आम आदमी पार्टीतर्फे स्थापना दिनानिमित्त सावली निवारा केंद्रात अन्नदान
पिंपरी : आम आदमी पार्टीच्या नवव्या स्थापना दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे जेवण वाटप करण्यात आले. या आधी ही सावली निवारा केंद्रात अनेकदा भेट देऊन असे उपक्रम घेण्यात आले आहेत. आज सावली निवारा केंद्राचे प्रबंधक गौतम थोरात यांनी तिथल्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा संचालित ह्या केंद्रात राहणाऱ्या लोकांचे कौशल्य पाहून त्यांचा अभिमान वाटला. अनेकांशी आपुलीकीने गप्पा मारल्या. अस बोलतांना आप पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा यांनी सांगितले.
तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे महत्व आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले, व 26 /11 मुंबई येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला. आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आम आदमी पार्टीचे र...










