पिंपरी चिंचवड

काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : काळेवाडीतील विजयनगर परिसरात दिवसाआड व अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले असून काही भागात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची पिण्याची पाण्याची गरज व आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत इरफान शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कायमस्वरूपी निवासी असून आम्ही नियमारित्या शासकीय, निमशासकीय कर भरत आहोत. तसेच मतदानाचा हक्क देखील बाजवितो. आपणास माहिती देऊ इच्छितो की, आम्ही आपणास मार्च महिन्यात दररोज पाणीपुरवठा करण्यासंबंधी विनंती अर्ज केले होते. तसेच नागरिकांना पाण्याची गरज वादळी आहे. मात्र, अद्याप कोणतेच ठोस निर्णय ना झाल्याने विजयनगर भागात राहणारे सदनिकाधार...
प्रशासनविरोधात मोठ्या जनआंदोलनचा निर्धार; दफनभूमी प्रश्नी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

प्रशासनविरोधात मोठ्या जनआंदोलनचा निर्धार; दफनभूमी प्रश्नी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

दफनभूमीच्या मागणीसाठी मुस्लिम बांधव सरसावले; परिसरातील सर्व मस्जिद प्रमुखांची बैठक थेरगाव : दफनभूमीच्या प्रश्नवर थेरगाव येथील मक्का मस्जिद मध्ये थेरगाव ,काळेवाडी ,वाकड परिसरातील सर्व मस्जिद मधील प्रमुखांची बैठक अयोजित करण्यात आली होती. मागील २५ वर्षांपासून परिसरातील नागरिक दफनभूमीची मागणी करीत आहेत. अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून देणेबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरात मुस्लिम कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास त्याला जागा उपलब्ध नाही , चिंचवड च्या दफनभूमीमध्ये खोदकाम करताना सांगाडे आढळून येतात. त्यामुळे प्रेतांची विटंबना व अवहेलना होत आहे. या बैठकीमध्ये दफनभूमी प्रश्नी शासनाविरोधात लढा देण...
सुनिल तात्या पालकर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या शिवनेरी किल्ला मोहिमेत तरूणांना दिले शिव इतिहासाचे धडे
पिंपरी चिंचवड

सुनिल तात्या पालकर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या शिवनेरी किल्ला मोहिमेत तरूणांना दिले शिव इतिहासाचे धडे

पिंपरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेकांनी पुस्तक, चित्रपट, मालिका किंवा इंटरनेटच्या माध्यमातून वाचला, ऐकला आहे. मात्र, या इतिहासाच्या पाऊलखुणा प्रत्यक्ष अनुभवता याव्यात, तसेच गडकिल्ल्यांची माहिती व पाहणी तरूणांना करता यावी. यासाठी शिवशंभु प्रतिष्ठानच्या सहाय्याने व सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर यांच्या वतीने शिवनेरी किल्ला मोहिम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी तरूणांना शिव इतिहासाचे धडे देत, गडावर स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत सुनिल तात्या पालकर, सुनीता चव्हाण, अरुण आब्रे, विजय सुतार, प्रदीप बांद्रे यांसह सुमारे ७० शिवभक्त सहभागी झाले होते. त्यामध्ये सुनिल तात्या यांनी आपल्या पाच महिन्याच्या नातवालाही सहभागी केले होते. पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरातून तरूणांनी शिवनेरी किल्ल्यावर पोहचत छत्रपती शिव...
पिंपळे सौदागरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

उन्नती सोशल फाऊंडेशन आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळे सौदागर : येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने व कृष्णा क्लासिकल होमिओपॅथी व सह्यांद्री स्पेशालिटी लॅब यांचा सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य आणि कोलेस्टेरॉल व शुगर तपासणी शिबीर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिबिराचे आयोजक व उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, भानुदास काटे पाटील, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, विकास काटे, शंकरराव पाटील, रमेश वाणी, सुभाषचन्द्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कृष्णा क्लासिकल होमिओपॅथी क्लीनिकचे होमिओपॅथी तज्ञ डॉ. विवेक माळी व डॉ. स्वाती माळी यांच्या सहयोगाने हे शिबीर यशस्वी झाले. परिसरातील शेकडो तरुण आणि ज्य...
महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य

जनतेसाठी अभिप्राय फॉर्म ठेवण्याचे मा आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश पिंपरी : मनपामधील विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना अधिकाऱ्यांचा उर्मटपणा मुजोरपणा अनुभवास येतो, बरेचदा अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतात, असले तरी नागरिकांची भेट नाकारतात. त्यांना तासन तास ताटकळत ठेवतात. त्याअनुषंगाने राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांनी सार्वजनिक प्राधिकरणाणे अभ्यागतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भात जागृत नागरिक महासंघाच्या नितीन यादव, उमेश सणस, राजेश्वर विश्वकर्मा व अशोक कोकणे या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांची दि एक नोव्हेंबर 2021 रोजी समक्ष भेट घेऊन त्यांना कोकण खंडपीठाच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. जागृत नागरिक महासंघाच्या निवेदनावर व्यापक समाजहित लक्षात घेत, अतिशय सकारात्मक प्र...
रखडलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल | सुनील कुसाळकर यांचा इशारा
पिंपरी चिंचवड

रखडलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल | सुनील कुसाळकर यांचा इशारा

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : प्रभाग क्रमांक दोन बोल्हाईचा मळा जाधववाडी चिखली येथील कॉलनी क्रमांक सात (२) मधील रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणून बुजून रखडवले आहे. यामध्ये स्थानिक सत्ताधारी व ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट नसल्याने हे घाण पाणी रस्त्याच्या वरून जात आहे. परिणामी आरोग्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, तरी ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सुनील कुसाळकर सोबत अनंत सुपेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस...
पिंपरी चिंचवड महानपालिकेतील स्थायी समितीचा भ्रष्टाचार रंगे हात पकडून हि किरीट सोमय्या गप्प कसे – डाॅ. कैलास कदम
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड महानपालिकेतील स्थायी समितीचा भ्रष्टाचार रंगे हात पकडून हि किरीट सोमय्या गप्प कसे – डाॅ. कैलास कदम

पिंपरी चिंचवड : महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाच प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडून तुरूंगात रवानगी केली. मात्र, सकाळ, दुपारी, संध्याकाळ विरोधी पक्षांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणणारे माजी खासदार किरीट सोमय्या आत्ता गप्प कसे? असा हल्लाबोल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी केला. मुकाई चौक, किवळे येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. त्यावेळी एम. बी. कॅम्प व विकासनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संयोजन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस शाम भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी प्रस्तावना मध्ये पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार कै.प्रा. रामकृष्ण मोरे साहेबांच्या विचारांना उजाळा दिला. सभेमध्ये देहुरोड ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तु, अल्पसंख्याक सेल मावळ तालुका अध्यक्ष गफुर शेख, फुले...
संविधान किती ही चांगले असले, तरी राज्यकर्ते त्याचा गैरवापर करतात – अॅड. सतीश कांबीये
पिंपरी चिंचवड

संविधान किती ही चांगले असले, तरी राज्यकर्ते त्याचा गैरवापर करतात – अॅड. सतीश कांबीये

चिंचवडगाव : संविधान किती ही चांगलं असले, तरी राज्यकर्ते त्याचा वापर नीट करीत नाहीत. त्यांच्या मदतीला पत्रकारिता व न्याय व्यवस्था असल्याने संविधानाचा गैरवापर केला जातो. मात्र, संविधानाबाबत जनजागृती केल्यास संविधानाचा गैरवापर टाळता येऊ शकतो. असे प्रतिपादन संविधान अभ्यासक अॅड. सतीश कांबीये यांनी येथे केले. येथील प्रबुद्ध संघाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून संविधान अभ्यासक अॅड. सतीश कांबीये होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात अणुराधा सोनवणे यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर सोनवणे हे होते. त्याप्रसंगी नगरसेवका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, डांगे पाटील यांच्यासह प्रबुद्ध संघाचे सभासद व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी...
नागरिकांनी भारतीय संविधानाप्रत जागरूक रहावे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

नागरिकांनी भारतीय संविधानाप्रत जागरूक रहावे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी : ‘मागील काही काळ हा आपल्या सर्वांच्यासाठीच आव्हानात्मक असा राहिलेला आहे. कोरोना या विषाणूचा प्रसार, त्यामुळे लॉकडाऊनचे बंधन, त्यातून उद्भवलेली बेरोजगारी, महागाई या सर्व समस्यांना आपण तोंड देत आहोत. आता परिस्थिती लसीकरण आदी उपाययोजनांमुळे सुरळीत होत आहे. आपणही आता भारतीय संविधानाप्रत जागरूक राहून देशाची सर्व व्यवस्था मुळ पदावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे’, असे उद्गार पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी संविधान दिनाच्या निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उच्चारले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकताच ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला . या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . पांडुरंग गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व प्र...
संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

पिंपरी : आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिनानिमित्त व आम आदमी पार्टीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नचिकेत बालग्राम विद्यामंदिर गुरुद्वारा वाल्हेकरवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूं व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच आपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविक प्रतिमेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे अन्नदान करण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख, कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट, माधुरी मठ, कपिल मोरे, ब्रह्मानंद जाधव, एकनाथ पाठक, अमर डोंगरे, आशुतोष शेळके, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...