मोठी बातमी

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – अजित पवार
मोठी बातमी, महाराष्ट्र

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – अजित पवार

बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता हा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे तर स्मारकाची उंची ४५० फूट असेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता आता तो ९९० कोटींवर जाणार आहे. परंतु बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिली.या स्मारका...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे- डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे- डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी : भाषा हे संस्कृती वहनाचे साधन आहे. मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे. ७ व्या व ८ व्या शतकापासून मराठी भाषेत लोकसाहित्य निर्मिती होत आली आहे. १२ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्यापासून कुसुमाग्रज, वि. दा. करंदीकर, शांता शेळके, बाबुराव बाबूल, दया पवार ते भालचंद्र पर्यंतचे साहित्यिक मराठीत झाले आहे. जगाच्या पाठीवर अधिक बोलली जाणारी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे. संत साहित्याने मानवी जीवन चिंतामुक्त करून सुखी बनविण्याचा मार्ग सांगितला महात्मा फुले, महर्षी शिंदे, टिळक, आगरकर, आंबेडकर यांच्या लेखणीने मराठीला आधुनिक विचारांनी समृद्ध केले. ज्ञानेश्वरीतील पसायदानाची UNO ने दाखल घेतली आशा या प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. असे विचार अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या मह...
शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री, नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासन झोपेतच
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री, नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासन झोपेतच

पिंपरी चिंचवड : मानवासह पशु-पक्षांचा जीव घेणाऱ्या चिनी मांजावर बंदी असताना शहरात मांजाची सर्रास विक्री होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पोलिस व पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग गाड झोपेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजामुळे मानवासह पक्षांचेही जीव जात असल्याने न्यायालयाने मांजावर बंदी घातली. परंतु बंदी झुगारून मांजाची विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक जखमी होत असून अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. शहराच्या विविध भागात असा मांजा मिळत असून मुलांकडून त्याची खरेदी केली जाते. दरम्यान, काही दिवसांपुर्वी पिंपरीतील साई चौकातून मुंबई-पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चिनी मांजाने भरलेला रिळ मुलांकडून हस्तगत केला. मांजा कुठ...
अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला
मनोरंजन, मोठी बातमी

अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला

नवी दिल्ली : जेएनयू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोन विद्यापीठात जाऊन भेट घेतल्यानं दीपिका सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही चर्चेला आली. यावरून तीच्यावर झालेल्या टीका- कौतुकानं राजकिय वातावरण तापलं असतानाच आता दीपिकाचा सरकारी जाहिरातील प्रोमो व्हिडीओ हटवला असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत हिंदूस्थान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे. दीपिका ही मोदी सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या एका जाहिरातीत दिसली. बुधवारी हा व्हिडिओ प्रदर्शितही झाला होता. श्रम शक्ती भवनच्या कार्यालयात हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता. मात्र अचानक हा व्हिडीओ वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द प्रिंटला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं. दीपिकानं ४५ सेकंदाचा व्हिडीओ चित्रीत केला होता . यात प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि कौशल्यविकासाबद्दल तिनं भाष्य...
देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक
मोठी बातमी, राष्ट्रीय

देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने जाहीर केली आकडेवारी नवी दिल्ली : देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरून ही बाब उघड झाली आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली. त्यामध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता. वर्ष २०१७ मध्ये १२ हजार २४१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा मित्र व सहकारी एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेली अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला पाटणा विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एजाजचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तसे नसून तो वेश व देश बदलून राहात होता. गेले काही दिवस तो कॅनडामध्ये राहात होता. त्याच्याविरूद्ध मुंबई, दिल्ली व महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्या, खंडणी व या सारखे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1215180050418421760 यापूर्वी एजाजच्या मुलीला अटक करण्यात आली होती. खोटा पासपोर्ट बनवून पळून जायच्या बेतात असलेल्या त्याच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, ...
ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”
मोठी बातमी, महाराष्ट्र

ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”

यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी मुंबईकरांना साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभवलोककलावंत भारुडकार चंदाताई तिवाडी प्रेक्षकांना करणार भारुडाने मंत्रमुग्धमृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदीलोकसंगीत, लोकनृत्य, गझी लोकनॄत्य, यांचा आस्वादमहिला कुस्त्याचा आनंद मुंबई : माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्ष...
कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले

वल्लभनगरमधील हिरामोती वाईन्स दुकानातील प्रकार पिंपरी चिंचवड : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांना मद्य विक्रीच्या दुकानात दुकानमालकाने डांबून ठेवले. हा प्रकार वल्लभनगर एसटी बस स्थानकाच्या समोरील हिरामोती वाईन्स शॉपी येथे शुक्रवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास घडला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुकानमालक संतोष रमेश शिरभाते (वय 46) आणि रमेश शिरभाते (वय 65, दोघे रा. वल्लभनगर, पिंपरी) यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुनिल हरिश चौहान (वय 54, रा. प्राची अपार्टमेंट, आनंद सिनेमा शेजारी, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ...
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा
महाराष्ट्र, मोठी बातमी

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्या वतीने भरुन त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कमसुद्धा या योजनेसाठी पात्र असेल. या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख महत्तम मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल. मार्च ...
भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही – राज ठाकरे
महाराष्ट्र, मोठी बातमी

भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही – राज ठाकरे

पुणे : "भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही," असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 23 जानेवारीला मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी या परिषदेत जाहीर केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं मत या अधिवेशनात मांडू, असं ते यावेळी म्हणाले. "भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही. बाहेरून आलेल्या लोकांना या देशात स्थान नाही. आधीच 135 कोटी लोक या देशात राहात आहेत. त्यामुळे बाहेरून नव्या लोकांना घेण्याची गरजच नाही." असे राज ठाकरे एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज देशात जी दंगलसदृश परिस्थिती आहे. त्या करणाऱ्या किती लोकांनी ही स्थिती माहिती आहे. देशातल्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष उडवण...