ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने पत्रकारांचा सपत्नीक सत्कार
रिसोड/प्रतिनिधी शंकर सदार :- स्थानिक सिव्हिल लाईन स्थित ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रिसोड शहरासह तालुक्यातील अधिकृत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दीना निमित्ताने ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांच्या पुढाकाराने व ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचलिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जानेवारी शनिवारी सकाळी 9 वाजता पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तर सत्कार मुर्ती म्हणून सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार तेजनकर, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, ...