पिंपरी चिंचवड

महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी चिंचवड, राजकारण

महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी : राज्यभरात महिलांवर वारंवार घडत असलेल्या अत्याचाराविरोधात नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला सेना शहराध्यक्षा अश्विनी बांगर, शहर सचिव सीमा बेलापुरकर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी, वैशाली बोत्रे, वैशाली कोराटे, अनिता नाईक, श्रद्धा देशमुख, संगीता कोळी, काजल गायकवाड, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, के के कांबळे, आकाश लांडगे, रोहित थरकुडे, किरण वाघेरे, वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, कर्मचारी सेना अध्यक्ष रूपेश पटेकर, विशाल सालूंखे, विशाल मानकरी, राजू भालेराव, राजेश अवसरे, परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, नाथा शिंदे, सुरेश ...
दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही – वैशाली काळभोर
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी

दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही – वैशाली काळभोर

पिंपरी, ता. १५ : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करीत त्यांचा आदर केला जातो. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेवून आम्ही महिला लोकनेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजकारण आणि राजकारणात काम करीत आहोत. या महाराष्ट्रात मनुवादी विचारांच्या भाजपने यापूर्वीही महिलांबाबत निंदाजनक वक्तव्य केले आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांचा पुन्हा अपमान केला आहे त्यांनी तमाम महिलांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पिंपरीत महात्मा फुले पुतळ्यासमोर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. यावे...
धक्कादायक : हप्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलांचा दुकानदारावर कोयत्याने वार | पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

धक्कादायक : हप्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलांचा दुकानदारावर कोयत्याने वार | पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

पिंपरी-चिंचवड शहरात भरदिवसा कापड दुकानात जाऊन हप्ता द्या अन्यथा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी देत कोयत्याने दुकानदारावर वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दुकानात काम करणारे दोन तरुण जखमी झालेत. कासीम अस्लम शेख (वय २६) या तरुणाने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. व्हिडीओ पहा : https://youtu.be/n8CSVBzAyRQ https://twitter.com/lokmarathi/status/1437846367406231554?s=19 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड या नावाचे कापड दुकान आहे. तिथे तीन अल्पवयीन मुलं कोयता घेऊन दुकानात शिरले, त्यांनी व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्या, असं म्हणून हप्ता मागितला आणि धमकावले. मात्र, दुकानात मालक नसल्याने कामगार गोंधळून गेले होते. काही...
काळेवाडीतील नंददीप कॉलनी रस्त्याची दुरावस्था
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील नंददीप कॉलनी रस्त्याची दुरावस्था

काळेवाडी : नढेनगर मधील नंददीप कॉलनी क्रमांक ४, हभप कै सिताराम बाळोबा नढे रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे. काळेवाडीतील या रस्त्यावर मोठी रहदारी असते. अबालवृद्ध या रस्त्याने ये-जा करत असतात. रस्ता खराब झाला असल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिक हैराण झाले असून सतत डांबरीकरण करूनही रस्ता व्यवस्थित होत नाही. त्यामुळे महापालिकेने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शेख यांनी सांगितले. https://twitter.com/lokmarathi/status/1437666487150411779?s=19...
मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश
पिंपरी चिंचवड, सामाजिक

मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

पिंपरी : मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हिताय सोशल फाउंडेशन संस्थेच्या सामाजिक बंधुत्वाचा प्रत्यय खराळवाडी - गांधीनगर येथे आला. मानवता हिताय या संस्थेच्या या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे. https://youtu.be/_-oMy2SAAeA त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, तसलीम शेख, कासीमभाई शेख, अब्दुलभाई शेख, इमरान शेख (गुड्डू), सैफी आलम, मोहम्मद आमीर, नामदेव (आबा) जाधव आदी उपस्थित होते. गणेशोत्सवनिमित्त मानवता हितायने हा एक सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला असून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, मानवता हिताय संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त सलग दहा दिवस गरजू, गरीब व दिव्यांगांना धान्यकिट वाटप करण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. असे मानवता हिताय संस्थे...
वाकडमध्ये गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था – विशाल वाकडकर
पिंपरी चिंचवड

वाकडमध्ये गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था – विशाल वाकडकर

द्रौपदा मंगल कार्यालय वाकड येथील खासगी जागेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने मोफत सुविधा पिंपरी : कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखिल गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यानुसार गणेश मुर्ती विसर्जनासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी वाकड परिसरातील नागरीकांसाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. याठिकाणी भाविकांना गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी, तसेच मुर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. https://youtu.be/QyGFUwhfnrY भाविकांनी नदी, नाला, ओढ्यात, विहीरीत मुर्ती विसर्जन करुन पर्यावरणास हानी पोहचवू नये. पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने वाकड येथील द्रौपदा लॉन मंगल कार्यालयातील खासगी जागेत हा तलाव करण्यात आला आहे. यासाठी आरतीची व्यवस्था, निर्माल्य दान व्यवस्था, प्रकाश व्यवस...
समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे – सचिन साठे
पिंपरी चिंचवड

समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे – सचिन साठे

निरपेक्षपणे काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये न्याय मिळतो पिंपरी, ता. १२ : न्याय व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अन्यायग्रस्त पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे असे आवाहन काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय मिळतो असेही सचिन साठे म्हणाले. रविवारी (ता. १२ सप्टेंबर) आकुर्डी येथे शहर काँग्रेसच्या लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव, प्रतिभा कांबळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, विशाल कसबे; चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते. यावेळी शहर काँग्रेसच्या लीगल स...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील नागरिकांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जाणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा काळेवाडीतील बी. टी. मेमोरियल शाळेत रविवारी (ता. २६ सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेचे संयोजन मनसे पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे व शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांनी केले आहे....
PCMC : गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था
पिंपरी चिंचवड

PCMC : गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था

पिंपरी, ११ सप्टेंबर:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली असून सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती द्याव्यात असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विसर्जन ठिकाणी गर्दी होवू नये या साठी सर्व विसर्जन घाट व हौदावर यावर्षी गतवर्षी प्रमाणे कोरोनामुळे निर्बंध आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उत्साही व आनंदी वातावरणात साजरा व्हावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.शहरातील विविध भागामध्ये श्री गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेने केली असून त्याचे विेधीवत विसर्जन करण्यात येणार आहे असेही महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. श्री मूर्ती संकलनासाठी स्वतंत्र सजवलेले रथ तयार केले असून...
चिंचवडमधील सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करा
पिंपरी चिंचवड

चिंचवडमधील सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करा

पिंपरी चिंचवड मातंग समाजाच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेत तीव्र मागणी पिंपरी : चिंचवड येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार व अत्याचार झालेल्या घटनेचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मातंग समाज बांधवानी एकत्रित येऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच उर्वरित दोन आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पिडीत मुलीला व तिच्या परिवारास योग्य तो न्याय मिळवून देत त्या परिवारास पोलिस संरक्षण द्यावे यासाठी आज सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पीडित कुंटुबाला पोलिस संरक्षण देणे, उर्वरित दोन आरोपीना तात्काळ अटक करून त्यावर कठोर कारवाई करणे तसेच अशा घडणाऱ्या घटनांना पायबंद घालणे, पीडित मुलीला न्...