Tag: Kalewadi

सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

रक्तदान शिबीर, सोलो डान्स स्पर्धा व न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका उषामाई काळे व दिलीप आप्पा काळे यांच्या संयोजनातून भव्य रक्तदान शिबीर, सोलो डान्स स्पर्धा व महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग दोन दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मधुकर नाना काळे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, नगरसेवक नाना काटे, संतोष कोकणे, विनोद नढे, नगरसेविका उषामाई काळे व नीता पाडाळे, नवनाथ नढे, विजय सुतार, गणेश कस्पटे, गोरख कोकणे, संगिता कोकणे, शरद म्हस्के, संजय पगार...
कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप

रहाटणी : दिवाळी हा रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. फटाके फोडून मोठ्या उल्हासात हा सण साजरा केला जातो. मात्र, समाजात अनेक कुटूंबांना हलाखीच्या परिस्थितीमुळे हा सण साजरा करता येत नाही. अशा काळेवाडी-रहाटणी परिसरातील गरजू मुलांना प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवाराच्या वतीने मिठाई, फराळ व फटाके वाटप करण्यात आले. त्यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. कोरोना महामारीमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. तर अनेक नागरिकांचे हातावरचे पोट असते. या अनुषंगाने आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून प्रसाद नखाते मित्र परिवाराच्या वतीने गरजू मुलांना शोधून त्यांना मिठाई, फराळ, फटाके देऊन या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. दरम्यान, प्रसाद नखाते मित्र परिवाराने कोरोना काळात समाजासाठी मोठे योगदान दिले. अनेक गरजूंना आवश्यक ...
काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन
पिंपरी चिंचवड, राजकारण

काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन

स्थानिक समस्यांना फोडली वाचा काळेवाडी : आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले असून काँग्रेसची पहिलीच जाहिर सभा काळेवाडीत झाली. या सभेचे आयोजन काँग्रेसचे युवा नेते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी केले होते. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी विशेष हजेरी लावत, सभेला संबोधित केले. त्याप्रसंगी त्याप्रसंगी माजी प्रदेश अध्यक्ष पर्यावरण विभाग अशोक मोरे, अॅड. सोपान माने, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, वालिया अल्पसंख्यांक प्रदेश सदस्य राजेंद्र सिंग, महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माउली मलशेट्...
काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक धनसिंग राजपुत यांचे निधन
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक धनसिंग राजपुत यांचे निधन

काळेवाडी : येथील रहिवासी धनसिंग राजपुत (रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे रविवारी (ता. ३१) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने परिसरातील रहिवासी व नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत. मिलिट्री डेअरी फार्ममध्ये ४० वर्षे सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार असून चंद्रनसिंग राजपुत यांचे ते वडील होत....
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून महावितरणच्या कामासाठी काळेवाडीत २५ लक्ष | नगरसेविका नीता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून महावितरणच्या कामासाठी काळेवाडीत २५ लक्ष | नगरसेविका नीता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश

काळेवाडी : महावितरणच्या विविध विद्युत विषयक कामे करण्यासाठी नगरसेविका नीता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून काळेवाडी भागासाठी २५ लक्ष खर्च मंजूर झाला आहे. या कामाचे नढेनगर येथे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी नगरसेविका नीता पाडाळे, नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेवक विनोद नढे, महावितरणच्या अभियंता शितल मेश्राम, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हाणकर, कैलास सानप, रमेश काळे, सज्जी वर्की, प्रविण आहेर, दिलीप काळे, बाबासाहेब जगताप, स्विकृत सदस्य विनोद तापकीर, धर्मा पवार, सेन गुप्ता, सीमा ठाकुर, विलास पाडाळे, मारूती आटोळे यांच्या महावितरणचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, मागील आठ महिन्यापासून नगरसेविका पाडाळे यांचा याबाबत पाठपुरावा सुरू होता. आमदारांबरोबर बैठकीही झाली होती. आमदार निधीतील होणाऱ्या या कामामुळे काळेवाडी प...
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म पुरस्कार प्रदान
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ अनेक विविध प्रकारचे उपक्रम घेऊन सभासदांना वृध्दापकाळत आनंद देणारे आदर्श उत्कृष्ट सामाजिक कार्य करत असतो. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्यानिमित्ताने कांचन मुव्हीज प्रविण घराडे परिवारातर्फे 'एक दिवस सुखाचा' या कार्यक्रमात शहरातील मोठ्या प्रसिद्ध या संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, उपाध्यक्ष सुखदेव खेडकर यांना शाल पुष्प गुच्छ, पुरस्कार प्रशस्तिपत्र देवुन चित्रपट निर्मिते बाळासाहेब बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर माई ढोरे, नगरसेविका उषामाई काळे, चित्रपट श्रेत्रातील कलाकार, प्रशासकीय अधिकारी, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी संघाच्या कार्याचा गौरव केला. त्यावेळी मधुकर नाना काळे, संघाचे सहसचिव योग गु...
गुणवंत कामगार पांडुरंग जगताप यांचे निधन
पिंपरी चिंचवड

गुणवंत कामगार पांडुरंग जगताप यांचे निधन

पिंपरी : काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप यांचे वडील पांडुरंग बाबुराव जगताप (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. २९ सप्टेंबर ) निधन झाले. दशक्रिया विधी रविवारी (दि. ०३ ऑक्टोबर) मुळ गावी निळूज-बेलसर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुन- नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांना ३० वर्ष गरवारे वालरोप कंपनीमध्ये काम केल्याबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता....
Kalewadi News : काळेवाडीत रस्त्याच्या डांबरीकरणास सुरूवात
पिंपरी चिंचवड

Kalewadi News : काळेवाडीत रस्त्याच्या डांबरीकरणास सुरूवात

काळेवाडी, ता. १७ : नढेनगरमधील नंददीप कॉलनी क्रमांक ४ रस्त्याच्या डांबरीकरण कामास आज सुरूवात करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या डांबरीकरणास सुरूवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यावेळी नगरसेविका नीता पाडाळे व उषा काळे, नगरसेवक विनोद नढे, माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, राष्ट्रवादीचे शंकर घनवट, पुष्पा नढे, रवींद्र गरूड, विश्वास घाडगे आदी उपस्थित होते. " या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन टाकली आहे. पावसामुळे डांबरीकरणास अडचणी येत होत्या. मात्र, पावसाने उघड दिल्याने डांबरीकरणास सुरूवात करण्यात आली आहे." - नीता पाडाळे, नगरसेविका...
घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती
पिंपरी चिंचवड

घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती

काळेवाडी : ज्योतिबानगरमधील श्रद्धा कॉलनीमध्ये राहणाऱ्या अमोल कांबळे या तरूणाने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारली आहे. तर वाड्याला साजेशी पेशवे पगडी परिधान केलेली गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अमोल याच्या घरी मागील २८ वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी अमोल गणपतीची आरस करताना नवीन प्रयोग करत असतो. या वर्षी त्याने पुठ्ठ्याच्या सहाय्याने शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार केली असून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. या प्रवेशद्वारवर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्रे लावली आहे. अमोल याचा हा देखावा आकर्षण ठरत असून यासाठी त्याला त्याची आई शोभा, वडील बाळासाहेब व भगिनी प्रियंका शिंदे यांची मोलाची मदत मिळाली. असे अमोल याने लोकमराठी न्य...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील नागरिकांसाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जाणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा काळेवाडीतील बी. टी. मेमोरियल शाळेत रविवारी (ता. २६ सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेचे संयोजन मनसे पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे व शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांनी केले आहे....