Tag: Hadapsar

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये एन.सी.सी. तर्फे ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये एन.सी.सी. तर्फे ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये 'राष्ट्रीय छात्र सेने'च्या वतीने 'इंडियन स्वच्छता लीग' हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा, ओला व सुका कचरा याचे व्यवस्थापन कसे करावे. यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आपल्या आयुष्यात स्वच्छता कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिले. सर्व छात्र सैनिकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील स्वच्छता करून, ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे व्यवस्थापन केले. या उपक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेचे विभागप्रमुख प्रा.के.बी. पठाडे व सदस्य प्रा. स्वप्निल ढोरे यांच्यासह ४२ छात्र सैनिकांनी सहभाग घेतला....
एस.एम. जोशी कॉलेजमधील प्रा. डॉ. अतुल चौरे यांना पेटेंट
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमधील प्रा. डॉ. अतुल चौरे यांना पेटेंट

प्रा. डॉ. अतुल चौरे हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजच्या मराठी विभागातील डॉ. अतुल चौरे यांना "विकसनशील अर्थव्यवस्थांमधील मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या आर्थिक कामगिरीवर कॉर्पोरेट गव्हर्नन्स धोरणे आणि पद्धतींचा प्रभाव" या विषयावरती पेटेंट मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल पश्चिम विभागाचे चेअरमन अँड. राम कांडगे, डॉ. राजेंद्र शर्मा, प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड, प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अतुल चौरे यांची सन 2012 साली दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र, येरवडा या ठिकाणी जेलर पदावर नियुक्ती झाली होती. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या अगोदरही त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, महात्मा फुले कॉलेज पनवेल,...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज येथे प्लेसमेंट सेल आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने 'जॉब फेअर 2022-23 कंनेक्टींग टू फ्युचर' हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांच्या कल्पनेमधून सदर उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ॲकॅडमी मधील मा. अस्मिता राऊत उपस्थित होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील विविध स्किल डेव्हलप करायला पाहिजेत. तसेच इंग्रजी कम्युनिकेशन स्किल चांगले केल्यास त्यांना जगाच्या बाजारपेठेत मानाचे व सन्मानाचे स्थान प्राप्त होईल. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

हडपसर, 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. पद्ममणी कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते प्रा. डॉ. हनुमंत भवारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्याने कोणते तरी ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी वाचन, लेखन, मनन व चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांची चरित्रे वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. वाचन हे माणसाला सक्षम बनवते व सत्याचा परिचय...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या वतीने 10 ऑक्टोंबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल जागृती व्हावी यासाठी PSY FUN कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. त्यामध्ये selfie Point, Psychological Movie, Posters, Lectures या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावरील पोस्टर तयार करून त्याचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. महेंद्र शिंदे सरांनी केले. तसेच यावेळी Selfie Point चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना Psychological Movie दाखविन्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ...
स्वररंग २०२२ स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज प्रथम
पुणे, शैक्षणिक

स्वररंग २०२२ स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज प्रथम

हडपसर, ता. ५ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वररंग २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे शहरातील ३६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील ६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वररंग २०२२ स्पर्धेत सर्वात जास्त पारितोषिके मिळविणारे कॉलेज म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून कॉलेजचे नाव उंच करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक लोक वाद्यवृंद सोलो महावीर रणदिवे (FYBA), द्वितीय पारितोषिक वेस्टर्न गाणे शिवानी वाघ (FYBSc) यांना मिळाले. नृत्य स्पर्धेमधील प्रथम पारि...
कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. फाईन आर्ट कॉम्पिटिशनमध्ये ऑन द स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग, कार्टूनिग, रांगोळी, ऑन द स्पॉट फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन या स्पर्धा घेण्यात आल्या. लिटररी इव्हेंटमध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि वादविवाद या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. डान्समध्ये ट्रायबल डान्स व क्लासिकल डान्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. म्युझिक स्पर्धेमध्ये क्लासिकल, सोलो, इंडियन ग्रुप सॉंग, वेस्टर्न ग्रुप सॉंग, सोलो डान्स अशा अनेक डान्स प्रकारांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. थिएटर कॉम्पिटिशनमध्ये वन ऍक्ट प्ले, स्किट, माईम, मिमिक्री अशा एकूण 25 स्पर्धांचे आयोजन कॉलेजमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धाचा उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उ...
“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे
पुणे, शैक्षणिक

“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे

हडपसर (प्रतिनिधी ) : भारत हा सर्वधर्म समभाव जोपासनारा देश आहे. प्रत्येक रयत सेवकाने व विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करण्याचा हा काळ आहे. रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस घडत आहे. हा माणूस जात-धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा असावा. सर्व धर्म समभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडायला पाहिजे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर व कर्मवीर यांनी दाखवलेली वाट हीच प्रकाशाची वाट आहे. महापुरुषांना जाती धर्मात न बांधता आपण सर्व माणूस होण्याचा प्रयत्न करूया. जातीचा अंत झाला, तरच भारत देश महान होईल. भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला थोर महापुरुषांचे विचार समजावून सांगितले तरच संस्कारित पिढी निर्माण होईल. ही पिढी भारत देशाला बलवान करेल. आपण सर्वजन कर्मवीरांचा समतेचा व मानवतेचा विचार समाजात रुजवूया. असे विचार प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखक संपादक मा. संजय आवटे यांनी एस. एम. जोशी कॉलेजमध्य...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रथम महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करुन 'ईवेस्ट कचऱ्याची समस्या' या विषयावर अत्यंत प्रभावी पथनाट्य तयार केले. त्यानंतर हडपसर येथील साधना संकुलातील शाळा व माळवाडी गावात जावून पथनाट्य सादर केले. या पथनाट्यास विद्यार्थी व नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पथनाट्याचे संवाद व दिग्दर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विराज नवले याने केले. या पथनाट्यात १६ विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२० स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता केली. अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी द...
एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते....