Tag: MP college Pimpri

एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू – प्राचार्य डॉ. पंडित शेळके 
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू – प्राचार्य डॉ. पंडित शेळके

पिंपरी : महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, चार भिंतीच्या आतील शिक्षण महाविद्यालयात मिळते, तर चार भिंतीच्या बाहेरील समाजशिक्षण राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून कार्य करताना मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचार व कार्याचे दाखले देत सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचे धडे राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळतात असा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप नन्नावरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉ. भारती यादव यांनी करून दिला. कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्...
महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे

डॉ. कैलास जगदाळे पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्था, महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथून नुकतेच रुजू झाले आहेत. प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी रयत शिक्षण संस्थेत २२ वर्षे वनस्पतीशास्त्र या विषयाचा विद्यार्थी प्रिय व अभ्यासू प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. याचीच दखल म्हणून रयत शिक्षण संस्थेने २० सप्टेंबर, २००७ रोजी प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती केली. गेल्या १५ वर्षांपासून एक कार्यक्षम प्राचार्य म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा, लोणंद, मंचर, उंब्रज, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणात्मक, मूल्यात्मक, ज्ञानात्मक व विवेकवादी विचार रुजविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन, प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, रेमेडीयल कोच...
छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : अतुलनीय वैश्विक योध्या, कुशल प्रशासक, हिंदू पद्पातशाहीचे निर्माते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. ते केवळ मराठ्यांचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रशासनाचा, गनिमी काव्याचा, युद्धतंत्राचा आज जगभर अभ्यास केला जातो. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते. त्यावेळी पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ...
महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंक प्रकाशित
शैक्षणिक

महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंक प्रकाशित

महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा : फेसबुक|ट्वीटर|टेलिग्राम|इंस्टाग्राम पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच ‘शाल्मली’ वार्षिक अंकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्था, सातारा च्या सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे उपस्थित होते. त्याप्रसंगी डॉ. प्रतिभा गायकवाड म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्या अंतर्गत कलागुणांचा विकास करणे हे महाविद्यालयीन शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. महाविद्यालयातील ग्रंथालय ही क्रमिक पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच अवांतर साहित्य वाचण्यासाठी प्रेरित करतात, त्याद्वारेच विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळते, यातून विद्यार्थ्यांमधील भावी लेखक, साहित्यिक घडत जातात.” यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “महाविद...
महात्मा फुले महाविद्यालयातील खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड
क्रीडा

महात्मा फुले महाविद्यालयातील खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील चौधरी सिद्धेश (४० मीटर हर्डल), गायकवाड धैर्यशील (उंच उडी) व लव्हे देवश्री (४०० मीटर) धावणे या क्रीडा प्रकारात मेंगलोर विद्यापीठ, मेंगलोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या आंतर विभागीय मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केलेले आहे. तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या पुरुष संघाने मैदानी स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडूरंग लोहोटे व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या....
“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पिंपरी : “शेतकरी, कामगार, देवदासी, अस्पृश्य समाज यांच्या उद्धारासाठी निस्पृह वृत्तीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यामधील दुवा म्हणजे वि. रा. शिंदे यांचे कार्य. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर निस्पृह वृत्तीने काम केले. ते खऱ्या अर्थाने महर्षी या पदवीला पात्र होते. त्यांच्या उपेक्षित कार्याला समाजापुढे आणण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले...
महात्मा फुले महाविद्यालयाच्या शुभम धायगुडेचे सुवर्ण यश
क्रीडा

महात्मा फुले महाविद्यालयाच्या शुभम धायगुडेचे सुवर्ण यश

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचा शुभम धायगुडे याने ओडिसा येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेमध्ये 1500 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात सुवर्णपदक संपादन केले. तर 400 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. शुभम हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणारा जलतरण पट्टू ठरला. या खेळाडूस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड व क्रीडा विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे व सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले....
नागरिकांनी भारतीय संविधानाप्रत जागरूक रहावे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

नागरिकांनी भारतीय संविधानाप्रत जागरूक रहावे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी : ‘मागील काही काळ हा आपल्या सर्वांच्यासाठीच आव्हानात्मक असा राहिलेला आहे. कोरोना या विषाणूचा प्रसार, त्यामुळे लॉकडाऊनचे बंधन, त्यातून उद्भवलेली बेरोजगारी, महागाई या सर्व समस्यांना आपण तोंड देत आहोत. आता परिस्थिती लसीकरण आदी उपाययोजनांमुळे सुरळीत होत आहे. आपणही आता भारतीय संविधानाप्रत जागरूक राहून देशाची सर्व व्यवस्था मुळ पदावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे’, असे उद्गार पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी संविधान दिनाच्या निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उच्चारले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकताच ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला . या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . पांडुरंग गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व प्र...
महात्मा फुले महाविद्यालयात भव्य लसीकरण मोहिम संपन्न
पिंपरी चिंचवड

महात्मा फुले महाविद्यालयात भव्य लसीकरण मोहिम संपन्न

पिंपरी : ‘२०१९ सालापासून करोना महामारीचे संकट हे जगभरात पसरले आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वच जण वेगवेगळ्या उपाययोजना शोधत आहेत. लसीकरण ही या करोनाच्या महामारीपासून सुरक्षित ठेवणारी महत्त्वाची उपाययोजना आहे. लसीकरणामुळे व्यक्तिची प्रतिकारशक्ती वाढते. भारत सरकारने देशभरात १००% लसीकरणाचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपणही आपल्या महाविद्यालयात लसीकरण मोहिम राबवित आहोत, याद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचेच १००% लसीकरण केले जाईल.’ असे मत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने युवा स्वास्थ्य सप्ताह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने २७ व २८ ऑक्टोबर २०२१ रोजी भव्य लसीकरण मोहिम महाविद्यालयात राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन...
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी ऑनलाईन सेशनद्वारे विद्यार्थ्यी व प्राध्यापक यांना आण्णाच्या जीवनावर आधारीत माहिती दिली. कोरोनाच्या काळात कर्मवीरांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाने सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धा, काव्यवाचन, गीतगायन व छायचित्र स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले होते. महाविद्यालयात सकाळी प्राचार्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्याला हार घालून आजच्या जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर प्राचार्यांनी जयंतीनिमीत्त आयोजीत सर्व स्पर्धांचा ऑनलाईन आढावा घेतला. तसेच कर्मवीरांच...