बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा घेण्याचा उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये सुरू
मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रारदाराच्या पत्राची घेतली दखल
पिंपरी : स्मार्ट सिटी, आयटी सिटी, मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहर (Pimpri Chinchwad) नावारूपाला येत आहे. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले असून जमिनीचे खरेदी, विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. यामध्ये काही लोकांचा बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड मध्ये वाढत आहेत. असाच एक प्रकार ताथवडे येथील (सर्वे नंबर १६१ चा ४ आणि ५ क्षेत्र ७० आर) आसवानी असोसिएट्सचे भागीदार श्रीचंद आसवानी (Shrichand Asawani) यांच्या बाबत वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत होत असल्याची माहिती श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, आसवानी असोसिएटच्या नावे ताथवडे येथील सर्वे नंबर १६१ मधील ४ आणि ५ मधील जागा ओव्हाळ कुटुंबीयांकडून आम्ही २८/२/२००८ रोजी दस्त नोंदणी क्रमांक १०१२/२/२००८ च्य...










