पिंपरी चिंचवड

#lockdown : पिंपरी चिंचवड शहरात भाजीपाला व किराणाचा काळाबाजार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

#lockdown : पिंपरी चिंचवड शहरात भाजीपाला व किराणाचा काळाबाजार

File photo पिंपरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने "लॉकडाऊन" जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेत अनेक किराणामाल विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री सुरु केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत अक्षरशः काळा बाजार सुरू केल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. या संचारबंदीमध्ये शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. दुकाने बंद होतील, टंचाई भासेल या भीतीपोटी नागरीक आपापल्या परिसरात अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करत गर्दी करत आहेत. याचाच गैरफायदा घेत आहेत. उपनगरातील किराणामाल दुकानात आणि किरकोळ विक्रेते पिंपरी मार्केट मधून होलसेल दरात भुसार माल आणून साठा करून ठेवला आहे. काळा बाजार सुरु करत अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांनी टोमॉटो, बटाटा, कांदा, हिरवी मिरची जादा दराने विकत आहेत. "हेच कमविण्याचे दिवस आहे...
#coronavirus : भाजप नगरसेविका सुनिता तापकीर व राज तापकीर यांनी स्वखर्चाने केली औषध फवारणी
पिंपरी चिंचवड

#coronavirus : भाजप नगरसेविका सुनिता तापकीर व राज तापकीर यांनी स्वखर्चाने केली औषध फवारणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : कोरोना व्हायरसच्या पाश्वभुमी भाजपच्या नगरसेविका सुनिता हेमंत तापकीर व चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीरनगर परिसरात औषध फवारणी केली. कोरोना (#COVID19) व्हायरसने जगात थैमान घातले असून लाखो नागरिकांना त्याची बाधा झाली आहे. तर हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक रहावे व आरोग्य स्वच्छ ठेवावे, आम्ही आपल्यासोबत आहोत. असा नागरिकांना दिलासा देत राज तापकीर यांनी स्वतः पंपाने औषध फवारणी केली. तापकीरनगरमधील त्रिशक्ति काॅलनी, परिस काॅलनी १,२ व ३, त्याचबरोबर श्रीराम काॅलनी, स्वस्तिक काॅलनी, मोरया काॅलनी १ व २, तुळजाभवानी काॅलनी, साईमल्हार काॅलनी, तापकीर चौक रोड व विविध सोसायटीमध्ये राज तापकीर यांनी प्रत...
माथाडी कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी लेव्हीची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा व्हावी
पिंपरी चिंचवड

माथाडी कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी लेव्हीची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा व्हावी

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. आपल्या देशातही कोरोना विषाणू या आजाराशी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने काही महत्वाचे आदेश जारी केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसाचे लाॅकडाऊन जाहिर केले आहे. कोरोना आजाराचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय व आदेश कौतुकास्पद व देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सर्व देशभरातील नागरीक या आदेशाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून घरात राहत आहे. महाराष्ट्रातील माथाडी, मापाडी व अंगमेहनतीचे काम करणाऱ्या अनेक माथाडी कामगारांनी सुद्धा सरकारी आदेशाचे पालन केले आहे. विशेषतः या कामगारांचे हातावर पोट आहे. तरीही ते या बंदमध्ये उस्फुर्तपणे सहभागी आ...
कोरोनाला हरविण्याची संकल्प गुढी
पिंपरी चिंचवड

कोरोनाला हरविण्याची संकल्प गुढी

पिंपरी : गुढीपाडवा…सुख, समृद्धी आणि मांगल्याचा सण…हिंदू नववर्षाची सुरुवात अन् साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण… मात्र, या सणावर कोरोनाचे गडद सावट असल्याने घरच्या घरी थांबून ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी अनेकांनी उभारली. यंदा या मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही करता न आल्याने पाडव्याचा गोडवा हरवला. गुढीपाडव्याला लागणारे विविध साहित्य यंदा बाजारात दाखल झाले नाही. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी गर्दीची ठिकाणे बंद केल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक शहरात फिरकलेच नाहीत. शहरात गुढी उभारण्यासाठी बांबूही उपलब्ध झाला नाही. यंदा कोरोनामुळे उलाढाल ठप्प झाली. काही ग्राहकांनी चार दिवसापूर्वी धार्मिक विधीसाठी लागणार्‍या किरकोळ साहित्याची खरेदी केली. मात्र प्रत्येक दिवसाला कोरोनाची छाया गडद होत असल्याने खरेदीचा मुहूर्त साधता आला नाही. बाजारपेठ आणि वाहतूक पूर्णत: बंद...
रहाटणीतील धर्मवीर संभाजीराजे उद्यानात ओपन जिम
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील धर्मवीर संभाजीराजे उद्यानात ओपन जिम

लोकमराठी न्यूज नेटवर्क रहाटणी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रहाटणी (प्रभाग क्रमांक 27) येथील धर्मवीर संभाजीराजे उद्यान येथे नवीन ओपन जिम तयार करण्यात आली आहे. या जिमचे उद्घाटन नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर, युवा नेते शुभम नखाते व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. https://youtu.be/O6x88iceIb4...
वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप | नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा पुढाकार
पिंपरी चिंचवड

वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप | नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा पुढाकार

लोकमराठी न्यूज नेटवर्क रहाटणी : नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून जगभरात पसरलेल्या व भारतात दाखल झालेल्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मास्क वाटपाचा उपक्रम राबवला. चीनमधून जगातील विविध देशात पसरलेल्या कोरोना वायरसमुळे हजारो नागरिकांचे बळी गेले असून भारतात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर नुकतेच करोनाचे रूग्ण पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, योग्य काळजी व उपाययोजना केल्यास करोनापासून संरक्षण करणे सहज शक्य आहे. असे सरकार व डॉक्टरांडून सांगितले जात आहे. सामाजिक बाधिलकी व मास्कचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांचे कोरोनापासून सरंक्षण व्हावे, यासाठी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रहाटणीतील शाळेत मुला-मुलींना, सोसायटी सदस्य व ज्येष्ठ नागरिकांना मोफत मास्क वाटप केले. https://twitt...
न्या. लोया मृत्यूप्रकरण तडीस नेऊ – निवृत्त न्या. कोळसे पाटील |अपना वतनचा “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरता स्थगित
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

न्या. लोया मृत्यूप्रकरण तडीस नेऊ – निवृत्त न्या. कोळसे पाटील |अपना वतनचा “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरता स्थगित

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : न्या. लोया प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्यायालयीन मार्गाने हे प्रकरण तडीस नेहण्याच्या निवृत्त न्या. बी.जी. कोळसे पाटलांच्या आश्वासनाला मान देत अपना वतनचा "अन्नत्याग सत्याग्रह" तात्पुरता स्थगित करण्यात आला. न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारपासून (ता. ७) हे आंदोलन सुरू होते. न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी, या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्यास राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आला होता. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी भेट दिली....
अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे ‘एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची’ पर्यावरण पूरक उपक्रम
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे ‘एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची’ पर्यावरण पूरक उपक्रम

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : एक पोळी होळीची भुकेलेल्या मुखाची हा पर्यावरण पूरक उपक्रमांचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दरवर्षीप्रमाणे होळीच्या दिवशी आयोजन केले आहे. अनिस पिंपरी चिंचवड शाखा दरवर्षीप्रमाणे सर्व सामाजिक संघटना व शहरातील नागरिकांना आवाहन करते, की आपण होळीच्या सणाला ज्या पूरण पोळ्या अग्नीस नैवेद्य म्हणून अर्पण करतो, त्याच पोळीने एका गरजू भूकेल्याचे पोट भरुया! आपल्या विभागवार टीम, सहकारी मंडळे व स्थानिक सामजिक संघटनांच्या मदतीने हा उपक्रम सोमवार (दि. ९ मार्च) राबवत आहे. होळी हा सण पर्यावरण पूरक व पारंपरिक उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिक व मंडळास आपण आवाहन करत आहोत कि, होळी सण साजरा करताना पुढील ठळक मुद्यांचा अवलंब करावाच. परंतु पोळीदान कार्यक्रम जरूर राबवावा. तसेच होळी हि जास्तीत जास्त २/३ फुट उंचीचीच असावी व त्यात आपण पाला पाचोळा व घरातील मो...
मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा – वैशाली माने
पिंपरी चिंचवड

मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा – वैशाली माने

स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमात वैशाली माने यांचा गौरव करताना अश्विनी पटवर्धन, मनाली गाडगीळ, मनाली देव. स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिलादिन साजरा पिंपरी : स्त्रीयांनी कोणत्याही क्षेत्रात वावरताना सावधगिरी बाळगावी व आपली वैयक्तीक माहिती कारणाशिवाय कोठेही प्रस्तूत करु नये. मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा. सोशल मिडीयामध्ये खाजगी फोटो, वैयक्तीक माहिती, बँक खात्यातील माहिती देऊ नये. आपले संरक्षण करण्यात आपणच पुढाकार घ्यावा. पोलीस, प्रशासनाची भूमिका मुख्यत्वे गुन्हा घडल्यानंतर असते. परंतू गुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी जागृत राहुन सावधानता बाळगावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली माने यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड येथे ‘स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या’ वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वैशाली माने, योग प्रशिक्षक मनाली घारपुरे - देव यांच्या ट...
स्थानिक भाषेतील शिक्षणाने ग्रामिण भागाचा विकास होईल – डॉ. पराग काळकर
पिंपरी चिंचवड

स्थानिक भाषेतील शिक्षणाने ग्रामिण भागाचा विकास होईल – डॉ. पराग काळकर

‘बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची’ स्थापना करावी - प्रताप गुरव लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, पुणे : शिक्षण फक्त नोकरीसाठी घेण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे. ग्रामिण भागात शैक्षणिक परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे शिक्षणाच्या व विकासाच्या प्रक्रिया शहरात केंद्रीत झाल्या आहेत. स्थानिक भाषेतील शिक्षणानेच ग्रामिण भागाचा विकास होईल, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि आजीवन अध्ययन दृष्टीकोण’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या समारोप सत्रात डॉ. पराग काळकर बोलत होते. या चर्चासत्राचे उद्‌घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ...