हॉकी महाराष्ट्र या बोगस संघटनेचा हॉकी स्पर्धांच्या आयोजनात कोट्यवधींचा गैरव्यवहार? | तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व महापालिका आयुक्तांची भुमिका संशयास्पद
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार निवृत्त न्यायाधीशांच्या हस्ते या गंभीर प्रकरणाच्या चौकशीची मागणी - रणवीर सिंग
पिंपरी, ता. १२ : पिंपरी-चिंचवड महापालिकेने “हॉकी महाराष्ट्र” या राज्य पातळीवरील बोगस संघटनेशी हातमिळवणी करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांवर लाखोंचा खर्च केला जात आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून हॉकी महाराष्ट्र संघटना बोगस असल्याची निवेदनाद्वारे पुराव्यासह कागदपत्रे रणवीर सिंग यांनी सादर केली. परंतु हॉकी महाराष्ट्र संघटनेला मदत करण्याचे, वरून आदेश असल्याचे सांगत आयुक्त राजेश पाटील यांनी कागदपत्रांची साधी दखलही घेतली नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला नोंदणीकृत संघटनेच्या पदावर नियुक्ती हवी असल्यास वरिष्ठ कार्यालयाची रीतसर परवानगी घेतल्याशिवाय काम करता येत नसताना पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश या...










