पिंपरी चिंचवड

नविन कामगार कायद्यांमुळे ‘कायम कामगार’ ही संकल्पना मोडीत निघेल : डी. एल. कराड महाराष्ट्रात कंत्राटी कामगार मंडळाची स्थापन करावी, कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मागणी
पिंपरी चिंचवड

नविन कामगार कायद्यांमुळे ‘कायम कामगार’ ही संकल्पना मोडीत निघेल : डी. एल. कराड महाराष्ट्रात कंत्राटी कामगार मंडळाची स्थापन करावी, कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मागणी

देशभरातील विविध कारखान्यांमध्ये आणि सेवा संस्थामध्ये काम करणाऱ्या सर्व आस्थापनांमध्ये ७५ टक्के कामगार, कर्मचारी सध्या कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. यामध्ये सरकारी, खासगी, निमसरकारी अशा सर्व आस्थापनांचा समावेश आहे. ‘कायम कामगार’ ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रचलित कामगार कायद्यात बदल करुन भांडवलदारांसाठी नवीन कामगार कायदे करुन त्यांना सर्व मार्ग मोकळा केला आहे. कंत्राटी कामगारांसाठी महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगार मंडळ (कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स बोर्ड) स्थापना करावी अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे अशी माहिती ज्येष्ठ कामगार नेते व सीटूचे प्रदेश अध्यक्ष डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (दि. ४ एप्रिल) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कामगार संघटना संयुक्त कृती समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्य...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा ; अपना वतन संघटनेची मागणी
पिंपरी चिंचवड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा ; अपना वतन संघटनेची मागणी

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक-अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम १५३, १५३ अ, १५३ ब, २९५ अ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या हिजाब प्रकरण, काश्मीर फाईल्स सारख्या प्रकरणामुळे देशातील व महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करीत...
कुरिअरने मागविला शस्त्रसाठा ; ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यानचा समावेश
पिंपरी चिंचवड

कुरिअरने मागविला शस्त्रसाठा ; ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यानचा समावेश

पिंपरी : कुरिअरने मागविलेल्या ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान, असा तीन लाख २२ हजारांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. दिघी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. उमेश सुद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद), मनींदर (रा. अमृतसर, पंजाब), आकाश पाटील (रा. चितली, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आला होता. त्या अनुषंगाने सर्व कुरिअर कंपनीमध्ये येणाऱ्या सर्व पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनींग करणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाउनमधील माल एक्सरे मशीनमधून स्कॅन करीत होत्या. डीटीडीसी कुरिअर कंपनीचे दिघी येथे मध्यवर्ती वितरण केंद्र असून, कंपनीचे दिघी येथे गोडाऊन आहे....
अंध आजोबांना घेऊन आजी फुटपाथवरच रहायची, नियतीने एके दिवशी आजींनाही केले अपंग…वायसीएमने मिळवून दिला मग ‘सहारा’
पिंपरी चिंचवड

अंध आजोबांना घेऊन आजी फुटपाथवरच रहायची, नियतीने एके दिवशी आजींनाही केले अपंग…वायसीएमने मिळवून दिला मग ‘सहारा’

पिंपरी : एकुलता एक मुलगा सांभाळत नसल्याने वयोवृद्ध अंध नव-याला घेऊन आजी फुटपाथवरच भिक्षा मागून रहायची. रस्ता ओलांडताना एके दिवशी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवाल्याने आजीला उडविले आणि पळून गेला.खुब्यातूनच पाय मोडल्याने आजी अपंग झाली.आधीच निराधार अणि आता तर दोघेही विकलांग… जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने वायसीएम रूग्णालयाने अखेर आज त्यांना कायमस्वरूपी सहारा मिळवून दिला. तुकाराम चव्हाण (वय ७२)आणि ताराबाई चव्हाण (वय ७०) अशी या पती पत्नीची नावे आहेत. गेली दहा वर्षांपासून पुणे - मुंबई महामार्गावर रात्र झाली की रस्त्याच्या कडेला दिसेल त्या जागेवर मुक्काम करायचा व दिवस काढायचे हेच त्यांचे जगण्याचं चक्र ठरलं होतं.आजोबा पन्नाशीत असतानाच मोतीबिंदूने त्यांना गाठलं.उपचार कसे करायचे,कोण करणार? यातच काही वर्षे लोटली. मोतीबिंदू पिकला आणि आजोबांची कायमची दृष्टी गेली. तुकाराम आजोबा म्हणजे पहाडी आवाज अस...
पीएमपीएमएल नवीन बस मार्गांमुळे रोजगारात वाढ होईल : आ. महेश लांडगे
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल नवीन बस मार्गांमुळे रोजगारात वाढ होईल : आ. महेश लांडगे

पिंपरी : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरी बीआरटी बस स्थानकातून खेड तालुक्यातील कडूस आणि दावडी या ग्रामीण भागात दोन नवीन बसमार्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत रोजगारासाठी येणा-या नागरिक व विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. तसेच या ग्रामीण भागातील रोजगारात आणि नागरिकांच्या अर्थाजनातही पीएमपीएमएलच्या नवीन मार्गांमुळे वाढ होईल असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले. शनिवारी (दि. २ एप्रिल) गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरीतील बीआरटी बस स्थानकातून भोसरी ते दावडी (मार्ग क्र. ३७०) आणि भोसरी ते कडूस (मार्ग क्र. ३७१) या दोन नवीन मार्गांचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, ज्येष्ठ नेते पांडूरंग गवळी,...
पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चिंचवड मध्ये ‘स्वर सुमनांजली’ चे आयोजन
पिंपरी चिंचवड, मनोरंजन

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चिंचवड मध्ये ‘स्वर सुमनांजली’ चे आयोजन

पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२२) स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कलाश्री संगीत मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरभास्करास ''स्वर यज्ञ'' या एक दिवसीय सांगीतिक महोत्सवातुन '' स्वर सुमनांजली'' अर्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून याचे उद्‌घाटन शनिवारी (दि. ९ एप्रिल) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात सलग २४ तास स्थानिक कलाकारांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप रविवारी (दि. १० एप्रिल) सकाळी ६ वाजता होणार आहे अशी माहिती संगीत महोत्सवाचे संयोजक अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे भाऊसाहेब भोईर आणि कलाश्री संगीत मंडळाचे ...
अपना वतन संघटनेतर्फे पिंपरीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर ‘विचारमंथन शिबीर’
पिंपरी चिंचवड, सामाजिक

अपना वतन संघटनेतर्फे पिंपरीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर ‘विचारमंथन शिबीर’

समाज व देशाला पुढे नेहण्यासाठी मुस्लिम समाजात शैक्षणिक क्रांतीची गरज - सर्वपक्षीय मुस्लिम नेत्यांचा एकसूर पिंपरी : अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी येथील अल्पाइन हॉटेल मध्ये पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर एकदिवसीय "विचारमंथन शिबीर" आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पिंपरी चिचंवड एजुकेशन सोसायटीचे सचिव गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विचारमंथन शिबिरात पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजातील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी शहरातील उर्दू शाळा, मुस्लिम विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती, समाजातील गरीब दुर्बल घटकांच्या वैद्यकीय गरजा, रोजगार, करिअर मार्गदर्शन शिबिरे, ग्रंथालय, कायदेशीर सल्ला केंद्र,...
अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती – युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती – युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी भाजपच्या भ्रष्टाचारावर हल्ला चढवत त्यांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता महापालिकेत असताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महापालिका आशिया खंडात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिकास होती, आता या भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे महापालिका सत्तर नंबर वर येऊन पोचली आहे, याची आम्हाला लाज वाटते. अशी टिका मेहबूब शेख यांनी येथे केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य समन्वयक योगेश बहल, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली “महागाईवर हल्ला चढवू या! मोदी सरकारला जाब विचारूया!” असे निषेध आंदोलन शनिवारी (ता. २) करण्यात आले. संत तुकाराम नगर प...
महापालिकेच्या अतिक्रमण पथारी हातगाडी सर्वसामान्यांची लूट थांबवा – बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या अतिक्रमण पथारी हातगाडी सर्वसामान्यांची लूट थांबवा – बाबा कांबळे

आयुक्त राजेश पाटील यांचे चैकाशी व कारवाई करण्याचे आश्वासन गेल्या पाच वर्षाच्या पावत्यांचीचौकशी करण्यास यावी बाबा कांबळे यांची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई केली जात आहे. रस्त्यावर, फुटपाथवर, फुटपाथलगत हातगाडी, पथारीवाले, वाहनांमध्ये व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्यावर रोज दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई करताना नागरिक, व्यावसायिक यांची मोठी लूट केली जात आहे. ही लूट थांबवावी, अशी मागणी टपरी, पथारी, हातगाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली. तसेच दिलेल्या पावतीमधील रक्कमेमध्ये बदल करून पालिकेची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी बाबा कांबळे यांनी केली. आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. या वेळी ही मागणी करण्यात आली. या वेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत कार्याध्यक्ष गजानन काकडे, उपाध्यक्ष प्रकाश यशवंत, ...
शहरातील सर्व प्रभागात सीएनजी शवदाहिनी उभारा- सचिन साठे
पिंपरी चिंचवड

शहरातील सर्व प्रभागात सीएनजी शवदाहिनी उभारा- सचिन साठे

पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि कोरोना काळात अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या विविध अडचणीचा विचारात घेऊन शहरामध्ये प्रत्येक प्रभागात अत्याधुनिक सीएनजीच्या शव दाहिनी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात उभाराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली आहे. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना सचिन साठे मंगळवारी (दि. २९ मार्च) पत्र दिले. या पत्रात पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात २५ लाखांपेक्षा जास्त विविध जाती धर्मांचे लोक वास्तव्यास आहेत. मनपा कार्यक्षेत्रातील या नागरिकांना मुलभूत सेवा सुविधा पुरविणे, त्यासाठी जागा आरक्षित करणे हे मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ नुसार कायद्याने बंधनकारक आहे. या प्राथमिक सेवा सुविधांमध्ये वीज, पाणी, रस्ते या बरोबरच ‘स्मशानभुमी’ साठी जागा उपलब्ध करुन देणे हि देख...