कर्जत नगरपंचायत निवडणुक|ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या प्रवर्गातून|चार प्रभागासाठी १० उमेदवार रिंगणात; १२ उमेदवारांचे अर्ज मागे
कर्जत, दि. १० (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीच्या उर्वरित चार प्रभागासाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले असून सोमवारी १२ उमेदवारांनी आपले १५ उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली. प्रभाग क्रमांक १ आणि ५ मध्ये दुरंगी लढत असून ३ व ७ मध्ये तिरंगी लढती पहावयास मिळत आहे. मागील वेळी उमेदवारी अर्ज माघार घेताना झालेला गदारोळ पाहता यंदा कर्जत नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कमालीची शांतता होती.
कर्जत नगरपंचायतीचा १३ जागेसाठी दि. २१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. ओबीसी आरक्षणामुळे चार प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या नुतन आदेशानुसार ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या प्रवर्गातून घेत निवडणूक प्रक्रि...