काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन
स्थानिक समस्यांना फोडली वाचा
काळेवाडी : आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले असून काँग्रेसची पहिलीच जाहिर सभा काळेवाडीत झाली. या सभेचे आयोजन काँग्रेसचे युवा नेते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी केले होते. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी विशेष हजेरी लावत, सभेला संबोधित केले.
त्याप्रसंगी
त्याप्रसंगी माजी प्रदेश अध्यक्ष पर्यावरण विभाग अशोक मोरे, अॅड. सोपान माने, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, वालिया अल्पसंख्यांक प्रदेश सदस्य राजेंद्र सिंग,
महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माउली मलशेट्...










