#lockdown : पिंपरी चिंचवड शहरात भाजीपाला व किराणाचा काळाबाजार
File photo
पिंपरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने "लॉकडाऊन" जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेत अनेक किराणामाल विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री सुरु केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत अक्षरशः काळा बाजार सुरू केल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
या संचारबंदीमध्ये शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. दुकाने बंद होतील, टंचाई भासेल या भीतीपोटी नागरीक आपापल्या परिसरात अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करत गर्दी करत आहेत. याचाच गैरफायदा घेत आहेत.
उपनगरातील किराणामाल दुकानात आणि किरकोळ विक्रेते पिंपरी मार्केट मधून होलसेल दरात भुसार माल आणून साठा करून ठेवला आहे. काळा बाजार सुरु करत अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांनी टोमॉटो, बटाटा, कांदा, हिरवी मिरची जादा दराने विकत आहेत. "हेच कमविण्याचे दिवस आहे...