माणसाने आधी चांगला माणूस बनले पाहिजे – प्रा. नरेंद्र बनसोडे
काँग्रेसचे प्रा. नरेंद्र बनसोडे यांचे रॉयल फाउंडेशनच्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात प्रतिपादन
पिंपरी : जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचण्याच्या आधी माणूसाने चांगला माणूस बनणे गरजेचे असून भारताचा सुजाण नागरिक बनले पाहिजे. तसेच आपल्या आई-वडिलांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र बनसोडे यांनी काळेवाडी येथे केले.
रॉयल फाउंडेशन व पदमने क्लासेस यांच्या वतीने काळेवाडीतील ज्ञानेश्वर कॉलनी येथे नुकतेच दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा शैलीत उदाहरणांमधून जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर घेवयाच्या निर्णयाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
त्याप्रसंगी रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि रमेश नांगरे, उपाध्यक्ष आनंद का...