मनोरंजन

येत्या २१ तारखेला तमाशा पंढरी नारायणगांव येथे लोककलावंताचे उपोषण
महाराष्ट्र, मनोरंजन

येत्या २१ तारखेला तमाशा पंढरी नारायणगांव येथे लोककलावंताचे उपोषण

रघुवीर खेडकर करणार नेतृत्व मुंबई : करोनाच्या भयंकर संकट काळात लोककलावंतावर उपासमारीची वेळ आलेली असतानाही राज्य सरकारने एका नवा पैशाची मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २१ सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत उकस मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय लोककलावंतानी घेतला आहे. https://youtu.be/th25g1lz5xI महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एक दमडी शिल्लक नाही. चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावीत नाही. अशी खंत ह्या कलावंतांची आहे. म्हणूनच यापूर्वी राज्यातील विविध संघटनेनी निवेदनाव्दारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती. परंतु अद्...
डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा – अभिनेते देशमुख
महाराष्ट्र, मनोरंजन

डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा – अभिनेते देशमुख

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. या आजाराचा धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा. असे आवाहन डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते सागर देशमुख यांनी जनतेला केले आहे. दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं एकत्र जमत असतात. मात्र, सद्या परिस्थितीत समस्त भारतीयांनी, त्यांच्या अनुयायांनी आपल्या घरातच राहून त्यांच्या प्रती आपली श्रद्धा व प्रेम अर्पण करावे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्या हितासाठी जे निर्देश दिले आहेत. त्यांचे पालन करीत घरातच राहण्याचे आवाहन...
गणेश आचार्यवर महिलेने केले गंभीर आरोप
मनोरंजन

गणेश आचार्यवर महिलेने केले गंभीर आरोप

मुंबई (लोकमराठी ) - बॉलिवूडचे कोरियोग्राफर गणेश आचार्य हे नृत्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हटके अंदाजातील कोरियोग्राफीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते आपल्या गंभीर कोरियोग्राफीमुळे नाही तर गंभीर आरोपामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश आचार्यविरोधात एका 33 वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गणेश आचार्य कमिशनची मागणी करत अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. गणेश आचार्य इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा महासचिव बनल्यापासून तिचा मानसिक छळ करत होता. तिने विरोध केल्यावर गणेशने तिचे सदस्यत्व रद्द केले, ज्यामुळे तिचे उत्पन्न बंद झाले. २६ जानेवारीला माझे सदस्यत्व का रद्द केले? असा जाब विचारला असता गणेश आचार्य संतापला आणि त्याने त्याच्या सोबतच्या क...
अजब प्रेम! पळून गेलेले व्याही-विहीण परत आले, पण…
मनोरंजन

अजब प्रेम! पळून गेलेले व्याही-विहीण परत आले, पण…

लोकमराठी : काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एक घटना घडली होती. एक ठरलेलं लग्न पार पडण्याआधी नवऱ्या मुलीची आई आणि नवऱ्या मुलाचे वडील फरार झाले होते. सूरतमध्ये घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. पण, आता पळून गेलेले ते दोघे जण परतल्याचं वृत्त आहे. गुजरातमध्ये सूरत येथील काटरगाम गावात राहणाऱ्या एका तरुणाचा विवाह येत्या फ्रेबुवारीत नवसारीतील एका तरुणीशी होणार होता. लग्नाच्या एक महिना आधीच म्हणजे 10 जानेवारी रोजी या तरुणीची आई बेपत्ता झाली. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान नवऱ्या मुलाचे वडीलही बेपत्ता झाले. त्यांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना शोधायचा प्रयत्न सुरू केला. मात्र, काही दिवसांनी त्या दोन्ही कुटुंबाना ते दोघे एकत्र पळून गेल्याची कुणकूण लागली. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळवली. त...
सराफ बंधूंनी नाट्यसेवेची परंपरा नेटाने सुरु ठेवली – माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार
मनोरंजन

सराफ बंधूंनी नाट्यसेवेची परंपरा नेटाने सुरु ठेवली – माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार

संगीत नाटकांसाठी सवलतीत यशवंत नाट्यगृह उपलब्ध होणार - प्रसाद कांबळी मुंबई : सावकार, सराफ, शिलेदार आणि संगीत नाटक या चौघांमधे सामायिक "स"आहे या "स" मधून एकच रक्तशलाका वाहते ती म्हणजे संगीत रंगभुमीच्या हितासाठी काम करणं. आज आमचा जो सन्मान अशोक सराफ व सुभाष सराफ या बंधुंनी केला आणि नाटक सेवेसाठी कौतुक करत नाट्यप्रयोग गोपीनाथमामांच्या जन्मदिनी सादर करण्याची संधी दिली तिने सराफ सावकार घराण्यापासून आलेल्या संगीत रंगभुमीच्या प्रेमावर मोहोर उमटवली आहेअसे प्रांजळ मत माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांनी व्यक्त केले. श्री गोपिनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीच्या वतीने नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ११०व्या जयंती निमित्ताने संगीत ययाती आणि देवयानी नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात करण्यात आले होते.त्या प्रसंगी संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी कीर्ती शिलेद...
अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला
मनोरंजन, मोठी बातमी

अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला

नवी दिल्ली : जेएनयू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोन विद्यापीठात जाऊन भेट घेतल्यानं दीपिका सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही चर्चेला आली. यावरून तीच्यावर झालेल्या टीका- कौतुकानं राजकिय वातावरण तापलं असतानाच आता दीपिकाचा सरकारी जाहिरातील प्रोमो व्हिडीओ हटवला असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत हिंदूस्थान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे. दीपिका ही मोदी सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या एका जाहिरातीत दिसली. बुधवारी हा व्हिडिओ प्रदर्शितही झाला होता. श्रम शक्ती भवनच्या कार्यालयात हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता. मात्र अचानक हा व्हिडीओ वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द प्रिंटला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं. दीपिकानं ४५ सेकंदाचा व्हिडीओ चित्रीत केला होता . यात प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि कौशल्यविकासाबद्दल तिनं भाष्य...
साधू व देवतांचा अवमान करणारा दबंग ३ चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी 
मनोरंजन

साधू व देवतांचा अवमान करणारा दबंग ३ चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी

मुंबई (लोकमराठी) : साधू आणि देवता यांचा अवमान करणार्‍या दबंग ३ हा चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी मंगळवारी (९ डिसेंबर) विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रतिनिधींनी मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना निवेदन दिले. या वेळी शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीचे अध्यक्ष प्रभाकर भोसले, हिंदू राष्ट्र सेनेचे प्रकाश सावंत, वज्रदल संघटनेचे विमल जैन, हिंदु जनजागृती समितीचे परेश कोळी, अ‍ॅड. रणधीर सकपाळ आणि सुधीर सकपाळ उपस्थित होते. सलमान खानचा २० डिसेंबरला दबंग ३ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यातील हूड-हूड दबंग-दबंग या गाण्यामध्ये साधूंना गिटार घेऊन नाचतांना दाखवण्यात आले आहे. साधूंना हिडिसपणे नाचतांना दाखवणार्‍या सलमान खानला याच गाण्यात देवता आशीर्वाद देतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. दबंग ३...
मुंबईत दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने
मनोरंजन

मुंबईत दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

आक्षेपार्ह प्रसंग न वगळल्यास दबंग ३ वर बहिष्कार टाकण्याचा इशारा मुंबई (लोकमराठी) : २० डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या दबंग ३ या हिंदी चित्रपटात साधूंना गॉगल घालून व हातात गिटार घेऊन हिडिस अन् आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. देवतांचाही अवमान करण्यात आला आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतरही नाचणारे साधू खोटे असल्याचे सांगत सलमान खान यांनी चित्रपटातील सदर दृश्याचे समर्थन केले आहे. आमच्या श्रद्धास्थानांचे विडंबन आम्ही कदापी सहन करणार नाही. चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला नाही, तर ‘दबंग ३’ वर बहिष्कार घालण्यात येईल, अशा इशारा समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी दादर येथील आंदोलनाच्या वेळी दिला. दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात रविवारी (ता. 8 डिसेंबर) रोजी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांनी हा निर्णय घेतला. या आंदो...
तान्हाजी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांची धमकी
मनोरंजन

तान्हाजी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांची धमकी

लोकमराठी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचे पात्र असलेल्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट येत आहे. दिग्दर्शक ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून कालच त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. मात्र या ट्रेलरवरून शिवप्रेमी, काही संघटना आणि राजकीय नेते चांगलेच भडकलेले आहेत. इतिहासात नसलेल्या गोष्टी चित्रपटात अंतर्भुत केल्यामुळे शिवप्रेमींचा भडका उडालेला दिसतोय. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तान्हाजीचे दिग्दर्शक ओम राऊत यांना ट्विटरवरून धमकी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच संभाजी ब्रिगेडने देखील चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेतला आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक व्यक्ती लाकूड फेकून मारताना दाखवलेली आहे. इतिहासात असा कोणता प्रसंग आहे का? असल्यास त्याची माहिती देण्याची मागणी संभाजी ब्रिगे...
‘आखियोंसे गोली मारे’वर कार्तिक, अनन्या आणि भूमीचे ठुमके
मनोरंजन

‘आखियोंसे गोली मारे’वर कार्तिक, अनन्या आणि भूमीचे ठुमके

लोकमराठी : काही दिवसांपूर्वीच 'पती पत्नी और वो'चा ट्रेलर रिलीज झाला होता. कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांनी या ट्रेलरमध्ये चांगलीच मजा आणली आहे. बुधवारी (दि. 20) या चित्रपटातील 'आखियोंसे गोली मारे' हे गाणे लॉन्च झाले. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर हा चित्रपट कसा असले व या तिघांचा अभिनय कसा असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यातच हे गाणे आल्याने या चित्रपटाकडून पुन्हा एकदा आपेक्षा उंचावल्या आहेत. 'आखियोंसे गोली मारे' या गाण्यात चिंटू (कार्तिक आर्यन), वेदिका (भूमी पेडणेकर) आणि तपस्या (अनन्या पांडे) यांनी कमाल डान्स केलाय. तर मिका सिंग आणि तुलसी कुमारने आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. तनिष्क बागचीने या गाण्याला संगीत दिले आहे. तर यापूर्वी सोनू निगमने गायलेले दुल्हे राजामधील 'आखियोंसे गोली मारे' हे गाणेही अत्यंत लोकप्रिय झाले होते. या गाण्याचे काही बोल नव्या गाण्यातही घेतले आह...