पिंपरी चिंचवड

शिवशाहीच्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का? : आप
पिंपरी चिंचवड

शिवशाहीच्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का? : आप

पिंपरी : राज्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढी सह एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला आम आदमी पार्टी, महाराष्ट्राने पाठींबा घोषीत केला आहे. वल्लभनगर आगारामध्ये चालू असलेल्या आंदोलमध्ये आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड च्या पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्वलंत व रास्त असुन त्या सोडविण्याकरीता राज्य शासनाकडून सातत्याने होणारी दिरंगाई, संपाबाबत सकारात्मक भुमीका नसल्यामुळे, गावोगावी पोहोचलेली लालपरीचं खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल पाहून आम आदमी पार्टी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देत आहे व राज्य शासनाला विनंती करते की संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कठोर कार्यवाही करू नये. आंदोलनांच्या ठिकाणी बोलताना "शिवशाही च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का द...
करोना नियम पाळत पिंपरीत छठ पुजा कार्यक्रम उत्साहात | माँ होलकीदेवी प्रतिष्ठानतर्फे मोफत सेनिटायझर व मास्क वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

करोना नियम पाळत पिंपरीत छठ पुजा कार्यक्रम उत्साहात | माँ होलकीदेवी प्रतिष्ठानतर्फे मोफत सेनिटायझर व मास्क वाटप

https://youtu.be/CQHTLAKSQvc पिंपरी : माँ होलकीदेवी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही झुलेलाल घाट येथे उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र सण असलेल्या छठ पूजा कार्यक्रमाचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माँ होलकीदेवी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सेनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा करण्यात आली होती. त्याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी अर्जुन गुप्ता, माँ होलकीदेवी प्रतिष्ठानचे संस्थापक सुखलाल भारती, अध्यक्षा ज्योती भारती, कार्याध्यक्ष व भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा महामंत्री आकाश भारती, सचिव अनिल लखन, सहसचिव राजेश वडगुजर, हिशोबनीस रामकृष्ण वाढणे, सल्लागार सोहन शहानी व राजकुमार डेंगळे, स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, प्रमोद राम, पारस कुशवाह, प्रबोधनकार शारदा मुंढे, सुनिता यादव यांच्यासह...
अनंतनगर तरुण मित्र मंडळाने साकारली रायगडाची प्रतिकृती
पिंपरी चिंचवड

अनंतनगर तरुण मित्र मंडळाने साकारली रायगडाची प्रतिकृती

पिंपरी गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वसुबारसनिमित्त पुजा करण्यात आली व साई मंदिर परिसरात दीपोत्सवास करण्यात आला. त्यामुळे परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच मंडळाच्या वतीने रायगड किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. किल्ल्याची माहिती देण्यासाठी प्रोजेक्टर लावण्यात आला असून परिसरातील नागरिक, गडप्रेमी व शिवभक्त या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी येते आहेत. https://youtu.be/MwIpSDs7GwM ही प्रतिकृती बनविण्याची संकल्पना मंडळाचे कार्यकर्ते विशाल चव्हाण व जशवंत दाभाडे यांची आहे. तर निलेश कुंभार, उमेश गांधी, रोहित शिंदे, कल्पेश गांधी, संकेत गुजर, प्रतिक मोरे, सुरज कुंभार, प्रविण शिंदे, गणेश भंडालकर, गणेश कुंभार, अशोक मदने, मनिष चव्हाण, केतन चव्हाण, अजिंक्य शिंदे यांनी पर...
दिवाळी पाडवानिमित्त श्री विठ्ठल बिरुदेव भाकणूक व परजेचा कार्यक्रम उत्साहात
पिंपरी चिंचवड

दिवाळी पाडवानिमित्त श्री विठ्ठल बिरुदेव भाकणूक व परजेचा कार्यक्रम उत्साहात

चिंचवड : दिवाळी पाडवानिमित्त सर्व समाज बांधवांच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे श्री विठ्ठल बिरुदेव भाकणूक व परजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर करीत बहुसंख्य भविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक चिंचवडे नगरमधील मुंजोबा देवस्थानाच्या प्रांगणात आली. त्यावेळी भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्याने परिसर सुवर्णमय झाला होता. त्याठिकाणी मानकऱ्यांना मान देत, मानाच्या तलवारीचे पुजन झाले. कार्यक्रमाचे संयोजन वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगरमधील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले होते. युवा नेते राहुल मदने, विनोद बरकडे, बिभीषण घोडके, दीपक वायकुळे, कृष्णा वायकुळे, बाप्पू वायकुळे, दादासाहेब कोपनर, संजय कोळेकर, राजाभाऊ वायकुळे, राजाभाऊ ...
कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप

रहाटणी : दिवाळी हा रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. फटाके फोडून मोठ्या उल्हासात हा सण साजरा केला जातो. मात्र, समाजात अनेक कुटूंबांना हलाखीच्या परिस्थितीमुळे हा सण साजरा करता येत नाही. अशा काळेवाडी-रहाटणी परिसरातील गरजू मुलांना प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवाराच्या वतीने मिठाई, फराळ व फटाके वाटप करण्यात आले. त्यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. कोरोना महामारीमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. तर अनेक नागरिकांचे हातावरचे पोट असते. या अनुषंगाने आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून प्रसाद नखाते मित्र परिवाराच्या वतीने गरजू मुलांना शोधून त्यांना मिठाई, फराळ, फटाके देऊन या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. दरम्यान, प्रसाद नखाते मित्र परिवाराने कोरोना काळात समाजासाठी मोठे योगदान दिले. अनेक गरजूंना आवश्यक ...
पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांनी घेतला चित्रकला स्पर्धेचा आनंद
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांनी घेतला चित्रकला स्पर्धेचा आनंद

उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन त्यांचा संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त स्तुत्य उपक्रम पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे विशेष-दिव्यांग मुलांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष मुलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागी मुलांना उन्नती फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत अरिफा बागवान हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर हर्षवर्धन सुरूशे याने द्वितीय व प्रियांका गरुड हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच जगदीश बडगुजर यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विशेष मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम सप्तर्षी फाउंडेशन व उन्नती सोशल फाउंडेशनच्या विशेष पुढाका...
पिंपळे सौदागरमध्ये संगीत सुरांनी दिवाळी पहाट उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये संगीत सुरांनी दिवाळी पहाट उत्साहात साजरी

उन्नती सोशल फाउंडेशन व शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनतर्फे केले होते आयोजन पिंपरी : उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने सलग दोन दिवस स्वरामृत दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे संगीत सुरांच्या मेजवानीचा शहरातील नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला. संगीत अलंकार राधाकृष्ण गरड गुरूजी, प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन, ज्योती गोराणे व चंद्रभागा सातव यांच्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाचे पुणे शहराध्यक्ष चंद्रकांत महाराज वांजळे, पुरूषोत्तम महाराज पाटील (मनमंदिरा), युवा कीर्तनकार संतोष महाराज पायगुडे, वारकरी संप्रदायाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजू अण्णा जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना बँकेचे व्हॉईस चेअरमन जयनाथ काटे, प्रकाश झिंजुर्डे, विजय भिसे, ...
उन्नती फाउंडेशनतर्फे सांगवी वाहतूक व आरोग्य विभागात मिठाई वाटप
पिंपरी चिंचवड

उन्नती फाउंडेशनतर्फे सांगवी वाहतूक व आरोग्य विभागात मिठाई वाटप

पिंपरी : पोलिस व आरोग्य कर्मचारी कोणताही सण-उत्सव वैयक्तिक पातळीवर साजरा न करता जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या विषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेतून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सांगवी वाहतूक विभाग आणि आरोग्य विभागात मिठाई व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश नांदूरकर यांचा उन्नती सोशल फाउंडेशन संस्थापक संजय भिसे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कुटे, गणेश घाटोळकर, योगेश चौधरी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, "कोरोना काळात पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. जनता ज्यावेळी सण किंवा उत्सव साजरे करत...
उन्नती सोशल फाउंडेशनची दिवाळी अनाथ-गतिमंद मुलांबरोबर
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उन्नती सोशल फाउंडेशनची दिवाळी अनाथ-गतिमंद मुलांबरोबर

पिंपरी : दिवाळी म्हणजे अंधकार नष्ट करत प्रकाशमय वातावरण निर्माण करणारा सण. या सणात प्रत्येक जण जीवनातील दु:ख दुर करून आनंदाचा अनुभव घेत असतो. याच अनुषंगाने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनने बावधनमधील अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुला-मुलींचे अनाथाश्रमात दिवाळी साजरी केली. तेथील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत फाउंडेशनने त्यांना मिठाई, कपडे व आवश्यक वस्तूंचे वाटप केले. https://youtu.be/Up4WeZiTmSc त्याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, विशाल पवार, अतुल पाटील, अनिकेत सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका कल्पना वरपे, आनंद हास्य क्लबचे प्रमुख सेवक राजेंद्र जयस्वाल, निर्मला कासार, विमल पुजारी, सुनिता जयस्वाल, शोभा देवरे, राजमनी पुजारी, जयश्री भोसले, संजय डांगे आदी उ...
सोमनाथ दादा तापकीर युवा मंचतर्फे महिलांना ‘गाय-वासरू’ची मूर्ती भेट
पिंपरी चिंचवड

सोमनाथ दादा तापकीर युवा मंचतर्फे महिलांना ‘गाय-वासरू’ची मूर्ती भेट

काळेवाडी : दीपावलीचा पहिला दिवस वसुबारस, या निमित्ताने सोमनाथ दादा तापकीर युवा मंचच्या वतीने गोमतेच्या पूजनाचा कार्यक्रम येथील भारत माता चौकात आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील असंख्य महिलांनी याचा लाभ घेतला. गोमातेच्या पूजनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व महिलांना प्रतिमात्मक गाय-वासरू मूर्ती व समई सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर, कयूम शेख, शहाजीलाल आत्तार, राहुल यादव, दौलत पवार, सिद्धेश्वर फसले, अवि गुंटे, निलेश पवार प्रवीण झांजे, सुरज पवार, अजय वर्मा, किरण लोंढे, प्रशांत सोंडकर, कुणाल शिंदे, अशोक शेळके, अजित धारूरकर, प्रशांत कदम, राजुशेठ पवार, मोहन तापकीर, रुपेश तापकीर, भरत दोषी, मोहन चव्हाण, संतोष मुळीक, विकास गुंड यांच्यासह ओम साई ग्रुप आणि सोमनाथ दादा तापकीर युवा मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आयोजक सोमनाथ तापकी...