Tag: Marathi News

माळी समाजाच्या मोफत राज्यस्तरीय वधू, वर परिचय मेळाव्याचे भोसरीत आयोजन
पिंपरी चिंचवड

माळी समाजाच्या मोफत राज्यस्तरीय वधू, वर परिचय मेळाव्याचे भोसरीत आयोजन

भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने माळी समाजाचा सोळावा वधू, वर परिचय मेळावा रविवार दि. २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास वधू, वर व पालकांना मोफत प्रवेश आहे अशी माहिती मेळावा प्रमुख शामराव गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिली आहे. या मेळाव्यात सहभाग घेण्यास इच्छुक असणा-या वधू, वर किंवा पालकांनी संस्थेचे नोंदणी कार्यालय श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन, महादेव मंदिराजवळ लोंढे आळी, भोसरी पुणे - ३९ येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष शांताराम ताम्हाणे व उपाध्यक्ष संतोष लोंढे यांनी केले आहे. रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजता मेळाव्याचे उद्‌घाटन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहे. नोंदणी केलेल्या वधू, वरांनी आपल्या पालकांसमवेत उपस्थित रहावे. नोंदणीसाठी संपुर्...
भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे
पिंपरी चिंचवड

भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) भाजपाचा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिला. मा. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर बैलगाडा शर्यत घेण्यास परवानगी दिल्यामुळे आता लवकरच भोसरीतील घाटावर पुन्हा बैलगाडा शर्यत सुरु होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. गुरुवारी ॲड. नितीन लांडगे यांनी पुणे जिल्हा गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष भानूदास लांडगे यांच्या सह भोसरीतील घाटाची पाहणी केली व आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता बोपन्ना गट्टूवार यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक पंडीत गवळी, गाडा मालक अनिकेत विष्णू लांडगे तसेच गाडा मालक संघटनेचे पदाधिकारी व भोसरीतील गाडा मालक उपस्थित होते....
रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी
पिंपरी चिंचवड

रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी

पिंपरी, ता. ११ : रहाटणी - काळेवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिक त्रस्त आहेत. रहाटणी - काळेवाडीकरांची रस्ते समस्या महापालिकेने मार्गी लावावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. याबाबत तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी - काळेवाडी परिसरातील श्रीनगर, शास्त्रीनगर, तापकीरनगर, जोतिबानगर, काळेवाडी गावठाण, आझाद चौक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तीन ते सहा महिन्यांपासून अंतर्गत रस्ते खोदून ठेवल्याने रहिवाशांना ...
कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न
महाराष्ट्र

कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना यांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न झाला असून सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचे मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना ही गेल्या ५२० दिवसांपासून स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे अखंड कार्य करीत असून पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यावरणाशी निगडित विविध जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामाजिक संघटनेचे ३०ते ३५ स्वयंसेवक ४ व ५मार्च रोजी मुंबई अभ्यास दौऱ्यावर गेले होते. यावेळी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली(नवी मुंबई)येथे फ्लोमिंग पक्षी माहिती, तसेच पाण्यातील खारफुटी वृक्ष आणि त्यांचे पाण्यातील मासे,किटक आणि पक्ष्यांसाह वातावरणातील शुद्ध हवा, मासे उत्पत्ती आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि विविध जैविक घटकांच...
थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे
विशेष लेख

थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे

धर्म आणि धर्मग्रंथांनी पूर्वीच्या काळी खूप महत्वाचे काम बजावले आहे.. समाजव्यवस्था कशी असावी? दुसऱ्याला त्रास न होता कसे वागावे? न्यायनिवडा कसा करावा? नीतीने वागणे म्हणजे काय? खरं खोटं म्हणजे काय? चांगलं वाईट कसं ठरवायचं? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे… तेंव्हाच्या उपलब्धतेनुसार आणि निसर्गानुसार पेहराव कसा असावा, स्त्री-पुरुषांनी काय घालावे, याचेही नियम धर्मच बनवत होता. पूर्वीचे वैद्यकशास्त्र आता ईतके प्रगत नव्हते म्हणून आजार होऊ नयेत यासाठी कोणत्या मोसमात काय खावे काय प्यावे याचेही मार्गदर्शन धर्मच करत असे.. वाळवंटात पाणी जपून वापरावे लागते म्हणून फक्त आठवड्यातून एकदा अंघोळ, वाळूच्या वादळकणांपासून संरक्षण म्हणून चेहरा अन डोके झाकून घेण्याची पध्दत, अशा छोट्या छोट्या गोष्टीत देखील धर्मच मार्गदर्शन करत होता. पूर्वी सतत होत असलेल्या युद्धांमध्ये खूप मोठ्या प्रमाण...
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांची आज नियुक्ती करण्यात आली. तर युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख (Imran Shaikh) आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट (Kavita Alhat) यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. याशिवाय, शहरातील तीन विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागच्या वर्षी महापालि...
संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन
महाराष्ट्र, मोठी बातमी

संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

पुणे, ता १२ : देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (वय ८३) यांचे आज पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनामुळे एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला आहे. नॉन कोविड न्यूमोनियामुळे त्रस्त असलेल्या राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्यावर मागील १५ दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. त्यानंतर हृदयक्रियेवर परिणाम झाल. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. त्यामुळं त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बजाज समूहाने निवेदन प्रसिद्धीस देऊन त्यांच्या निधनाची माहिती दिली...
पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : गुटखा बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारावर पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे दोन लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरगाव परिसरात शनिवारी (ता. २२ जानेवारी) करण्यात आली. अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली. महेंद्र पनाराम भाटी (वय २६, रा. सर्व्हे नंबर १८/८ शिव कॉलनी, गणेश नगर, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध कलमान्वये वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त डॉ. डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथक गोपनिय माहिती काढत होते. त्यावेळी २२ जानेवारी २०२२ ...
लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टने दिले घुबडाला जीवनदान
पिंपरी चिंचवड

लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टने दिले घुबडाला जीवनदान

पिंपरी : धानोरे येथे अडकलेल्या गव्हाणी घुबडाला लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टच्या सदस्यांनी पकडून सुखरूपपणे आज निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. त्यामुळे या घुबडाला जीवनदान मिळाले. धानोरे येथील नवनाथ गायकवाड यांनी लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टशी संपर्क साधून घुबड अडकले असल्याची माहिती दिली. त्यानंतर ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष विक्रम भोसले व सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हे घुबड गेले चार ते पाच दिवस गायकवाड यांच्या घरातच असल्याचे त्यांना कळले. या घुबडाला सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. दरम्यान, काही नागरिकांनी गायकवाड कुटूंबियांना अंधश्रद्धेपोटी घुबडाविषयी गैरसमज पसरून भीती दाखवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, गायकवाड कुटूंबीयांनी त्याला बळी न पडता त्या पक्ष्याचे संरक्षण केले. त्याबद्दल अध्यक्ष विक्र...
काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक महादेव मिरगल यांचे निधन
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक महादेव मिरगल यांचे निधन

काळेवाडी, ता. १४ : येथील ज्येष्ठ नागरिक महादेव लखु मिरगल (रा. ओमकार कॉलनी, विजयनगर) यांचे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. काळेवाडीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत महादेव मिरगल हे थरमॅक्स कंपनीचे माजी कामगार असून त्यांचे मुळगाव कोकणातील कुर्ला दिवेकरवाडी (ता. महाड, जि. रायगड) आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे थोरले पुत्र अनिल मिरगल रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक तर सुनिल मिरगल यांचा व्यवसाय आहे. तसेच धाकटे पुत्र सुशील मिरगल हे थरमॅक्स कंपनीत नोकरीला असून ते थरमॅक्स कामगार संघटनेचे उपाध्यक्षही आहेत. त्यांची मुलगी जयश्री शत्रुघ्न तटकरे (रा. खेड, जि. रत्नागिरी) या उद्योजक असून पुण्यातच स्थायिक आहेत. दरम्यान, काळेवाडी येथे २३ जानेव...