कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका
कर्जत, ता. १९ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने १५ जागेवर एकहाती विजय मिळवत भाजपाचा दारुण पराभव केला. माजीमंत्री राम शिंदे यांना अवघे दोनच जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा आ. रोहित पवार यांनी राम शिंदेना पराभवाचा झटका देत कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तातंर घडविले. कर्जतकरानी राम शिंदे यांनी प्रचारादरम्यान आ. रोहित पवार यांच्यावर दहशतीच्या राजकारणाचा केलेला आरोप खोडून काढला. सर्वच विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचे आशीर्वाद घेत जल्लोष केला. मात्र, राष्ट्रवादीच्या मनीषा सोनमाळी यांचा प्रभाग क्रमांक चारमधील पराभव राष्ट्रवादीस जिव्हारी लागला.
कर्जत नगरपंचायतीच्या एकूण १७ जागेसाठी ८१.८७% मतदान संपन्न झाले होते. या सर्व जागेची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात दोन फेरीत ...