मोठी बातमी

प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा
मोठी बातमी, राष्ट्रीय

प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा

बंगळुरू (लोकमराठी ) : केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण, एका बस कंडक्टरने आपल्या कृतीतून हे दाखवून दिलंय. मधु एनसी या बस कंटक्टरचा प्रवास नक्कीच सोपा नाही. मात्र, ध्येय्याने पछाडलेली माणसं हार मानत नाहीत, याच उत्तम उदारण म्हणजे बस कंडक्टर मधु होय. बीएमटीसीच्या बसमध्ये मधु कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. तरीही, अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपलं उद्दिष्ठ ठिकाण म्हणजे IAS गाठण्यासाठी त्याचा केवळ एक स्टॉपचा प्रवास उरला आहे. बंगळुरू मेट्रोपोलिटीन ट्रान्सपोर्ट सेवेत कंडक्टर असलेल्या मधुने युपीएससी परीक्षा पास केलीय.नुकतेच मधुने युपीएससीची मुख्य परिक्षा (मेन एक्झाम) पास केली असून आता आपलं ध्येय गाठण्यासाठी एकच स्टॉप बाकी आहे. म्हणून नेक्स स्टॉप आयएएस.. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. युपीएससी परीक्षेसाठी 25 मार्च रोजी मधुची मुलाखत च...
वंचित बहुजन आघाडीच्या बंदमुळे रूग्ण व नातेवाईकांची उपासमार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या बंदमुळे रूग्ण व नातेवाईकांची उपासमार

पिंपरी, (लोकमराठी) : नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंजित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय व डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयासमोरील खाद्य पदार्थ्यांच्या टपऱ्या व हॉटेल जबरदस्तीने बंद करण्यास सांगितल्या. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले रूग्ण व नातेवाईकांची उपासमार झाली. या दोन्ही रूग्णालयात राज्याच्या विविध भागातून रूग्ण उपचारासाठी येतात. रूग्णालयाच्या समोरच माफक दरात जेवणाची व नाष्ट्याची सोय असलेल्या अनेक टपऱ्या व हॉटेल आहेत. मात्र, शुक्रवारी वंचितच्या कार्यकर्त्यांनी या टपऱ्या व हॉटेल बंद करण्यास सांगितले. त्यामुळे व्यावसायिकांनी तातडीने दुकाने बंद केले. त...
जखमी गाईला वाचवणारे हे, खरे गो-रक्षक (व्हिडीओ)
पुणे, मोठी बातमी

जखमी गाईला वाचवणारे हे, खरे गो-रक्षक (व्हिडीओ)

https://youtu.be/RlIvy0WMr7k पुणे : खडकी रेंजहिल येथील गुरूद्वारासमोर रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या गाईला महाविद्यालयीन तरूण-तरूणी, नागरिक व बजरंग दल, आरएसएसच्या स्वयंसेवकांमुळे जीवनदान मिळाले. गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी साडेसहापासून उठण्याण्याचा प्रयत्न करणारी एक जखमी गाय रस्त्याच्या कडेला पडली होती. मात्र, तीला उठता येत नव्हते. अशातच भटकी कुत्रे तीच्यावर हल्ला करत असताना तेथून जाणाऱ्या महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी कुत्र्यांचा तावडीतून तीची सुटका केली. तीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती उठू शकली नाही. तीच्या डोळ्याला जखम झाली होती. गाईवर उपचार करण्यासाठी तरूणांनी खासगी व महापालिका प्राण्यांचे डॉक्टर व अॅनिमल एनजीओंना संपर्क केला. मात्र, सर्वांनी त्याठिकाणी येण्यास असमर्थता दर्शवली. महाविद्यालयीन तरूणांची गर्दी पासून अनेक नागरिक त्...
इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – अजित पवार
मोठी बातमी, महाराष्ट्र

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – अजित पवार

बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता हा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे तर स्मारकाची उंची ४५० फूट असेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता आता तो ९९० कोटींवर जाणार आहे. परंतु बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिली.या स्मारका...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे- डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे- डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी : भाषा हे संस्कृती वहनाचे साधन आहे. मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे. ७ व्या व ८ व्या शतकापासून मराठी भाषेत लोकसाहित्य निर्मिती होत आली आहे. १२ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्यापासून कुसुमाग्रज, वि. दा. करंदीकर, शांता शेळके, बाबुराव बाबूल, दया पवार ते भालचंद्र पर्यंतचे साहित्यिक मराठीत झाले आहे. जगाच्या पाठीवर अधिक बोलली जाणारी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे. संत साहित्याने मानवी जीवन चिंतामुक्त करून सुखी बनविण्याचा मार्ग सांगितला महात्मा फुले, महर्षी शिंदे, टिळक, आगरकर, आंबेडकर यांच्या लेखणीने मराठीला आधुनिक विचारांनी समृद्ध केले. ज्ञानेश्वरीतील पसायदानाची UNO ने दाखल घेतली आशा या प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. असे विचार अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या मह...
शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री, नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासन झोपेतच
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री, नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासन झोपेतच

पिंपरी चिंचवड : मानवासह पशु-पक्षांचा जीव घेणाऱ्या चिनी मांजावर बंदी असताना शहरात मांजाची सर्रास विक्री होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पोलिस व पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग गाड झोपेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजामुळे मानवासह पक्षांचेही जीव जात असल्याने न्यायालयाने मांजावर बंदी घातली. परंतु बंदी झुगारून मांजाची विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक जखमी होत असून अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. शहराच्या विविध भागात असा मांजा मिळत असून मुलांकडून त्याची खरेदी केली जाते. दरम्यान, काही दिवसांपुर्वी पिंपरीतील साई चौकातून मुंबई-पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चिनी मांजाने भरलेला रिळ मुलांकडून हस्तगत केला. मांजा कुठ...
अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला
मनोरंजन, मोठी बातमी

अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला

नवी दिल्ली : जेएनयू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोन विद्यापीठात जाऊन भेट घेतल्यानं दीपिका सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही चर्चेला आली. यावरून तीच्यावर झालेल्या टीका- कौतुकानं राजकिय वातावरण तापलं असतानाच आता दीपिकाचा सरकारी जाहिरातील प्रोमो व्हिडीओ हटवला असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत हिंदूस्थान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे. दीपिका ही मोदी सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या एका जाहिरातीत दिसली. बुधवारी हा व्हिडिओ प्रदर्शितही झाला होता. श्रम शक्ती भवनच्या कार्यालयात हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता. मात्र अचानक हा व्हिडीओ वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द प्रिंटला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं. दीपिकानं ४५ सेकंदाचा व्हिडीओ चित्रीत केला होता . यात प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि कौशल्यविकासाबद्दल तिनं भाष्य...
देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक
मोठी बातमी, राष्ट्रीय

देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने जाहीर केली आकडेवारी नवी दिल्ली : देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरून ही बाब उघड झाली आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली. त्यामध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता. वर्ष २०१७ मध्ये १२ हजार २४१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा मित्र व सहकारी एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेली अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला पाटणा विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एजाजचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तसे नसून तो वेश व देश बदलून राहात होता. गेले काही दिवस तो कॅनडामध्ये राहात होता. त्याच्याविरूद्ध मुंबई, दिल्ली व महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्या, खंडणी व या सारखे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1215180050418421760 यापूर्वी एजाजच्या मुलीला अटक करण्यात आली होती. खोटा पासपोर्ट बनवून पळून जायच्या बेतात असलेल्या त्याच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, ...
ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”
मोठी बातमी, महाराष्ट्र

ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”

यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी मुंबईकरांना साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभवलोककलावंत भारुडकार चंदाताई तिवाडी प्रेक्षकांना करणार भारुडाने मंत्रमुग्धमृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदीलोकसंगीत, लोकनृत्य, गझी लोकनॄत्य, यांचा आस्वादमहिला कुस्त्याचा आनंद मुंबई : माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्ष...