कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना यांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न झाला असून सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचे मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना ही गेल्या ५२० दिवसांपासून स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे अखंड कार्य करीत असून पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यावरणाशी निगडित विविध जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामाजिक संघटनेचे ३०ते ३५ स्वयंसेवक ४ व ५मार्च रोजी मुंबई अभ्यास दौऱ्यावर गेले होते.
यावेळी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली(नवी मुंबई)येथे फ्लोमिंग पक्षी माहिती, तसेच पाण्यातील खारफुटी वृक्ष आणि त्यांचे पाण्यातील मासे,किटक आणि पक्ष्यांसाह वातावरणातील शुद्ध हवा, मासे उत्पत्ती आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि विविध जैविक घटकांच...










