पुणे

GOOD WORK|रोटरी क्लबने भागविली सावळागावाची तहान
पुणे

GOOD WORK|रोटरी क्लबने भागविली सावळागावाची तहान

रोटरी क्लब ऑफ़ निगडी आणि पुजा कास्टींग यांच्या वतीने सावळा येथे उभारण्यात आलेल्या सौर उर्जा पंपाचे लोकार्पण प्रसंगी अनिल कुलकर्णी, विजय काळभोर, रवींद्रआप्पा भेगडे आदी पुणे (लोकमराठी) : रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने पुजा कास्टिंग चाकण आणि मावळ प्रबोधिनी यांच्या सहकार्याने दुर्गम भागातील सावळा गावामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना शेती व पिण्यासाठी सौर ऊर्जा संचलित २० एचपी मोटारच्या साहाय्याने जलसिंचन प्रकल्प उभारला आहे.यामुळे सावळागावाला मुबलक पाणी उपलब्ध केल्याने (ता मावळ) नागरीकांची तहान भागावली. या प्रकल्पाच्या उदघाटन व लोकार्पण प्रसंगी क्लबचे अध्यक्ष विजय काळभोर, सचिव प्रणीता अलूरकर, डॉ. प्रवीण घाणेगावकर, पुजा कास्टिंगचे संचालक अनिल कुलकर्णी, पुजा कास्टींगचे संचालक संकेत कुलकर्णी, राहुल रांका, दक्षेंद्र आगरवाल, जयश्री कुलकर्णी,केशव मनगे, गुरूदीपसिंग भोगल, हरिश्चंद्र उडगे,...
दारूधंदा बंद होत नसल्याने अड्ड्यावर महिलांचा हल्ला
पुणे

दारूधंदा बंद होत नसल्याने अड्ड्यावर महिलांचा हल्ला

टाकळी हाजी (लोकमराठी ) : पोलिसांकडे तक्रार करूनही गावामधील दारूधंदा बंद होत नसल्याने ग्रामस्थ व रणरागिणींनी एकत्र होत दारूअड्ड्यावर हल्ला करीत धंदा बंद केल्याने बेट भागात दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. शिरूरच्या पश्चिम भागातीतल टाकळी हाजीच्या साबळेवाडीत प्रजासत्ताक दिनी वाडीतील अवैध दारूधंदे बंद करायचेच या उद्देशाने सुमारे ४० महिलांनी आक्रमक होत येथील हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोन ठिकाणांवर धडक मोर्चा नेत घराजवळील शौचालयात ठेवलेल्या गावठ्ठी दारूचे भरलेले कॅन सर्वांसमक्ष बाहेर काढून ओतून दिले. बबन कोंडीबा साबळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूधंद्यांवर ग्रामस्थांनीच केलेल्या कारवाईत ग्रामपंचायत सदस्य बाबाजी साबळे, भाऊसाहेब साबळे, सोपान औटी, पोपट साबळे, बाळू औटी, विठ्ठल साबळे, राजू साळवे, योगेश साबळे, सुरेश साबळे, योगेश औटी व स्थानिक तरुणांनी सुगंधा गुलाब साबळे, सोनल साबळे, साधना खोमण...
पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे

पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पुणे : नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांनी आज केली. पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 13 व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रिडा) अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल, ज्येष्ठ महिला नेमबाज चंद्रो तोमर,...
जखमी गाईला वाचवणारे हे, खरे गो-रक्षक (व्हिडीओ)
पुणे, मोठी बातमी

जखमी गाईला वाचवणारे हे, खरे गो-रक्षक (व्हिडीओ)

https://youtu.be/RlIvy0WMr7k पुणे : खडकी रेंजहिल येथील गुरूद्वारासमोर रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या गाईला महाविद्यालयीन तरूण-तरूणी, नागरिक व बजरंग दल, आरएसएसच्या स्वयंसेवकांमुळे जीवनदान मिळाले. गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी साडेसहापासून उठण्याण्याचा प्रयत्न करणारी एक जखमी गाय रस्त्याच्या कडेला पडली होती. मात्र, तीला उठता येत नव्हते. अशातच भटकी कुत्रे तीच्यावर हल्ला करत असताना तेथून जाणाऱ्या महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी कुत्र्यांचा तावडीतून तीची सुटका केली. तीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती उठू शकली नाही. तीच्या डोळ्याला जखम झाली होती. गाईवर उपचार करण्यासाठी तरूणांनी खासगी व महापालिका प्राण्यांचे डॉक्टर व अॅनिमल एनजीओंना संपर्क केला. मात्र, सर्वांनी त्याठिकाणी येण्यास असमर्थता दर्शवली. महाविद्यालयीन तरूणांची गर्दी पासून अनेक नागरिक त्...
नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती गरजेची, अन्यथा दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल – डॉ. प्रमोद देव
पुणे, शैक्षणिक

नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती गरजेची, अन्यथा दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल – डॉ. प्रमोद देव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन औंध (लोकमराठी) : टेक्नॉलॉजीचा वापर आपण योग्य पद्धतीने व काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जातो. त्यामुळे आपण यांत्रिक होतो. इंटरनेट ऑफ थिंग्सचा (IOT) वापर जीवनाच्या अनेक क्षेत्रात केला जात आहे. उदा.स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कार, स्मार्ट सिटी व स्मार्ट शेती इतर क्षेत्रांमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असून, या नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती आपण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या दुष्परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल. मानवी मेंदूत मर्यादित डेटा साठवण्याची क्षमता असल्याने, मानवाने कॉम्प्युटर, मोबाईल फोन व पेन ड्राईव्ह यासारख्या यंत्रांचा शोध लावला आहे. मानवाने बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्या ज्ञानात बदल करायला हवेत. तरच तो बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आपले अस्तित्व सिद...
गायकवाड दांपत्याचा “आदर्श माता-पिता” पुरस्काराने गौरव
पुणे

गायकवाड दांपत्याचा “आदर्श माता-पिता” पुरस्काराने गौरव

पुणे : आदर्श गाव गावडेवाडी येथील निवृत्ती तुकाराम गायकवाड व सुभद्रा निवृत्ती गायकवाड यांचा सुसंगत फौंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘आदर्श माता –पिता राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी डॉ. देखणे म्हणाले की, ‘आधुनिक कालामध्ये सर्व जगभर सुसंवाद हरवत चालला आहे, अशावेळी आपल्या मुलांना सुसंस्काराची शिदोरी आणि उच्च शिक्षण देणारे माता-पिता समाजासाठी दिशादर्शक आणि आदर्शरूप आहेत.’आजच्या काळात कुटुंब संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर असताना गायकवाड दांपत्यांनी आपले सारे कुटुंब उच्च विद्याविभूषित करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अध्यक्षपदावरुन बोलताना उल्हास पवार म्हणाले की, श्री. गायकवाड दांपत्य आदर्शच असून त्यांचा हा सन्मान म्हणजे समाजातील असंख्य कुटुंबियांना दिशादर्शक...
महाराज ग्रुप गडसंवर्धन पिंपरी चिंचवडच्या वतीने गड-किल्ल्यांची साफसफाई
पुणे

महाराज ग्रुप गडसंवर्धन पिंपरी चिंचवडच्या वतीने गड-किल्ल्यांची साफसफाई

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत, त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी महाराज ग्रुप गडसंवर्धन पिंपरी चिचवड तर्फे रविवारी (दि ५) मावळ किल्ले तुंगगड येथे गडसंवर्धन मोहीम राबवणयात आली. सर्वप्रथम गडावरील ध्वज बदलण्यात आला. शिववंदना घेऊन प्रवेशद्वार, पायऱ्या, तसेच जे अवशेष गवता खाली गेले होते, ते साफ करण्यात आले. गडावरील सर्व कचरा गडाच्या खाली कचरा कुंडीत आणुन टाकण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अक्षय नाळे, सुशील पोतदार, अतुल महाडिक, सुरज करांडे, शुभम देशमुख, परमेश्वर त्रिमले, शिवम खिल्लारी, ओमकार जाधव, सागर मोरे, अमित मालुसरे, श्री मरगळ, कैलास सोनटक्के, राहुल ईबितदार, अतिश अगरक, कैलास चाकोरे, रुपेश पाटसकर, दिपक खंडगावे आदी ४० स्वयंसेवकांन...
70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी
पुणे

70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी

पुणे-हिंजवडी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. हिंजवडी नजीकच्या माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये "लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. दिवसाला सुमारे तीन ते दहा...
कर्जमाफीवरून रोहित पवारांनी घेतला फडणवीसांचा समाचार
पुणे

कर्जमाफीवरून रोहित पवारांनी घेतला फडणवीसांचा समाचार

पुणे, (लोकमराठी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली होती. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत, सरकारची ही योजना फसवी आहे. सरकारने सरसकट कर्ममाफीचं आश्वासन पाळलं नाही असा आरोप त्यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपांचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. रोहित पवार म्हणाले की, विरोधक आरोप प्रत्यारोप करणारच त्यांनीही कर्जमाफी केली होती. दीड लाखाचं कर्ज माफ केले होते. पण त्यावरचे व्याज भरले तरच कर्जमाफी होणार होती. त्यामुळे ती योजना यशस्वी झाली नाही. काही शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा अधिक असणारं कर्ज भरले पण अजूनही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यांनी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले. ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या कागदपत्रावर सह्या करण्यास भाग पाडले. कर्जमाफीचा...
शैक्षणिक, पुणे

समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. प्रकाश पवार

औंध-पुणे (लोकमराठी) : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुण, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश पवार म्हणाले की, "समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असून, समाजपरिवर्तनाची प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी अनेक माणसे चैत्यभूमीला भेट देतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार समजून घेऊन आत्मसात करायला हवेत. महात्मा जोतीराव फुले म्हणायचे जशी शेतीला पाण्याची गरज असते. तशीच...