Tag: Pune

मराठा आरक्षणा संबंधी समन्वयकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करा 
पिंपरी चिंचवड, वायरल

मराठा आरक्षणा संबंधी समन्वयकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करा

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांची राज्यपालांकडे मागणी पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर मराठा आरक्षण शमविण्यासाठी मराठा मोर्चाच्या स्वयंघोषित समन्वयकांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मराठा आरक्षण शमविण्यासाठी आंदोलनात फूट पाडण्याच्या हेतूने तात्कालिन सत्ताधारी नेत्यांनी पैशाची देवाण-घेवाण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामधील संबंधीत आत्ताचे मराठा आरक्षण उप-समितीचे अध्यक्ष व विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैशांचे आमिष दाखवून मराठा आरक्षणा संदर्भांत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या काही स्वयंघोषित समन्वयकांबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सदर ऑडिओ क्लिपच्या संभाषणावरुन स्पष्ट होत आहे.त्यामुळे व्हायरल झालेल्या ऑडिओ तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन

हडपसर, दि. १७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे अल्युमनी असोसिएशन, प्लेसमेंट सेल व मॅजिक बस इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे श्री. प्रवीण खिलारे, श्री.सागर ढेकळे व अवधूत राऊत उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनीसुद्धा भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न तरुणांच्या जीवावर पाहिले होते. आजच्या तरूणांनी स्कील बेस एज्युकेशन घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करावा. असे मत प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी व्यक्त केले. श्री.अवधूत राऊत यांनी विद्यार्थ्यांना...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज येथे प्लेसमेंट सेल आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने 'जॉब फेअर 2022-23 कंनेक्टींग टू फ्युचर' हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांच्या कल्पनेमधून सदर उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ॲकॅडमी मधील मा. अस्मिता राऊत उपस्थित होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील विविध स्किल डेव्हलप करायला पाहिजेत. तसेच इंग्रजी कम्युनिकेशन स्किल चांगले केल्यास त्यांना जगाच्या बाजारपेठेत मानाचे व सन्मानाचे स्थान प्राप्त होईल. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

हडपसर, 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. पद्ममणी कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते प्रा. डॉ. हनुमंत भवारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्याने कोणते तरी ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी वाचन, लेखन, मनन व चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांची चरित्रे वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. वाचन हे माणसाला सक्षम बनवते व सत्याचा परिचय...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या वतीने 10 ऑक्टोंबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल जागृती व्हावी यासाठी PSY FUN कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. त्यामध्ये selfie Point, Psychological Movie, Posters, Lectures या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावरील पोस्टर तयार करून त्याचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. महेंद्र शिंदे सरांनी केले. तसेच यावेळी Selfie Point चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना Psychological Movie दाखविन्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ...
महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप

शहरातील पाच रुग्णालयामध्ये एनआयसीयु युनिट तातडीने सुरू करणार - सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण पांडुंरंग गोफणे यांचे आश्वासन पिंपरी चिंचवड : मनपाच्या विविध रुग्णालयात लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. मनपाच्या (PCMC) रुग्णालयात बाळंतपण विनामूल्य असल्याने अनेक गरजू,गरीब व श्रमिक रुग्णालयाकडे नागरिकांचा लोंढा जास्त आहे. त्यामुळे येथील मुख्य रुग्णालयात प्रसूतिगृहमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करावे,अशी मागणी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांचे कडे केली आहे.आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाण मनपाच्या प्रवेश द्वारासमोर निदर्शने करण्यात आली. चेतन बेंद्रे बोलताना म्हणाले की (Chetan Bendre), नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच प्रसुतीपश्चात बाळाला योग्य सुविधा ...
संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी 
पिंपरी चिंचवड, सामाजिक

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी

पिंपरी : विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समस्त बहुजन समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. काळेवाडीतील युवानेते बाबासाहेब जगताप यांच्या सहकार्याने संत शिरोमणी श्री सावता महाराज प्रतिष्ठान यांना बांधकामसाठी लागणारे मटेरियल आणि रोख रक्कम सहीत रु ५१००० हजार रूपयांची देणगी समस्त बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आली. ही देणगी समाजप्रबोधनकार शारदा मुंढे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी प्रहार पक्षाचे नेते संजय गायके, सामाजिक नेत्या रेखा काटे, रहाटणी गावचे सामाजिक नेते तात्या शिंगारे, दिलीप पवार, मनोज जाधव, विलास पवार, सिताराम जगताप, पंकज पवार, अरुण मैराळे, अनिल मखरे, निलेश भोसले, रंगनाथ भुजबळ, कोंडीबा कुटे, बापु काटे, सचिन पार्टे आदी उपस्थित होते. बाबासाहेब जगताप...
स्वररंग २०२२ स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज प्रथम
पुणे, शैक्षणिक

स्वररंग २०२२ स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज प्रथम

हडपसर, ता. ५ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वररंग २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे शहरातील ३६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील ६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वररंग २०२२ स्पर्धेत सर्वात जास्त पारितोषिके मिळविणारे कॉलेज म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून कॉलेजचे नाव उंच करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक लोक वाद्यवृंद सोलो महावीर रणदिवे (FYBA), द्वितीय पारितोषिक वेस्टर्न गाणे शिवानी वाघ (FYBSc) यांना मिळाले. नृत्य स्पर्धेमधील प्रथम पारि...
कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. फाईन आर्ट कॉम्पिटिशनमध्ये ऑन द स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग, कार्टूनिग, रांगोळी, ऑन द स्पॉट फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन या स्पर्धा घेण्यात आल्या. लिटररी इव्हेंटमध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि वादविवाद या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. डान्समध्ये ट्रायबल डान्स व क्लासिकल डान्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. म्युझिक स्पर्धेमध्ये क्लासिकल, सोलो, इंडियन ग्रुप सॉंग, वेस्टर्न ग्रुप सॉंग, सोलो डान्स अशा अनेक डान्स प्रकारांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. थिएटर कॉम्पिटिशनमध्ये वन ऍक्ट प्ले, स्किट, माईम, मिमिक्री अशा एकूण 25 स्पर्धांचे आयोजन कॉलेजमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धाचा उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उ...
सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे
राजकारण, पिंपरी चिंचवड

सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. ४ ऑक्टोबर २०२२ : शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या प्रामाणिक हेतूने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने "संवाद सोसायटीधारकांशी" हा अभिनव असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण करावे, आणि त्या प्रश्‍नांवर सत्ता मिळवावी, या अपेक्षेने झपाटलेल्या एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी भाजपच्या एकनाथ पवार यांना केला आहे. शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सोसायटीधारकांशी उद्या (बुधवार) रोजी थेरगाव येथे संवाद साधणार आहेत. "संवाद सोसायटीधारकांशी" या कार्यक्रमावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी टीका केली होती. या टी...