पिंपरी चिंचवड

नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यातर्फे गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यातर्फे गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आकुर्डी : नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण तसेच दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त शिक्षण तज्ज्ञ विवेक वेलणकर यांचे करिअर मार्गदर्शन ठेवण्यात आले. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका व शिवसेना शहर संघटीका उर्मीला काळभोर, युवा नेते झिशान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते यशवंत तरळ, आबा गायकवाड, गौतम जगताप व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात ३२२ महिला स्पर्धक तसेच २७८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केले होते....
मोदी-शहाच्या प्रतिमेचे दहन करून साजरा करणार दसरा – संभाजी ब्रिगेड
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी

मोदी-शहाच्या प्रतिमेचे दहन करून साजरा करणार दसरा – संभाजी ब्रिगेड

पिंपरी: केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार अत्यंत निदर्यी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत. तसेच लखीमपुर येथील आठ शेतकऱ्यांची गाडी खाली चिरडून केलेल्या हत्येच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड यंदा दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमे ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन करून दसरा साजरा करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सतिश काळे यांनी म्हटले आहे की, सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.तसेच सातत्याने होणारी गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, कोविड काळात फ...
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा! अन्यथा महापालिकेत त्यांना आणून सोडणार
पिंपरी चिंचवड

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा! अन्यथा महापालिकेत त्यांना आणून सोडणार

शिवसेनेचे अनंत कोऱ्हाळे यांचा महापालिकेला इशारा चिंचवड : चिंचवडगावात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेमार्फत महापालिका कार्यालय व महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानी या भटक्या कुत्रांना आणून सोडले जाईल. असा इशारा शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी दिला आहे. याबाबत कोऱ्हाळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका पशुवैद्यकीय विभागाच्या कुचकामी कामकाजामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून भटक्या कुत्र्या...
भाजपच्या धोरणांमुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम – विशाल वाकडकर
पिंपरी चिंचवड, राजकारण

भाजपच्या धोरणांमुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम – विशाल वाकडकर

विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना पदाधिका-यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पिंपरी : केंद्रातील भाजप सरकारने देशभर भाजप विरोधी असणा-या राज्यसरकारांना दबावतंत्राचे राजकारण करुन हुकूमशाहीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पातळी सोडून सुरु असणा-या या राजकारणाला नागरिक ओळखून आहेत. मागील सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चूकीची धोरणे राबवली आहेत. त्यामुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. याचा सर्वात जास्त फटका तरुणांना व सुशिक्षित बेरोजगारांना बसला आहे. हे सुशिक्षित बेरोजगार तरुण घरोघरी जाऊन भाजपची चूकीची धोरणे नागरिकांपुढे मांडतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले. वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड कामगार संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांनी व मुख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्य...
मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर
पिंपरी चिंचवड

मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर

पिंपरी : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्था फुले पिंपळगांव (ता. माजलगांव जि. बीड) यांच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड पत्र मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्थाचे अध्यक्षा उषा गायकवाड व सचिव सुमंत गायकवाड यांनी पत्राद्वारे हे जाहिर केले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा पर्यावरण, साहित्य,सामाजिक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्कारासाठी डॉ.धनंजय भिसे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. डॉ.धनंजय भिसे यांनी मातंग साहित्य परिषदेच्या माध्यामातून वंचित समाजात साहित्यीक व सांस्कृतिक चळवळ वाढवण्याचा संकल्प हाथी घेतला आहे. कोणत्याही वंचित समाजाचा भैतिक विकास जर घडवायचा असेल तर त्या समाजाला साहित्य...
वाल्हेकरवाडीत रोडरोमिओंचा हैदोस | अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी दखल घेण्याची गरज
पिंपरी चिंचवड

वाल्हेकरवाडीत रोडरोमिओंचा हैदोस | अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी दखल घेण्याची गरज

चिंचवड : वाल्हेकरवाडी परिसरात रोडरोमिओंनी हैदोस घातला असून मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग मोठा आहे. एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी तातडीने दखल घेऊन या रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाल्हेकरवाडीत ठिकाणी या रोडरोमिओंचे टोळके थांबलेले असते. रस्त्यावरच आरडाओरडा, मस्ती, अश्लील शिवीगाळ व ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलेही असतात. हे सर्व टोळके स्थानिक असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे कोण येत नाही. सायली कॉम्प्लेक्स ते मराठी शाळा चौक दरम्यान, मशिदीसमोरील मुख्य रस्ता, याठिकाणी रोडरोमिओंचा जास्त त्रास असून नागरिक हैराण झाले आहेत. 'बहिणीची छेड काढली म्हणून तरूणाचा खुप, बलात्काराच्या बदल्यात बलात्कार, छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून मारहाण...
हुतात्म्यांचे घातले श्राद्ध! जेवला मुस्लिम फकीर! गुंड राजकारण्यांच्या वतीने मागितली क्षमा
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

हुतात्म्यांचे घातले श्राद्ध! जेवला मुस्लिम फकीर! गुंड राजकारण्यांच्या वतीने मागितली क्षमा

पिंपरी : आज सर्व पित्री आमवश्या. पूर्वजांना आठवण करण्याचा आणि काही चुकले असल्यास क्षमा मागण्याचा दिवस. देश हा जर कुटुंब मानला तर सर्व हुतात्मा स्वतंत्र सैनिक आपले पूर्वज. मग त्या हुतात्मामधे सर्व जाती धर्माचे लोक होते. देश कुटुंब मानून निसर्ग मित्र डॉ. संदीप बाहेती यांनी हुतात्म्यांचे सुद्धा श्राद्ध घातले आणि गुंडगिरी करणाऱ्या, गुंडांना निवडणुकीचे तिकीट देणाऱ्या, गुंड असणाऱ्या, सर्वच्या सर्व राजकारण्यांच्या वतीने क्षमा मागितली. डॉ संदीप बाहेती म्हणाले की, "दरवेळी मी गाडी काढतो आणि रस्त्यावर कुणी गरजू अथवा कुणी भुकेला भेटल्यावर, त्यास घरी अतिथी म्हणून जेवण्यास घेवून येतो. आज लवकर कुणी दिसेना. बराच शोध घेतल्यानंतर एक मुस्लिम फकीर मला दिसले. मी त्यांना जरा चाचपडत विचारले, श्रद्धाच जेवणार का? फकीर हो म्हणाले. इकडे त्या फकीर व्यक्तीने घास घेतला आणि तिकडे पिंड येवं श्राद्धाच्या जेवणाला ...
वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी पदवी प्रदान
पिंपरी चिंचवड

वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी पदवी प्रदान

पिंपरी : चिंचवड गावातील वेदमूर्ती चंद्रशेखर गोविंदतात्या रबडे यांचे चिरंजीव वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी ही पदवी वेदमूर्ती दिनकर भट्ट फडके गुरुजी पुणे, व वेदमूर्ती योगेश बोरकर गुरुजी गोवा, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये आजतागायत षडंगवित घनपाठी ही पदवी मिळविणारे वेदमूर्ती विनायक रबडे एकमेव आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचाही सन्मान करण्यात आला. वयाच्या बाराव्या वर्षी ऋग्वेद दशग्रंथ घनपाठ, हा एकच ध्यास धरून कशाचीही पर्वा न करता सलग १८ वर्षे त्यांनी ऋग्वेद गुरुकुल पाठशाळेत वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांचेकडे अध्ययन केले. त्यांच्या अथक परिश्रमाने हा सन्मान मिळाला असल्याचे त्यांचे बंधु कौस्तुभ रबडे यांनी सांगितले....
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म पुरस्कार प्रदान
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ अनेक विविध प्रकारचे उपक्रम घेऊन सभासदांना वृध्दापकाळत आनंद देणारे आदर्श उत्कृष्ट सामाजिक कार्य करत असतो. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्यानिमित्ताने कांचन मुव्हीज प्रविण घराडे परिवारातर्फे 'एक दिवस सुखाचा' या कार्यक्रमात शहरातील मोठ्या प्रसिद्ध या संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, उपाध्यक्ष सुखदेव खेडकर यांना शाल पुष्प गुच्छ, पुरस्कार प्रशस्तिपत्र देवुन चित्रपट निर्मिते बाळासाहेब बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर माई ढोरे, नगरसेविका उषामाई काळे, चित्रपट श्रेत्रातील कलाकार, प्रशासकीय अधिकारी, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी संघाच्या कार्याचा गौरव केला. त्यावेळी मधुकर नाना काळे, संघाचे सहसचिव योग गु...
युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून ‘उद्योजकतेची’ कास धरावी – दत्तात्रय आंबुलकर यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून ‘उद्योजकतेची’ कास धरावी – दत्तात्रय आंबुलकर यांचे आवाहन

आयआयएमएसच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न पिंपरी : युवकांनी महाविद्यालयीन काळापासूनच करिअरसाठी केवळ नोकरी हा पर्याय डोळ्यासमोर न ठेवता 'उद्योजक' हा देखील भक्कम पर्याय असून शकतो यादृष्टीने प्रयत्नशील राहावे असे आवाहन ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ दत्तात्रय आंबुलकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन - एआयसीटीई चा इनोव्हेशन विभाग व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'उद्योजकता- करिअरचा पर्याय' या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात उद्योजकतेची तयारी कशी करावी, उद्योजक म्हणून तयार होण्यासाठी कोणत्या अटी आहेत. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत? उद्योजकतेमध्ये भविष्यातील आणि अपयशाच्या शक्यता काय ...