एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) : भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री. अंकुश कारकर यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे पाटील यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे यांनी दोन्ही सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या.
भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री.अंकुश कारकर यांनी नोकरीला नोकरी न समजता रयत शिक्षण संस्थेत सेवा म्हणून काम केले. हे रयतेचे दोन्ही गुणी सेवक असल्याचे गौरवउद्गार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी काढले. याप्रसंगी अनंतराव पवार कॉलेज पिरंगुट येथील प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या विद...










