे. शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे महाराज म्हणाले, दोन वर्षापासून नगर जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन समिती नव्हती. त्यामुळे अनेक गरजवंत युद्ध कलावंत मानधनापासून वंचित होते.आता जे जे मला भेटतील त्या सर्वांना पेंन्शन चालू करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपुरे घराण्...
तेवीसाव्या वर्षी शेतकर्‍याच्या लेकीचे घवघवीत यश; आरती गवारे राज्यात दुसर्‍या क्रमांकाने ‘एलआयसी विकास अधिकारी
यशोगाथा

तेवीसाव्या वर्षी शेतकर्‍याच्या लेकीचे घवघवीत यश; आरती गवारे राज्यात दुसर्‍या क्रमांकाने ‘एलआयसी विकास अधिकारी

निगडी येथील ओझर्डे'ज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन पिंपरी (लोकमराठी न्यूज) : काही जण सर्व काही अनुकूल असतानाही उगाच तक्रारींचा पाढा वाचतात. मात्र काही जण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी तिचा कोणताही बागुलबुवा न करता सर्व अडचणींवर मात करतात. खेड तालुक्यातील मोई येथील शेतकरी कुटुंबातील आरती गवारे नं परिस्थितीबद्दल कोणतीही तक्रार न करता तळवडे येथील आयटी कंपनी मध्ये नाईट शिफ्ट मध्ये नोकरी करत आपल्या मेहनतीच्या जोरावर एलआयसी विकास अधिकारी परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात दूसरी येत घवघवीत यश संपादन केलं आहे. तेवीसाव्या वर्षी लेकीनं मिळवलेल्या नेत्रदीपक यशाने वडिल संतोष गवारे आणि आई उषा गवारे यांना आकाश ठेंगणं झालं आहे. तिने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात ‘ एलआयसी विकास अधिकारी म्हणून नववा क्रमांक पटकवला आहे. आरतीचं हे यश अनेकांसाठी प्रेरण...
पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

पिंपरी : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शंकर जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रमविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार उमा खापरे व राज्यातील पक्षाच्या इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याबरोबरच शहरात पक्ष आणि...
संत निरंकारी मिशनचा क्षेत्रिय इंग्रजी माध्यम संत समागम संपन्न
पिंपरी चिंचवड

संत निरंकारी मिशनचा क्षेत्रिय इंग्रजी माध्यम संत समागम संपन्न

काळेवाडी (लोकमराठी न्यूज) : निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी येथे दि. १६ जुलै २०२३, रविवार रोजी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत संत निरंकारी मिशनचा विशाल इंग्रजी माध्यम संत समागम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोन मधून ३००० पेक्षा अधिक संख्येने भाविक भक्त उपस्थित झाले होते, विशेषतः यामध्ये युवा संत जास्त संख्येमध्ये सहभागी झाले होते. आज निरंकारी मिशनचा संदेश जगातील ६० पेक्षा अधिक देशामध्ये पोहोचला आहे, इंग्रजी ही जागतिक भाषा असून निरंकारी मिशनची ही प्रेमाची शिकवण संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेमधून सत्संगाचे आयोजन करण्यात येते. आपला जन्म या पृथ्वीवर आमच्या मर्जीने नाही तर परमात्म्याच्या इच्छेने झाला आहे, मनुष्य हि परमात्माची एक सर्वोत्तम रचना आहे आणि परमात्माला देखील जेव्हा अवतार घ्यायचा असतो त...
निगडीतील विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र सुरु
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

निगडीतील विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र सुरु

निगडी : विशेष विद्यार्थ्यांसाठी (मानसिक अपंग) ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे शाळा सरकारी निधीतून आणि एनजीओ द्वारे चालवली जाते. येथे हेंकेलचे अध्यक्ष सुनील कुमार यांच्या हस्ते कौशल्य विकास शाळेचे ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे सिएसआर प्रकल्प म्हणून उद्घाटन केले. यावेळी सीएसआर समिती सदस्य भूपेश सिंग, सौ.संध्या केडलया, सौ.कुंजल पारेख, मॅनेजर सचिन सपार, पी.के. वर्मा, शाळेतील शिक्षक, हेंकेल कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मुळात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांना सरकार मदत करत असते पण 18 वर्षानंतर विद्यार्थी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. यासाठी आता शाळेत कौशल्य विकासाचे छोटे उपक्रम सुरू केले आहेत ज्यात हे विद्यार्थी समाजाला विविध सेवा देतील आणि बनवलेल्या वस्तूंची विक्री करतील. हेंकेल अध्यक्षांनी केलेल्या मशिनरींचे उद्घाटन केले, ज्यामध्ये फ्लोरिंग मिल, कापूर मश...