पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टीतर्फे स्थापना दिनानिमित्त सावली निवारा केंद्रात अन्नदान
पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टीतर्फे स्थापना दिनानिमित्त सावली निवारा केंद्रात अन्नदान

पिंपरी : आम आदमी पार्टीच्या नवव्या स्थापना दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे जेवण वाटप करण्यात आले. या आधी ही सावली निवारा केंद्रात अनेकदा भेट देऊन असे उपक्रम घेण्यात आले आहेत. आज सावली निवारा केंद्राचे प्रबंधक गौतम थोरात यांनी तिथल्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा संचालित ह्या केंद्रात राहणाऱ्या लोकांचे कौशल्य पाहून त्यांचा अभिमान वाटला. अनेकांशी आपुलीकीने गप्पा मारल्या. अस बोलतांना आप पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा यांनी सांगितले. तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे महत्व आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले, व 26 /11 मुंबई येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला. आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आम आदमी पार्टीचे र...
भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई

पिंपरी : भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर फलक आणि होर्डिग्ज सर्वत्र झळकले आहे. फूटपाथ, चौका-चौकात, रस्त्यावर हे फलक लागल्याने शहराच्या विद्रुपीकरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अनधिकृत फलक, होर्डिग्ज काढण्याचे आदेश क्षेत्रीय अधिका-यांना कारवाईचे दिले. त्यानूसार महापालिकेच्या ई आणि क प्रभागात शुक्रवारी (ता. २६) अनधिकृत फलक काढण्यात सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा शनिवारी वाढदिवस आहे. आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरभर आमदार लांडगे यांचे ब्रॅडींग आणि वातावरण निर्मिती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. त्यानूसार भोसरी विधानसभा मतदार संघात त्यांच्या इच्छुक उमेदवार, समर्थक, कार्यकर्त्यांनी प्रत्येक च...
निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा – कुंदा भिसे
आरोग्य, पिंपरी चिंचवड

निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा – कुंदा भिसे

उन्नती सोशल फाऊंडेशनचा 'निरोगी आणि सशक्त पिंपळे सौदागर'चा संकल्प पिंपळे सौदागर : निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचे असल्याचे हजारो वर्षांपासून सांगितले आहे. योगामुळे विविध आजारांवर मात करता येते. असे प्रतिपादन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी येथे कैले. पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत योग शिबीर सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 'निरोगी आणि सशक्त पिंपळे सौदागर'चा संकल्प फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे बोलत होत्या. सदर शिबीर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर असे सात दिवस होणार आहे. पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसायटी या ठिकाणी रोस लँड सोसायटीचे चंदन चौरसिया यांचे हस्ते रिबीन कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, योग शिक्षक व होमिओपॅथी तज्...
महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्यात संवेदना जगाओ उपोषणाला पोलीसांनी परवानगी नाकारली
पिंपरी चिंचवड

महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्यात संवेदना जगाओ उपोषणाला पोलीसांनी परवानगी नाकारली

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त दोघेही संविधानाच्या कलम ५१अ (ग) याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच अवैध वृक्षतोडी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाही न करता तक्रारदारांना व झाडांसाठी न्याय मागणाऱ्या नागरिकांकडेही कानाडोळा करीत आहेत. यासाठी न्याय मागण्यासाठी व महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात पर्यावरण संबंधी संवेदनशीलता यावी, म्हणून एक दिवसीय संवेदना जगाओ सांकेतिक उपोषण वृक्ष मित्रांच्या वतीने संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) करण्यात येणार होते. मात्र, या उपोषणास कोरोना महामारीचे कारण देऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कलम 51-A (g) जे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे: “जंगल, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहै. त्याच अनुषंगाने असंवेदनशील पोलिसांची "संविधा...
ग्राहक हक्क संघर्ष समितीचा एसटी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा | दानशूरांनी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटची मदत करण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड

ग्राहक हक्क संघर्ष समितीचा एसटी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा | दानशूरांनी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटची मदत करण्याचे आवाहन

पिंपरी : एसटी महामंडळ हे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्या मान्य करण्याकरीता राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातीलच वल्लभनगर येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनास ग्राहक हक्क संघर्ष समितीने पाठिंबा दिला आहे. त्या प्रसंगी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अमोल उबाळे, रोहित नंदिरे, अजय कापुरे, योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, रितेश पायगुडे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी अमोल उबाळे म्हणाले की, "आत्ता पर्यंत ४१ एसटी कर्मचारी यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, हे गेंड्याच्या कातडीचे सरकार सुस्त झोपलेले आहे, ते जागे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्या पद्धतीने इतर राज्यात तेथील परिवहन व्यवस्था राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होऊन तेथील कर्मचारी यांना सर्व सुविधा पुरवितात. त्याच ध...
आम आदमी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आकुर्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आकुर्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पिंपरी : आम आदमी पार्टी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी मधील सुभाष पांढरकर नगर भागामध्ये नेत्र तपासणी शुगर बीपी तपासणी, चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला, या शिबिराला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या, पाच वर्षात एकही नगरसेवक आमच्या भागात फिरकला नाही किंवा कुठलीही योजना आमच्यापर्यंत पोचविली नाही. आम आदमी पार्टी करत असलेल्या कामाला शुभेच्छा दिल्या यावेळी आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना सांगितले दिल्लीमध्ये शिक्षण, आरोग्य, लाईट, पाणी या मूलभूत गरजा तेथील जनतेला मोफत दिल्या जातात. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिंपरी-चिंचवड मध्ये तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे, जनता महागाई मुळे त्रस्त आहे कररुपी मिळालेल्या जनतेच्या...
काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : काळेवाडीतील एमएम महाविद्यालयालगतच्या छत्रपती चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशाने आपल्या हृदयात अनेक वीर पुत्राची यशोगाथा कित्येक शतकापासून जतन केलेली आहे. हे वीर पुत्र आपल्या पावन भूमीत जन्माला आले, हे आपले केवढे सौभाग्यच. या महान विभुतींच्या वीरगाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात, आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो. तर त्यांचे कर्तृत्व डोळ्यांनी पाहता आले असते. असे विचार मनाला स्पर्शून जातात. आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होवून गेला. अखंड भारतवर्षांत आपल्या कर्तृ...
अनंतनगरमध्ये तुळशी विवाह सोहळा व दीपोत्सव उत्साहात
पिंपरी चिंचवड

अनंतनगरमध्ये तुळशी विवाह सोहळा व दीपोत्सव उत्साहात

पिंपळे गुरव : अनंतनगर महिला मंडळ व अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने घरातीलच मुलीच्या विवाहाप्रमाणे दोन दिवस चाललेला सार्वजनीक तुळशी विवाह सोहळा उत्साहात पार पडला. त्यानिमित्त साई मंदिर परिसरात दीपोत्सव करण्यात आला होता. त्यावेळी परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. याच अनुषंगाने अनंतनगरमद्ये तुळशी व विष्णूचे आधुनिक स्वरूपातील मुखवटे तयार करण्यात आले होते. पहिल्या दिवशी जात्यावर हळद दळण्यात आली. तर दुसऱ्या तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची रंगरंगोटी करण्यात आली. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवण्यात आले. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घातले गेले. तुळशीला नवीन वस्त्र पांघरून त्यावर मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवण्यात आली. पूजेचे उपचार समर्पण करून दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगला...
‘आपला प्रभाग-कचरामुक्त प्रभाग’; पिंपळे सौदागरवासीयांचा संकल्प!
पिंपरी चिंचवड, सामाजिक

‘आपला प्रभाग-कचरामुक्त प्रभाग’; पिंपळे सौदागरवासीयांचा संकल्प!

नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने 'प्लॉगेथॉन-२०२१' मोहिम यशस्वी पिंपळे सौदागर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या 'प्लॉगेथॉन' अभियानाला पिंपळे सौदागर प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'आपला प्रभाग, कचरामुक्त प्रभाग' असा संकल्पच या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी हाती घेतला आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हे अभियान संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात राबविले गेले. या अभियानांतर्गत पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते रॉयल सोसायटी रस्ता आणि दत्त मंदिर ते स्वराज चौक मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त विकास ढाकणे, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेवक नाना काटे, भूषण पाटील, नगरसेविका निर्मला कुटे, राजेंद्रनाथ जयस्वाल, लायन्स क्लबचे अंजुम सय्यद, आन...
युवा नेते किरण नढे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार
पिंपरी चिंचवड, सामाजिक

युवा नेते किरण नढे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार

काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश काळेवाडी : काँग्रेसचे युवा नेते किरण बाबाजी नढे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माजी सैनिक, निवृत्त पोलीस, निवृत्त शिक्षक, डॉक्टर, जेष्ठ नागरिक, समाजसेवक, वारकरी संप्रदाय, पत्रकार यांना विशेष सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शहराध्यक्ष कैलास कदम आणि किरण नढे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नढे यांच्या नेतृत्वाखाली आयुब खान, प्रतीक चिंचवडे, यश पाटील, शाहरुख शेख, रोहित यादव, विशाल निटूने यांच्यासह काळेवाडीतील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच उपस्थित मान्यवर व नागरिकांनी किरण नढे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी व यशदायी आयुष्याच्या शुभेच्छा द...