पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार
केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांचा निर्धार
पिंपरी, ता. 23 : पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या (MSCDA) पॅनलला मताधिक्य देणार आहे. असा ठाम विश्वास केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदच्या निवडणुकीचा अंतीम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी आमदार अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जग्गनाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड तर्फे सभा आयोजित केली होती. त्यावेळी विवेक तापकीर बोलत होते.
या सभेला माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, विजय पांडुरंग पाटील, एमएससीडीए पश्चिम क्षेत्राचे अध...










