पिंपरी चिंचवड

भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप
पिंपरी चिंचवड

भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप

पिंपरी : पोलिस मित्र संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्षा व शिवसेना काळेवाडी विभाग संघटिका भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप करण्यात आले. पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या मार्गदर्शनाखालील या कार्यक्रमाला शिवसेनेचे हरेश आबा नखाते, गोरख पाटील, गणेश आहेर, धर्मा पवार, नंदा कापुरे, सुनंदा जांभळे, स्वप्निल पाटील, शिवाजी पाटील, सुरेखा शिंदे, योगेश शिंदे, नर्सिंग शेख, उज्ज्वला बंडगर आदी उपस्थित होते....
गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होते
पिंपरी चिंचवड

गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होते

पिंपरी : गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील अनेक रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छतेची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी व्यक्त केले. कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व सर्व पक्षीय व समविचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी कांबळे बोलत होते. "महापुरुषांचे विचार हे मानवी मनाला प्रेरणा देत असतात. प्रत्येक महापुरुषांचे विचार आज स्वत:मध्ये उतरविण्याची गरज आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यत...
पिंपरी चिंचवड

कर्तव्यात कसूर करणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन|पोलिसांवरील विश्वास दृढ करणारा निर्णय – सिद्दीक शेख

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले, एवढयावरच न थांबता अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची निर्मिती करून शहरातील अनेक अवैध धंद्यांवर धाडी टाकून अवैध धंद्यांवर नियंत्रण आणून त्या क्षेत्रातील गुन्हेगारांची मक्तेदार मोडीत काढली. यामुळे पोलीस दलातीलच काही पोलीस अधिकारी त्याना शिव्या, शाप देऊ लागले, परंतु त्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली. तसेच पोलीस आयुक्तालयात गेलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय कसा देता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्येकाची तक्रार ऐकून घेऊन त्यावर कायदेशीर अंमलबजावणी व कृतीच्या माध्यमातून तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांविषयी असलेली भीती कमी करून विश्वास दृढ करण्याचा प्रामाणिक...
पिंपरी चिंचवड

वैविध्यपूर्ण आपला देश केवळ राज्यघटनेमुळेच एकत्र – निशांत कांबळे

चिंचवड : १३८ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात ३७ राज्य १० धर्म ७५०० जाती ३०० भाषा तसेच विविध संस्कृती आहेत. असा वैविध्यपूर्ण आपला देश ७० वर्षांपासून केवळ आपल्या राज्यघटनेमुळेच एकत्र आहे. तेही एका रेषेत आपल्या राज्यघटनेमुळेच ठेवू शकलो. त्यामुळे आपली राज्यघटना महान आहे. असे प्रतिपादन आयुष्यमान निशांत कांबळे यांनी केले. चिंचवडगावातील सामाजिक संस्था प्रबुद्ध संघ यांच्या माध्यमातून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुष्यमान निशांत कांबळे बोलत होते. या कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी प्रथम सविधान प्रास्ताविकेचे वाचन सामूहिकरीत्या करण्यात आले. सूत्रसंचालन सचिव आयुष्यमान किशन बलखंडे यांनी केले. प्रास्ताविक राजू वासनिक यांनी केले. तर आयुष्यमती प्रतिमा साळवी यांनी आभार मानले....
Kalewadi : जयवंताबाई नामदेव खेडकर यांचे निधन
पिंपरी चिंचवड

Kalewadi : जयवंताबाई नामदेव खेडकर यांचे निधन

काळेवाडी : येथील जयवंताबाई नामदेव खेडकर (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार सुना, तीन मुली, दिर, नातवंडे, परतंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खेडकर, शांताराम खेडकर, चंद्रकांत खेडकर तसेच संत शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठान काळेवाडीचे अध्यक्ष सुखदेव आप्पा खेडकर यांच्या त्या मातोश्री होत. ...
PCMC : कोट्यवधींची क्रीडांगणे मातीमोल करणाऱ्या क्रीडा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा
पिंपरी चिंचवड

PCMC : कोट्यवधींची क्रीडांगणे मातीमोल करणाऱ्या क्रीडा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड नव नगर विकास प्राधिकरण यांनी नागरिकांमधील क्रीडा कौशल्ये विकसित व्हावी, यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून क्रीडांगणे उभारली आहेत. त्यांची योग्य देखभाल व जपणूक करणे ही क्रीडा विभागाची जबाबदारी आणि प्रथम कर्तव्य आहे. मात्र, या क्रीडांगणांची भयंकर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अशी क्रीडांगणे मातीमोल करणाऱ्या संबंधित क्रीडा अधिकारी आणि सुपरवायझर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नुकतेच मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर नऊमधील बास्केटबॉल ग्राउंडला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ज्या बाबी निदर्शनास आल्या, त्या अतिशय भयंकर, संताप आणणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाच्या असून त्या खालील...
मर्यादित सभासदांच्या उपस्थित काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा
पिंपरी चिंचवड

मर्यादित सभासदांच्या उपस्थित काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा

पिंपरी चिंचवड : काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा २३ वा वर्धापन दिन संघाच्या विरंगुळा केंद्रात शासनाच्या नियमानुसार नियमाचे पालन करून मर्यादित पन्नास मान्यवर महिला व पुरुष सभासदांच्या उपस्थित हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे सभासद कार्याध्यक्ष सुरेश नढे पाटील हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सह. सचिव मधुकर कसबेकर हे होते. संघाचे अध्यक्ष दशरथ वीर उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, महिला उपाध्यक्ष श्रीमती विमल ओतारी उपस्थित होते. दिपप्रज्लन व गणेश पुजन करुन कार्यक्रमाचे प्रस्तावित व संघाचा तेविस वर्षाचा लेखा जोखा संघाचे सचिव पदमाकर जांभळे यानी सादर केला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करुन संघाचे दानशूर व्यक्ती धनराज एडके, दत्तात्रेय शेडगे, विषेश सहकार्य धर्माजी पवार विषेश पदनियुती व संगीता को...
सुलभ शौचालयाच्या हौदात सापडली मानवी कवटी आणि हाडे
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

सुलभ शौचालयाच्या हौदात सापडली मानवी कवटी आणि हाडे

पिंपरी चिंचवड : भोसरी येथील बालाजी नगर येथे सुलभ शौचालयाच्या हौदात मानवी कवटीसह काही हाडे सापडली आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक शोध घेत आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. ही हाडे पुरुष की महिलेची आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. दोन मुलं सुलभ शौचालयाच्या हौदात मासे पकडत होते. तेव्हा, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत कवटीसह हाडे मिळाली. या घटनेचा तपास सुरु असून सापडलेली हाडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे यांनी दिली. दरम्यान, हाडे बाहेरून आणून तिथे टाकल्याचा संशय पोलिसांना असून इतर हाडांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय परिसरात कोणी बेपत्ता आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. तसेच या घटनेबाबत स्थानिकांकडे चौकशी केली जात आहे. सीसीटीव्हीचीही मदत घेतली जात आहे....
निलम हुले यांची पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
पिंपरी चिंचवड

निलम हुले यांची पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

पिंपरी : पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या भोसरी विधानसभा महिला उपाध्यक्षपदी निलम हुले यांची नियुक्ती करण्यात आली. असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यावेळी भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा नंदा फुगे उपस्थित होत्या.
स्मिता साठे यांची भारतीय लहुजी पँथर्सच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड
पिंपरी चिंचवड

स्मिता साठे यांची भारतीय लहुजी पँथर्सच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड

पिंपरी : भारतीय लहुजी पँथर्सच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षपदी स्मिता मल्हारी साठे यांची निवड झाली. भारतीय लहुजी पँथर्सचे संस्थापक-अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. नवनियुक्त महिला प्रदेश अध्यक्षा स्मिता साठे या छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद साळवे, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णा भाऊ या महामानवांचे विचार समाजामध्ये रूजवतील. तसेच त्या महाराष्ट्रामधील शोषीत, पिडीत बहुजन समाजातील महिलांचा प्रामुख्याने मातंग समाजामधील सामान्य महिलांचा बुलंद आवाज करतील आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर राज्यामधील महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कटिबद्द राहतील. असा विश्वास भारतीय लहुजी पँथर्सचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांनी व्यक्त केला. ...