पिंपरी चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हायटेक सर्जरी विंग येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हायटेक सर्जरी विंग येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

https://youtu.be/riNYoqN7tNg पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. पी डी पाटील यांचे सतत उत्तमात उत्तम देण्याचे स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून. सोमवारी (ता. २०) डॉ. डी. वाय. पाटील हाय टेक शस्त्रक्रिया विभागात 'हृदय प्रत्यारोपण' शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया पिंपरी चिंचवड शहरासाठी एक मानाचा तुरा ठरली. अवयव दात्याकडून हृदय ग्रीन क्वॉरीडोअर मधून आणण्यात आले आणि त्याचे प्रत्यारोपण सर्व उच्चतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील हायटेक शस्त्रक्रिया विभागात करण्यात आले. उच्चतम तंत्रज्ञानाने सुसज्ज डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (Dr. D Y Patil Medical college) येथे इतरही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असतात. शल्यचिकित्सक, भुल तज्ञ, अतिदक्षता विभाग, परफ्युजन तज्ञ, उ...
सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे गौरवोद्गार
क्रीडा, पिंपरी चिंचवड

सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे गौरवोद्गार

पिंपळे सौदागर : काही गणेश मंडळे मोठमोठे लाउडस्पीकर लावून मोठ्याप्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात. मात्र, सुवर्णयुग मित्र मंडळाने सामाजिक कार्यक्रम घेऊन लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ आहे. असे गौरवोद्गार उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांना येथे मंडळाचे कौतुक करताना काढले. सुवर्णयुग मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवामध्ये लहान मुलांसाठी कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी कुंदा भिसे बोलत होत्या. त्याप्रसंगी विकास काटे, पंडितजी मित्रा, जोराराम परमार, अभिजित म्हेत्रे, विनायक म्हेत्रे, हेमंत मोपारी, प्रश...
झोपडपट्टी भागातील लहान मुलांची आरोग्य तपासणी करा – दिपक चखाले
पिंपरी चिंचवड

झोपडपट्टी भागातील लहान मुलांची आरोग्य तपासणी करा – दिपक चखाले

वाकड : (Wakad) येथील काळाखडक झोपडपट्टी, म्हातोबानगर झोपडपट्टी व अण्णाभाऊ साठे नगर झोपडपट्टी भागातील दहा वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी होणे गरजेची आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येक झोपडपट्टीत एक दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केली आहे. याबाबत चखाले यांनी (PCMC) महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले असून त्याची प्रत जेष्ठ वैद्यकीय अधीकारी डाॅ. अभय दादेवार व डाॅ. शितल शिंदे यांची सादर केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या (Corona) तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेत तसेच एक ते दीड वर्षापासुन लहान मुले घरी आहेत. त्यात आँनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून काही शारीरीक व मानसिक परिणाम झालेले आहेत का? पावसाळी साथीचे रोग सर्दी, खोकला, ताप किंवा (ENT) कान, नाक, घसा व अन...
अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन
पिंपरी चिंचवड

अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन

पिंपळे गुरव : पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची परंपरा आहे. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने आवारातच अगदी साध्या पध्दतीने फुलांची आकर्षक सजावट केलेल्या पाण्याच्या हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या भक्तूमय वातावरणात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.." अशा जयघोषात विसर्जन कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, पुढील वर्षी मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून त्यानिमित्त पुढील वर्षाच्या बॅनरचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महिला व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार आहेत....
पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा
पिंपरी चिंचवड

पिंपळे गुरवमधील श्री गणेश मित्र मंडळाचा वास्तव्यावरील लॉकडाऊन देखावा

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथील भगतसिंग चौकात श्री गणेश तरूण मित्र मंडळाने यावर्षी सध्याच्या वास्तव परिस्थितीवर आधारित लॉकडाऊन देखावा साकारला आहे. हा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत असून विचार करायला भाग पाडत आहे. https://youtu.be/LVt8XNcyIvQ मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते वाजंत्री असून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद झाले. याच परिस्थितीला अनुसरून मंडळाने देखावा तयार केला आहे. शाम गायकवाड व अंकुश जाधव यांनी २२ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना केली. कागद, पुठ्ठा, थर्माकोलचा वापर केलेल्या या देखाव्यात भारतातील लॉकडाऊन, पिंपरीतील वायसीएम रूग्णालय, औषधाचे दुकान यासह बंद दुकाने, मंदिर, दर्गा, सुमसाम रस्ते दाखवण्यात आले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मंडळाच्या वतीने पाळत गणेशोत्सव साजरा केला आहे. तसेच लोकांमधे कोरोना संद...
शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती
पिंपरी चिंचवड

शिवसेनेचे वाळके व उद्योजक जवळकर यांच्या हस्ते अनंतनगर मित्र मंडळाची आरती

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ गणपतीची शुक्रवारची आरती शिवसेना दिघी शाखा प्रमुख संतोष वाळके व उद्योजक निलेश जवळकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी संतोष वाळके यांचा सत्कार कल्पेश गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर निलेश जवळकर यांचा सत्कार सुरज कुंभार व अशोक मदने यांच्या हस्ते झाला. तर दिघी युवासेनेचे तेजस घुले यांचा सत्कार उमेश गांधी यांच्या हस्ते आणि जाहिर शेख यांचा सत्कार मनेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन केतन चव्हाण यांनी केले....
Kalewadi News : काळेवाडीत रस्त्याच्या डांबरीकरणास सुरूवात
पिंपरी चिंचवड

Kalewadi News : काळेवाडीत रस्त्याच्या डांबरीकरणास सुरूवात

काळेवाडी, ता. १७ : नढेनगरमधील नंददीप कॉलनी क्रमांक ४ रस्त्याच्या डांबरीकरण कामास आज सुरूवात करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या डांबरीकरणास सुरूवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यावेळी नगरसेविका नीता पाडाळे व उषा काळे, नगरसेवक विनोद नढे, माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, राष्ट्रवादीचे शंकर घनवट, पुष्पा नढे, रवींद्र गरूड, विश्वास घाडगे आदी उपस्थित होते. " या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन टाकली आहे. पावसामुळे डांबरीकरणास अडचणी येत होत्या. मात्र, पावसाने उघड दिल्याने डांबरीकरणास सुरूवात करण्यात आली आहे." - नीता पाडाळे, नगरसेविका...
महिला सबलीकरणासाठी उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – महापौर माई ढोरे
पिंपरी चिंचवड

महिला सबलीकरणासाठी उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – महापौर माई ढोरे

पिंपळे सौदागर : महिला कुठेही कमी पडू नये, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून स्वता:सह आपल्या परिवाराची व समाजची प्रगती करावी. हा महिला सबलीकरणाचा उद्देश असलेले उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा आशयाचे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी येथे केले. उन्नती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'ती'चा गणपती या विशेष गणेशोत्सवानिमित्त महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते गणपती आरती करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. https://youtu.be/mSWNa7Dnthw त्याप्रसंगी उपमहापौर हिराबाई नानी घुले, नगरसेविका आरती चौधे, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वला गावडे, आपला आवाज आपली सखी संचालिका संगिता तरडे, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, नेहा गमे, गौरी कुटे, कविता भिसे, अश्विनी भिसे, मोहिनी मेटे आदी मान्यवरांना गणपती आरतीचा बहुम...
अनंतनगर तरुण मित्र मंडळाची पर्यावरणपूरक फुलांची आकर्षक सजावट
पिंपरी चिंचवड

अनंतनगर तरुण मित्र मंडळाची पर्यावरणपूरक फुलांची आकर्षक सजावट

पिंपळे गुरव : येथील अनंतनगर तरुण मित्र मंडळ दरवर्षी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून प्रसिध्द आहे. यंदा हे मंडळ ४९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडप डेकोरेटरचे आशिष जगताप यांनी आकर्षक सजावट केली. https://youtu.be/mG1yArgULxU कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता, महाराष्ट्र शासनाच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार पर्यावरणपूरक फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच येथे दहा दिवस लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्याचा मंडळाचा मानस आहे. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित शिंदे, यशवंत दाभाडे, निलेश कुंभार, विशाल चव्हाण, कल्पेश गांधी, केतन चव्हाण, संकेत गुजर, सुरज कुंभार, प्रविण शिंदे, प्रतिक मोरे, अशोक मदने, उमेश गांधी बाबू शिंदे, मनिष चव्हाण, सुहास कुंभार, शुभम पवार, राजेश ...
घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती
पिंपरी चिंचवड

घरगुती गणपती : तरूणाने साकारली शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती | प्रतिष्ठापना केली पेशवे गणपती मुर्ती

काळेवाडी : ज्योतिबानगरमधील श्रद्धा कॉलनीमध्ये राहणाऱ्या अमोल कांबळे या तरूणाने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारली आहे. तर वाड्याला साजेशी पेशवे पगडी परिधान केलेली गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अमोल याच्या घरी मागील २८ वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी अमोल गणपतीची आरस करताना नवीन प्रयोग करत असतो. या वर्षी त्याने पुठ्ठ्याच्या सहाय्याने शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार केली असून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. या प्रवेशद्वारवर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्रे लावली आहे. अमोल याचा हा देखावा आकर्षण ठरत असून यासाठी त्याला त्याची आई शोभा, वडील बाळासाहेब व भगिनी प्रियंका शिंदे यांची मोलाची मदत मिळाली. असे अमोल याने लोकमराठी न्य...