काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : काळेवाडीतील विजयनगर परिसरात दिवसाआड व अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले असून काही भागात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची पिण्याची पाण्याची गरज व आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत इरफान शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कायमस्वरूपी निवासी असून आम्ही नियमारित्या शासकीय, निमशासकीय कर भरत आहोत. तसेच मतदानाचा हक्क देखील बाजवितो. आपणास माहिती देऊ इच्छितो की, आम्ही आपणास मार्च महिन्यात दररोज पाणीपुरवठा करण्यासंबंधी विनंती अर्ज केले होते. तसेच नागरिकांना पाण्याची गरज वादळी आहे. मात्र, अद्याप कोणतेच ठोस निर्णय ना झाल्याने विजयनगर भागात राहणारे सदनिकाधार...










