Tag: Pune

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग व आय.क्यू.ए.सी.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रल्हाद जाधव यांनी विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे महत्त्व सांगितले. तसेच तरुण पिढीला व्यवसाय करायचा असेल तर कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयाचे ज्ञान असल्यास विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजना जाधव यांनी तर आभार डॉ. एम. एन. रास्ते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल पवार यांनी केले. का...
सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?
सिटिझन जर्नालिस्ट

सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?

निगडी मधील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूब रित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतू अलीकडेच काही व्यावसायिकांनी सदर पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी 'खाऊ गल्ली' चालू केली आहे.तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार चालू केला आहे. जर का निगडी उड्डाणपुलाखाली ' खाऊ गल्लीच' उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे. दिपक खैरनार ...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन
पुणे, सामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन

हडपसर : (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अनंत चतुर्दशीनिमित्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरातील गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य केले. यावेळी निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृतीचे कार्य केले. ...
एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. ...
भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी मधील इंडस्ट्रीज उद्योजक व कामगार यांनी आम आदमी प्रवेश केला. आपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते व आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल महादेव टाकळे (दिघी), सुरेश बाबू कांबळे (भोसरी), गौतम भगवान इंगळे (काळेवाडी), सुनील सूर्यकांत शिवशरण (भोसरी), पांडुरंग जगन्नाथ राऊत (भोसरी), बालाजी शामराव कांबळे (भोसरी), राहुल झोटिंग कांबळे (मोशी) आदींनी प्रवेश केला. या वेळी आप पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डाॅक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, आप महिला नेत्या सिता केंद्रे, कमलेश रनावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंडस्ट्रीज उद्योजक पांडुरंग राऊत, सुरेश कांबळे व आनिल टाकळे यांनी भाजप सरकार वरती नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जाणे हे...
पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांचा निर्धार पिंपरी, ता. 23 : पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या (MSCDA) पॅनलला मताधिक्य देणार आहे. असा ठाम विश्वास केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदच्या निवडणुकीचा अंतीम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी आमदार अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जग्गनाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड तर्फे सभा आयोजित केली होती. त्यावेळी विवेक तापकीर बोलत होते. या सभेला माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, विजय पांडुरंग पाटील, एमएससीडीए पश्चिम क्षेत्रा...
राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण तर अब्दुल शेख याची एक सुवर्ण पदकांची कमाई
क्रीडा

राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण तर अब्दुल शेख याची एक सुवर्ण पदकांची कमाई

पिंपरी : छत्तीसगड मुख्यमंत्री चषक आणि पहिला AITWPF फेडरेशन कप २०२२, राष्ट्रीय पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन चॅम्पियनशिप, जी सरदार बलबीर सिंग जुनेजा इनडोर (एसी) स्टेडियम, रायपूर, छत्तीसगड येथे १२ ते १५ तारखेदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय स्पर्धेत १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५१८ खेळाडूंनी भाग घेतला. हा कार्यक्रम छत्तीसगड पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन असोसिएशनने आयोजित केला होता आणि अखिल भारतीय पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन फेडरेशन AITWPF द्वारे मान्यता दिली होती. या चॅम्पियनशिपमध्ये, मणिपूर राज्याने पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि CM ट्रॉफी आणि पहिला फेडरेशन कप २०२२ जिंकला, म्हणजे हरियाणा आणि नागालँडने पारंपरिक कुस्तीमध्ये अनुक्रमे २ रे आणि ३ रे स्थान जिंकले. आणि केरळ आणि छत्तीसगडमध्ये पँक्रेशन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ...
रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी :“युद्धे, महायुद्धे, घात-अपघात, कोरोना, विविध आजारपणे आणि कितीतरी घटना, दुर्घटना जगाच्या पाठीवर नित्य घडत असतात. त्यावेळी लक्षावधी रुग्णांची सेवासुश्रुषा करावी लागते. त्यावेळी महत्त्वाची गरज भासते ती रक्ताची. रक्ताचा तुटवडा असेल तर वेळ प्रसंगी प्राणही जाऊ शकतो म्हणून पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती रक्तदानाची. रक्तदान हा आजच्या काळातील महायज्ञ आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.” असे विचार प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी या शिबिराचे उद्घाटन करताना वरील विचार मांडले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना व N.C.C. व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन क...
थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे
विशेष लेख

थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे

धर्म आणि धर्मग्रंथांनी पूर्वीच्या काळी खूप महत्वाचे काम बजावले आहे.. समाजव्यवस्था कशी असावी? दुसऱ्याला त्रास न होता कसे वागावे? न्यायनिवडा कसा करावा? नीतीने वागणे म्हणजे काय? खरं खोटं म्हणजे काय? चांगलं वाईट कसं ठरवायचं? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे… तेंव्हाच्या उपलब्धतेनुसार आणि निसर्गानुसार पेहराव कसा असावा, स्त्री-पुरुषांनी काय घालावे, याचेही नियम धर्मच बनवत होता. पूर्वीचे वैद्यकशास्त्र आता ईतके प्रगत नव्हते म्हणून आजार होऊ नयेत यासाठी कोणत्या मोसमात काय खावे काय प्यावे याचेही मार्गदर्शन धर्मच करत असे.. वाळवंटात पाणी जपून वापरावे लागते म्हणून फक्त आठवड्यातून एकदा अंघोळ, वाळूच्या वादळकणांपासून संरक्षण म्हणून चेहरा अन डोके झाकून घेण्याची पध्दत, अशा छोट्या छोट्या गोष्टीत देखील धर्मच मार्गदर्शन करत होता. पूर्वी सतत होत असलेल्या युद्धांमध्ये खूप मोठ्या...
‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे नवीन पुस्तक प्रकाशित
सामाजिक

‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे नवीन पुस्तक प्रकाशित

लोकमराठी न्यूज नेटवर्क : प्रा. डॉ. शरद गायकवाड लिखित नवा ग्रंथ 'प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा' नुकतंच छापून आलं आहे. या पुस्तकात इतिहासाच्या पानात दडलेल्या २२ महाण व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला गायकवाडांनी प्रकाशात आणले आहे. सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ, फुले-आंबेडकरी चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, नामांतराची चळवळ, कला-सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे प्रतिभावंत नायक, अशा अनेकांचा परिचय या पुस्तकातून होतो आहे. साहित्य आणि सामाजिक चळवळीत झोकून देऊन काम करणारे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचा हा ग्रंथ विकत घेवून त्यांच्या लेखनाला पाटिंबा देणे हे मातंग समाजातील शिक्षीत लोकांचे आद्य कर्तव्य आहे, आणि मातंग समाज हा ग्रंथ घेणार, हा मातंग साहित्य परिषदेचा विश्वास आहे. या नव्या पुस्तकाचे मातंग साहित्य परिषद स्वागत करीत आहे. अश...